एप्रिल फूल
एकमेकांना फसवणं ही
जगण्याची रित झाली आहे
फसण्यापासुन वाचण्याला
जणू एप्रिल फूल आली आहे
लोक सतर्क राहिल्यामुळे
फसवा प्लॅन बिघडू शकतो
एप्रिल फूल बनवत असताना
अर्धा,पाऊणही बागडू शकतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
एप्रिल फूल
एकमेकांना फसवणं ही
जगण्याची रित झाली आहे
फसण्यापासुन वाचण्याला
जणू एप्रिल फूल आली आहे
लोक सतर्क राहिल्यामुळे
फसवा प्लॅन बिघडू शकतो
एप्रिल फूल बनवत असताना
अर्धा,पाऊणही बागडू शकतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खेळात
हारता-हारता जिंकतात
जिंकता-जिंकता हरतात
खेळातील शेवटचे क्षण
हे अतिमहत्वाचे ठरतात
हार-जीत हि फिक्स नसते
या बाजु कधीही फिरू शकतात
अन् छोट्या-छोट्या चुकाही
मोठा पश्चाताप ठरू शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सेमी फायनल
पुन्हा एकदा सर्वांचेच
लक्ष वेधून घेतले आहे
क्रिकेट प्रेमींनी तन-मन
ऊत्सुकतेत ओतले आहे
हार-जीतही ठरली जाईल
विलंब नाहिये त्या मुहूर्ताला
मना-मनात आहे विश्वास
जीत मिळणार भारताला
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
फ्युचर प्लँन
कहर वाढला ऊन्हाचा
सावली झाली दुर्मिळ
होऊ लागलं असह्य
हे वातावरण गर्मीळ
पाहून जरा हे गांभिर्य
व्हावे जराशी चाणाक्ष
भविष्यात सावलीसाठी
आताच जपावेत वृक्ष
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मार्च एण्ड
मार्च पासुन मार्च पर्यंत
कालावधी फिक्स असतो
वर्षभराचा आराखडा
मार्च एण्ड इथिक्स असतो
वर्षभराचा व्याप देखील
एकत्रितपणे घेरला जातो
कार्यालयीन सालाचा शेवट
मार्च एण्डला ठरला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
चोराचा दावा
अंधारात घडवतात गुन्हे
ऊजेडात मात्र सभ्य होतात
पण कितीही गुन्हे झाकले तरी
गुन्हेगारीचे बाहेर धब्बे येतात
फेक चारित्र्य संपन्नतेचा
नको तितका गवगवा असतो
स्वत: साव असण्याचा
चोराचा नेहमीच दावा असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
हा एक दोष
जबाबदार व्यक्तीही कधी
नैतिकता सोडून बिघडतात
विकेकी वाटणार्या डोक्यात
अनैतिक किडे बागडतात
अपराध घडवत असताना
काया त्यांची पापटी असते
पण अपराध्यांच्या डोक्यावर
जणू राजकीय सेफ्टी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
अनुष्काचा पाठीराखा
अनुष्कावर येऊ लागला
एकेक नविन चुटूकला
मात्र हा असभ्य प्रकार
विराटलाही खटकला
निंदनीय टिकेचा मुद्दा
त्याच्या मनी घेरला आहे
अनुष्काचा पाठीराखा
पुन्हा विराट ठरला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सत्कार्या बाबत
ज्यांनीही वाढवुन धैर्य
केलेले आहेत सत्कार्य
त्यांनी समाजात मानाचे
मिळवले आहेत स्थैर्य
इथे सत्कार्य करण्याच्या
सर्वास मिळतात संधी
मात्र सत्कार्याच्या नोंदी
करू नयेत अनागोंदी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
हि एक समस्या
वेग-वेगळ्या क्षेत्रात हल्ली
राजकीय मोड आला जातोय
परिस्थितीवर ऊपाया ऐवजी
परिस्थितीलाच दोष दिला जातोय
राज्य आणि देशातील जनता
वेग-वेगळ्या समस्यांनी त्रस्त आहे
पण पहिलं सरकार बदनाम करण्या
दुसरं सरकार व्यस्त आहे,...?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खुशी विजयाची
विराट खेळला विराट
दणदणीत भेटला विजय
ऊमेदीपुढे विराटच्या
कांगारूचा झाला पराजय
भारतीय टीम जबरदस्त
पुन्हा एकदा ठरली आहे
भारतीय टीमच्या विजयाने
मनात खुशी भरली आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
स्वप्न जाग्या मनातील
एक एक बॉल देखील
बारकाईने पाहिला जातोय
एक एक क्षण सुध्दा
ऊत्सुकतेत राहिला जातोय
बॉल पडेल तसे मनं
हेलकावे खाऊ लागले
भारत जिंकल्याचे स्वप्न
जाग्या मनात येऊ लागले
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सत्य अतृप्त आत्म्यांचे
इतरांना हिनवत असता
स्वत:ला विसरून जातात
इतरांना घसरवत असता
स्वत:सुध्दा घसरून जातात
माणसांच्या खेचा-खेचीसाठी
माणसांकडे हे गुण सुप्त आहेत
अतृप्तांनाही तेच हिनवतात
ज्यांचे आत्मे अतृप्त आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वैचारिक अनिष्टतेत
वैचारिक अनिष्टतेमध्ये
समाज फरफटले आहेत
आज देखील कुविचारांत
माणसं गुरफटले आहेत
कुविचारी पगडे अजुनही
मना-मनावर स्वार आहेत
सुविचारांवरती देखील
फूंद-फूंदक्याचे वार आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
माणसांचे आयुष्य
पाणी बचतीकडे अजुनही
नजर का सांगा करडी होतेय
संपुर्ण स्थलांतरीत गावातही
पाण्यासाठी हल्ली गर्दी होतेय
अनमोल समजलं जाणारं हे
जीवन टँकरच्या टाक्यात आहे
पण माणसांचे आयुष्य मात्र
दुषित पाण्याने धोक्यात आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मान्सुनची खबर
बोकाळलाय दुष्काळ
जीव झाला लाही-लाही
पण पाऊसाची येण्याची
काल अचानक आली ग्वाही
मुहूर्त दूरचा असला तरी
आशा मात्र वाढल्या आहेत
या भेगाळलेल्या मनातही
कोवळ्या पालव्या दडल्या आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कुत्रे
पाळीव असो की मोकाट
कुत्रे भलते डेंजर असतात
कधी सामोरा वार तर कधी
पाठीमधला खंजर असतात
गुरगुरणार्या स्वरात ते
प्रत्युतरही देऊ शकतात
अन् भुंकणारे कुत्रे कधी
चावा सुध्दा घेऊ शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
माणसांची प्रासंगिकता
निखळ मैत्रीतही कधी
कट्टर वैरी वाढू शकते
तर कट्टर वैरीत देखील
कधी मैत्री दडू शकते
कधी होतात प्रेमळ तर
कधी मात्र क्रुर होतात
प्रसंगानुरूप माणसंही
जवळ आणि दूर होतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सोशियल मिडीयात
सोशियल मिडीया वापरणं
जणू कोंडी भासत होती
जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याला
कायद्याची गदा ढासत होती
आता मात्र आय.टी. अॅक्ट
स्वातंत्र्यापुढे नमला आहे
सुप्रिम कोर्ट निर्देशामुळे
६६ (अ) हा शमला आहे
हि श्रेया सिंघालची जीत मात्र
आनंद तर नेटकर्यांचा आहे
तरी मिडीयात विवेकी वागणं
जिम्मा मात्र सार्यांचा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सखे
तुझ्या रंगात माझा रंग
सांग सखे तु घेशील का
धूळवडीच्या मुहूर्तावर
रंग खेळण्या येशील का
मी रंगात रंगविल तुला
नकोस करू तु ओरडा
पाण्याचीही घेईल तमा
रंग टाकील गं कोरडा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शिक क्षणात
शिक्षण घेत असताना
कुरापतींना आळा असावा
एकुन घेतल्या शिक्षणाचा
नॉलेज हाच ताळा असावा
विद्यार्थ्यांचे भवितव्य
नाहकपणे फसू नयेत
अन् चुकुनही शिक्षणात
राजकारण घूसू नयेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कौटूंबिक प्रतिबिंब
ना पतीने करावा
ना पत्नीने करावा
एकमेकांचा छळ
कुटूंबातुन विरावा
चांगल्या समाजासठी
महत्वाचे चांगले कुटूंब
घरा-घरातुन समाजात
यावे विवेकी प्रतिबिंब
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
याद करो कुर्बानी
देशासाठी झटले होते
स्वातंत्र्याची धग धरून
त्या शुरांची याद करतो
आठवणीनं जग भरून
भगतसिंग,राजगुरू,सुखदेव
आठवून घ्यावेत सर्वांनी
येतील शहारे रोमा-रोमात
ऊनकी याद करो कुर्बानी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
नाठाळांची नाठाळकी
बाहेर येणार्या बोलण्यात
विचारांची खोली असते
पण बेअकली वक्तव्याची
नेहमीच काया भोळी नसते
जाणून-बुजुन आग पाखडणी
कधी वेळी अवेळी असते
तरीही नाठाळां कडून जणू
अविचारी टाळीस टाळी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वाहन अवाहन
हल्ली वाहन म्हटलं की
गरजेची गोष्ट झाली आहे
कित्तेक कामांची जबाबदारी
वाहनांवरती आली आहे
प्रवासासह इतरही कामे
वाहन बिगीनं करू शकते
पण त्याची काळजी न घेणं
हे जीव घेणंही ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वाटा-घाटी
एकत्र कुटूंबाचा हल्ली
तिटकारा येऊ लागलाय
आपलं बिर्हाड घेऊन
जो-तो विभक्त होऊ लागलाय
घरात काय-दारात काय
राज्यात देखील तेच आहे
घर-दार किंवा प्रांत वाटणी
हि मना-मनाला ठेच आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शाब्दिक वॉर
ना तलवारीची गरज
ना बंदूकही हवी आहे
हल्ली युध्दांची पध्दत
अगदीच नवी आहे
प्रत्यक्षात न येताही
दडून वार करता येतो
जिव्हारी लागेल असा
टामणा-टोमना मारता येतो
राग-द्वेश अन् षडयंत्रही
मना-मनावर स्वार आहेत
ऑनलाइन टू ऑनलाइन
हल्ली शाब्दिक वॉर आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
दु:खाचं गणित
वजाबाकी करता करता
होऊन जातीय बेरीज
दु:खांच्या गुणाकारांनी
हे जीनं आलं जेरीस
दु:खाला भाग देण्यासाठी
होईल का कोणी भागक
भागावे आपले आपणच
हाच तर यातील बोधक
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
गोष्ट लाख मोलाची
देशाने कसे वागायचे
राज्यघटना शिकवते
राष्ट्राचे राष्ट्र ऐक्यही
मना-मनात टिकवते
देशाची प्रतिकृती ही
धार्मिकतेने ना बाटावी
वादंग भडकावणारांना
थोडीशी लाज वाटावी
आपला धर्म आपली जात
यापेक्षा देश हा श्रेष्ठ आहे
राहू द्या भारताला भारतच
हि लाख मोलाची गोष्ट आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
गंडा ऑनलाइन
अनोळखी व्यक्तींची ओळख
काळजात आरपार बसु शकते
तर कधी भावनेच्या भरामध्ये
भोळं मन सहज फसु शकते
अनोळखी मैत्रीचा कधी कधी
विपरित परिणाम होऊ शकतो
अन् सोशियल मिडीया वरून
गंडाही घातला जाऊ शकतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वादग्रस्त विधान
कधी कुठे काय बोलावं
याची थोडी अक्कल असावी
योग्य प्रत्युत्तर कसं द्यावं
याचीही जरा शक्कल असावी
आपल्या वाणीने समाजात
वादंगी पडसाद फिरू नये
वादग्रस्त विधान खांडण्याला
वादग्रस्त विधान करू नये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
भावनिक सल्ला
माणसां मध्ये भावनांचा
जणू बाजार रंगला आहे
भावनांची अवस्था पाहून
भावनीक दर्जा दंगला आहे
माणसाचं मन माणसाच्या
मनाला ना खुपायला हवे
माणसांनीच माणसांच्या
भावनांना जपायला हवे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
विचार
वेग-वेगळ्या मना मध्ये
वेग-वेगळे विचार असतात
कधी विचार स्वाभिमानी
कधी विचार लाचार असतात
कधी प्रचार तर कधी-कधी
चटकदार आचार असतात
अशा वेग-वेगळ्या ऊपमांचे
गमतीशीर-गंभीर विचार असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मल्ल्याचा कल्ला
घेताना घेतलं भरमसाठ
फेडताना ऊडाली धांदल
ज्याला समजलं होतं लायक
त्यानेच मारलीय बंडल
घेतलं कर्ज फेडायला
तसुभर ना लाजला आहे
मल्ल्याचा कल्ला मात्र
सोशियल मिडीयात गाजला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
राष्ट्रा विषयी
राष्ट्रा विषयी आपुलकी
प्रत्येकालाच असावी
राष्ट्राविषयीची भावना
स्वकर्तृत्वातुन दिसावी
ज्या देशात राहतो जगतो
त्या देशावर प्रेम करावे
आपले प्रत्येक कार्य हे
स्वदेशाचे जोम ठरावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सत्यापुढे
दोषी नसेल तर
भय नाही
दोषी असेल तर
गय नाही
कायद्यातुन सुटण्याची
सोय नाही
सत्यापुढे असत्याचा
जय नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
ED ची बेडी
महाराष्ट्र सदनात
घडलाय घोटाळा,.?
म्हणून भुजबळांस
घातलाय वेटोळा,.!
कायद्याच्या पुढे नाही
व्यक्ती कोणीही बडी
भुजबळांच्या हातीही
आज आहे Ed ची बेडी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सल्ला मोलाचा
विश्वास टाकला कुणी तर
विश्वासघात करू नका
विश्वासाला तडा देत
शब्दांवरून फिरू नका
जे सत्य असेल तेच बोला
पोकळ थापा ऊपसु नका
पाठीशी आहोत म्हणून
पाठीत खंजीर खुपसु नका
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मुर्खपणाचे मोजमाप
आयत्या पिठावर रेघोट्या
मालकी हक्कानं मारतात
दुसर्यांनाच करतात पुढे
स्वत:चे अंगही चोरतात
त्यांचा मुर्खपणा मोजायला
सोपी-साधी शक्कल आहे
त्यांच्याच बोलण्यात कळते
त्यांना किती अक्कल आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बोलत असताना
बोलताना नेहमीच
सत्य धरून बोलावं
होणार्या परिणामांना
थोडं स्मरून चालावं
निराधार बोललं तर
लोकही वाद घेतात
पण तथ्य असेल तर
टिकेलाही दाद देतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
संवाद साधताना
दुर-दुरचा संवादही हल्ली
दुर-दुरवरती जातो आहे
संवादी देवाण-घेवाणीचा
मोबाईल दुवा होतो आहे
कामापेक्षाही जास्त बोलणं
विचारपुर्वक टाळलं जावं
कोणाला कधी किती बोलावं
याचं तार्तम्य पाळलं जावं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
दुष्काळ पाहताना
या दुष्काळाच्या झळाही
दूष्काळ्यांनाच जाणवतात
नव-नविन आपत्ती घृणा
आता वारंवार खुणावतात
दुष्काळ पाहत असताना
थोडंसं गांभिर्यांनं पहावं
हवेत असणारांनी देखील
मातीच्या टच मध्ये रहावं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कायद्याची फ्लेक्झिब्लिटी
कायदाबाह्य झोल देखील
कायद्यानेच ठकवला जातो
अन् हवा तसा कायदाच
हवा तेव्हा वाकवला जातो
जेवढा कायदा कठोर आहे
तेवढाच लवचिक जाणवतो
कायदा पाळणाराला देखील
कधी कधी कायदा हिनवतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
धनगर आरक्षण
आशा भेगाळल्या सार्या
आश्वासनं तुटले आहेत
कित्तेकांचे विश्वासही
सरकारनं लुटले आहेत,.?
या सरकारी प्रवृत्तीने
मनातच हळहळतोय
धनगर आरक्षण प्रश्न
वारंवार घुटमळतोय,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आपले नेते
त्यांनी तोडा म्हणताच
जनतेने तड-तडा तोडायचे
त्यांनी जनतेवर हसायचे
अन् जनतेने रडत बसायचे
जिथे-तिथे वाचाळकीने
नकोतच जीभ घसरवणारे
आपले नेते असायला हवे
सामाजिक शांतता पसरवणार
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३