आण्णाभाऊ
विषादातही चमकणारा
तु तेजस्वी तारा होता
जगी घाव घालणारा तु
परिवर्तनीय वारा होता
तुझे विचार आत्मसात करून
या जगी बदल लागले होऊ
हे शतश: अभिवादन करतो
आज तुजला आण्णाभाऊ,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आण्णाभाऊ
विषादातही चमकणारा
तु तेजस्वी तारा होता
जगी घाव घालणारा तु
परिवर्तनीय वारा होता
तुझे विचार आत्मसात करून
या जगी बदल लागले होऊ
हे शतश: अभिवादन करतो
आज तुजला आण्णाभाऊ,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विकास कामं
प्रत्येकाचा हिस्सा ठरवुन
विकास निधी वाटले जातात
पुढचे कामं थाटत असताना
मागचे कामं फूटले जातात
पुन्हा नविन बजेटसाठी
कुणी नव्याने नटले जातात
जुने कामं झाकून ठेऊन
नविन हाती घेतले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
राजकारण
पतीकडे एक पद
पत्नीकडे एक पद
आपत्यांची मात्र
पदासाठी खदखद
सासु-सासरे अनुभवाच्या
एकेक पुड्या सोडतात
अन् समाजाचे राजकारण
घरातल्या-घरात घडतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सत्य स्थिती
यांच्या डोळ्यात ते दोषी
त्यांच्या डोळ्यांत हे दोषी
आरोप मात्र लागत नाहीत
का दोघांच्याही अंगाशी,.?
विरोधी चेहरे समोर पाहून
संयम जणू बंडाळले जातात
आरोप असो वा प्रत्यारोप
गोंधळात गुंडाळले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जीवनात
जीवन हे खुप सुंदर आहे
मात्र सुंदरतेत येऊन बघावे
सुंदर जीवन जगण्यासाठी
गतानुगतिक होऊन वागावे
जाणीवपुर्वक वा अभावितपणे
कधीच हातुन घडु नये गुन्हा
करा आयुष्यात सत्कार्य सदैव
हे जीवन नाही पुन्हा-पुन्हा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शिक्षा
हव्या तेवढ्या पळवाटा
पळून पाहिल्या जातात
त्याच-त्याच वाटा सुध्दा
वळून पाहिल्या जातात
पण याचनेला भिक घालत
गुन्हेगारांना ना सुरक्षा असते
ज्याने कॅपीटल गुन्हा केलाय
त्याला कॅपीटल शिक्षा असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
हतबलता,...
पळून-पळून थकले जातात
हरलेला डाव कळून घेतात
जेव्हा उपलब्घ पळवाटाही
परिस्थितीपुढे पळून जातात
परिस्थितीचे गांभिर्य पाहून
चहूबाजुनेच फेटाळलं जातं
तेव्हा मात्र उम्मीद सोडून
हतबलतेला कवटाळलं जातं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जाती-धर्म
मना-मनात वाढणारी
जाती-धर्माशी आपुलकी असते
जाती-धर्मीयांचा पुळका
हि गोष्टही शेलकी असते
ज्याच्या-त्याच्या संस्कारानुसार
ज्याच्या-त्याच्या शिस्त असतात
मात्र कर्तृत्ववान माणसं कधीच
जाती-धर्मात बंधिस्त नसतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कलामजी,...
वर्तमान घडवता-घडवताना
भविष्यकाळही घडवला आहे
तुमच्या एका-एका आठवणीने
अख्खा भारत रडवला आहे
तुम्ही बांधलेल्या धोरणांमध्ये
परिस्थिती आजही गुलाम आहे
कालही तुम्हाला सलाम होता
आजही तुम्हाला सलाम आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मिसाइल मॅन
महासत्ताक भारतासाठी
ध्येयवादी झंझावात होता
स्वत: स्वप्न पाहता-पाहता
इतरांचे स्वप्न रंगवत होता
विद्यार्थ्यांचा प्रेरणास्रोत
अडचणींचा सामना होता
प्रत्येक-प्रत्येक ध्येयासाठी
हर्षभरित कामना होता
कित्तेक ह्रदयांची आशा होऊन
कित्तेक ह्रदयांत झिरपला आहे
कित्तेक ह्रदयांना चुरका लाऊन
आज मिसाइल मॅन हरपला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
विठ्ठला
कुणी असतील तिथुन तर
कुणी पंढरपुरी जाऊन
कुणी विठ्ठल नाम घेऊन
आपले गार्हाणे गाऊन
आप-आपल्या पध्दतीने असे
भक्तांनी साकडे घातले आहेत
प्रत्येक-प्रत्येक साकड्यामध्ये
पावसाचे मुद्दे घेतले आहेत
भक्तांच्या या साकड्यांसाठी
ये सत्वरी तु धाऊन ये
या दुष्काळात पावसाला
विठ्ठला पाऊस होऊन ये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वारी पंढरीची
मनी वाढलेल्या आनंदाचा
प्रत्येक क्षण नवा असतो
अन् पंढरपुरच्या वारीचा
दुरवरती गव-गवा असतो
विठ्ठल नामाच्या गजराने
अवघी दुमदुमते पंढरी
अन् विठ्ठलाला साकडे
घालती हो वारकरी,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
निमित्त एकादशीचे
अंत:करणातल्या भक्तीचा
हा आनंद उतप्रोत असतो
मनी समाधान लाभण्याचा
हा अध्यात्मिक स्रोत असतो
हलक्या-फुलक्या अन्नासाठी
उपवास निमित्त ठरला जातो
अन् पोट भरेपर्यंत फराळावर
मनसोक्त ताव मारला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
पुळके
प्रसिध्दी मिळविण्यासाठी
उगीचंच त्यांचे स्टंट असतात
पण सांगा त्यांनाही कुणीतरी
शेळ्या हाकण्या उंट नसतात
मना-मनामध्ये माजलेले
अविचाराचे घोळके असतात
अन् नको असलेल्या गोष्टींचेही
कुणा-कुणाला पुळके असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कान पिचक्या
ज्याच्या-त्याच्या हाती इथे
वेग-वेगळे शस्र आहेत
प्रत्येकाच्या वापराचेही
वेग-वेगळे शास्त्र आहेत
जशी ज्याची आठवण येईल
तशा त्याच्या गुचक्या असतात
खोचक शब्दांचा वापर करत
कधी कान पिचक्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
माती प्रेम
शेतकर्याच्या आत्महत्येचेही
वेग-वेगळे तर्क-वितर्क आहेत
मंत्र्यांच्या बोलण्यातुन दिसते
कोण किती सतर्क आहेत,.!
बोगस कारभार हाकण्यापेक्षा
किसानी जगणं जगुन बघा
मातीवरचं प्रेम काय असतं ते
एकदा मातीतंच येऊन बघा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आमचा सल्ला
इतरांचं जरी जळलं तरीही
न जळणाराला कळत नसतं
ज्याला-ज्याला कळत असतं
केवळ त्याचंच जळत असतं
परिस्थितीचे गांभिर्य घेऊन तरी
रासवट काया कापरली जावी
अन् आकलेचे तारे तोडताना
थोडीशी अक्कल वापरली जावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
गदारोळ
ज्याचा आवाज मोठा त्याच्या
बोलण्यामध्येही जोर असतो
नसतं कधी-कधी दिसतं तसं
साव वाटणाराही चोर असतो
पण चोर असो की साव असो
सिध्दतेसाठी तर घोळ असतो
अन् चोरा बरोबर कधी-कधी
सावाकडूनही गदारोळ असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
फिल्मी रेकॉर्ड
कुणी तरी बनवुन जातो
बाकीचे मग मोडत बसतात
वेग-वेगळ्या कमाईने
नवा रेकॉर्ड जोडत असतात
कुणी दुसर्याचे तर कुणी
स्वत:चेच तोडत असतात
पण त्यांचे रेकॉर्ड घडवण्यासाठी
प्रेक्षकच धडपडत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची शेतकर्यांच्या भावना प्रखरपणे मांडणारी ही एक वास्तवदर्शी कविता,...
साहेब,...
वरून वरून बोलु नका
एकदा शेतात येऊन जा
डोळ्यात तुमच्या पाणी येईल
करपतं पीक पाहून जा
फक्त कागदंच वाचु नका
रानात पुरावा वाळला आहे
एका-एका ठोंबासाठी
जीव आमचा जळला आहे
आभाळ सताड आ वासुन
पीक खाण्यास टपलं आहे
लेकराबाळांचं सुख आमच्या
मातीमधी खपलं आहे
हिशोब कर्जाचा पाहून तर
जगणं आमचं बारगळलंय
अन् रानामध्ये पेरलेलं
बीज सुध्दा विरघळलंय
आम्ही जाणतो आहोत तुमची
सत्तेची बोर पिकलेली आहे
पण तुमचे धोरणं ऐकुनच
पिकाने मान टाकलेली आहे
शांत बसुन पाहिलं आहे
आज बोलतो ऐकुन घ्या
शेतकर्यालाही कधीतरी
साहेब तुम्ही समजुन घ्या
सुख भोगलं असतं आम्ही
निसर्ग मात्र कोपला आहे
तुमच्याकडून अपेक्षा होत्या
तुम्हीही विश्वास कापला आहे
सरकार बदललं असलं तरी
शेतकरी सुखी झालेच नाहीत
तुम्ही सांगितलेले अच्छे दिन
आमच्यापर्यंत आलेच नाहीत
तुमचीच नीती आपली करत
आम्हीही गंभीर व्हायचं का,.?
सांगा साहेब तुम्हीच आता
इलेक्शन दुबार घ्यायचं का,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. : 9730573783
सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव न काढता,...
नीती
जसे माणसं बदलतील
तसे विचार बदलले जातात
आपल्या सोयीचा विचार करत
स्वार्थी मनं सादळले जातात
कटू नीतीचा वापर करत
लोक इथले भुलवले जातात
अन् महत्वाचे कार्यालयंही
इकडून तिकडे हलवले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
ओझे आणि विद्यार्थी
प्रत्येक-प्रत्येक पालकालाही
आता पाल्य चाप्टर व्हावं वाटतं
पण दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी
वजनदार दप्तर घ्यावं लागतं
विद्यार्थ्यांच्या पाठीवरती
दप्तराचेच ओझे आहेत
उंची आणि वजन पाहता
नवे तोडगेही खुजे आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सजा-ए-मौत
समाजात कसे वागावे याचे
प्रत्येक व्यक्तीला चान्सं आहेत
माणसांचा खातमा करणारेही
माणसांमध्ये माणसं आहेत
गंदाळलेल्या डोक्यात त्यांच्या
हिंसानियत ओतप्रोत असते
ज्याला जगण्याचा अधिकार नाही
त्याला "सजा-ए-मौत" असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कर्माचे फळं
ज्यांनी सत्कार्य केले आहेत
त्यांचा सत्कार केला जातो
ज्यांनी कुकर्म केले आहेत
त्यांचा धिक्कार केला जातो
"जैसी करणी-वैसी भरणी"
हेच धोरणं बाळगावे लागतात
ज्याच्या त्याच्या कर्माचे फळं
ज्याला-त्याला भोगावे लागतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कर्ज फेड
कर्जातुन निघलेलं जीणंही
कर्जामध्येच जातं आहे
शेतकरी आणि कर्जाचं हे
पिढ्यान् पिढ्याचं नातं आहे
कर्जमाफी न करणारं सरकार
शेतकर्याचं कर्ज होऊ नये
सरकार रूपी कर्ज फेडण्याची
शेतकर्यावर वेळ येऊ नये,..!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
पत्रकार सुरक्षा,...?
वाढते हल्ले पत्रकारांवरचे
दिवसें दिवस वाढू लागलेत
अन् गंभीर-गंभीर प्रकरणंही
काळाच्याआड दडू लागलेत
ज्यांनी सत्याचा आवाज उठवला
त्यांचाच आवाज दबला जातोय
अन् पत्रकार सुरक्षिततेचा प्रश्न
सरकार दारी राबला जातोय,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
घोटाळ्यांत
ज्यांची प्रगती व्हायला हवी
त्यांनाच अजुन लाभ नाही
आम्हाला याची जाण आहे
हि साधी-सुधी बाब नाही
ज्यांचे विचारच भ्रष्ट आहेत
त्यांच्यात फरक ना पडतो आहे
जिथे महापुरूषांची नावं आहेत
तिथेही भ्रष्टाचार घडतो आहे
अशा घोटाळ्यांचे प्रकरणंही
रोज-रोज ताजे येत आहेत
माणसांच्या नजरेतुन माणसं
पुन्हा-पुन्हा खुजे होत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
नवा घोटाळा
प्रत्येक-प्रत्येक योजना ही
जनतेचं कल्याण घेऊन येते
मात्र सत्य बाहेर पडताच
योजना घोटाळा होऊन जाते
घोटाळ्यांविना योजनाच नाही
हे नाइलाजाने मानावं लागतंय
अन् "अजुन एक नवा घोटाळा"
आता रोज-रोज म्हणावं लागतंय
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
फेसबुक फ्रेंड
पुढची व्यक्ती कोण असेल
याची जरी खात्री नसते
तरी आत्मीयता जपणारी
फेसबुक वरील मैत्री असते
अनोळखीच्या ओळखीचीही
कधी आपुलकी वाटू लागते
अन् अनोळखींच्या भेटीची
मनी उत्सुकता दाटू लागते
माणसं जोडण्याचा दुवा म्हणून
सोशियल मिडीया घेतला जातो
तर भावनीकतेचा आधार घेऊन
कधी-कधी गंडाही घातला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आतल्या गाठी
विरोध करता नाही आला तरी
नाराजीच्या ढूसण्या असतात
आरोपांसह टिका-टिप्पण्याही
आळीपाळीने उसण्या असतात
वरून-वरून गोडी असली तरी
आतुन मात्र कुरघोडी असते
घरातल्याच व्यक्तीकडून कधी
आपल्याच घराची घरफोडी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
रसिकांकडून होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन सदरील कविता ऑडीओसह पुनर्प्रसारित करण्यात येत आहे,...
सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...
तुझ्या-माझ्या मधला,दुवा होऊ दे इंटरनेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... |||धृ||
तुझे अबोल बोलके डोळे
अन् लाजरी-लाजरी नजर
डोळे मिटवण्या आधीच
होतेय डोळ्यांपूढे हजर
माझ्या ह्रदयात तुझ्या,प्रेमाचं गं बेट
सखे,तु व्हाट्सअप वरती भेट,...||१||
तुझे सळसळणारे केस
अन् डूलडूलणारे कान
गोल-गोबरे गाल अन्
भिरभिर फिरती मान
सतवताहेत गं मला,अर्धचावले ओठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||२||
या ओसाड माझ्या मनी
तु फुलव प्रेमाचा मळा
मनसोक्त पाहू दे मला
तुझ्या गालावरच्या खळा
जणू मी पिंपळपान,तु झालीस गं देठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||३||
आठवण तुझी घेऊनच
ह्रदय माझं धडधडतंय
तुझ्याच ह्रदयासाठी ते
रातंदिस गं तडफडतंय
तुझं व्यसन माझ्या,ह्रदयास जडलंय थेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||४||
तुला पाहिल्या पासुन गं
मलाच मी विसरलोय
माझ्या जीवनातुन तुझ्या
जीवनात मी घसरलोय
तुझ्या जिवनात माझंही,जीवन होईल सेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||५||
माझ्या मनातली भावना
घे तुझ्याही मनात गं
नको करू विलंब आता
तुझ्या-माझ्या प्रेमात गं
माझ्या ह्रदयाचं तुझ्यासाठी,खुलं आहे हे गेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... ||६||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
व्हाटस्अप नंबर :- 9730573783
सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव काढू नये,....
कर्ज माफी,...!
विरोधकांनी विरोधही केला
तरीही जाग आलीच नाही
दूष्काळी परिस्थितीची जणू
सरकारला जाण झालीच नाही
कर्ज माफीचा मुद्दा वारंवार
सरकार कडून टळतो आहे
अन् कर्जाच्या बेरजेमध्येच
शेतकरी घूटमळतो आहे,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
भविष्य विद्यार्थ्यांचे
जिथे पोषक आहार मिळावा
तिथे विष प्रहार होतो आहे
विद्यार्थ्यांना विषबाधा होणे
हा प्रकार समोर येतो आहे
जेवनातुन विषबाधा होणे
असे प्रकारच घडू नयेत
ज्यांच्या हाती भविष्य आहे
त्यांचे भविष्य बिघडू नयेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सापका-शिपका
आभाळाची सताड काया
मना-मनाला छेडू लागली
एका-एका थेंबाची आशा
मना-मनातुन वाढू लागली
आता शेतामधलं पीक जणू
मरण यातनेच्या शिक्षेत आहे
अन् शेतकरी मात्र तटस्थपणे
सापक्या-शिपक्याच्या प्रतिक्षेत आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
स्री
कायद्यात सुरक्षा असली तरी
वायद्यात मात्र घोटाळा आहे
स्री स्वातंत्र्याला ग्रासणारा
अत्याचाराचा वेटोळा आहे
स्री-पुरूष समतेच्या वल्गना
आता जणू डमी आहेत
स्री ला समजुन घेण्यासाठी
स्रीया सुध्दा कमी आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सदरील वात्रटिका ऑडीओ मध्ये ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर 9730573783
विरोधी पक्ष
प्रत्येकाच्या हिशोबाच्याही इथे
वेग-वेगळ्या पुड्या असतात
राजकीय डाव साधत कधी
नव-नव्या कुरघोड्या असतात
सत्ताधार्यांवरतीही कधी-कधी
विरोधी वारे फिरलेले असतात
अन् विरोध करण्यासाठी मात्र
विरोधी पक्ष ठरलेले असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लाच
कधी टेबला वरून असते
कधी टेबला खालुन असते
कधी-कधी न बोलताच तर
कधी-कधी बोलुन असते
दिली-घेतली जाणारी लाच
दोन्हीही बाजुने गुन्हा असते
कायद्यानं गुन्हा असली तरी
वास्तवात पुन्हा-पुन्हा असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
दुष्काळात
शेतातला एक-एक ठोंब
पाण्याविना पोरका आहे
या दुष्काळी पावसाळ्याचा
मना-मनाला चुरका आहे
निर्गालाच बाधक ठरणारा
कसा नैसर्गिक महिमा आहे
कर्जाळू जीनं जगता-जगता
दुष्ळात तेरावा महिना आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जबाबदारांनो
ज्यांची आपुलकी वाटायला हवी
त्यांचाही तिरस्कार वाटू लागेल
जेव्हा कोणी जबाबदार नागरिक
अमाणूषतेनं लोकांना पिटू लागेल
कायद्याने अधिकार असले तरी
अधिकाराने कायदा वागवु नये
अन् जबाबदार्या पार पाडताना
आपली संयमी काया धगवु नये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आधार
याचा त्याला आधार असतो
त्याचा याला आधार असतो
आधार देता-घेताना कधी
आधार हाच गद्दार असतो
मना-मनातुन मना-मनावर
घाता-पाताचा वार नसावा
विश्वासानं दिला घेतलेला
आधार कधी गद्दार नसावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शेतकर्याची व्यथा
वेग-वेगळ्या विचारांनुसार
अधिवेशनं सजले जातील
शेतकर्याचे प्रश्न मांडणारेही
अधिवेशनात गाजले जातील
नावाला पावसाळी असलं जरी
पावसाचा अजुनही पत्ता नाही
अन् दुष्काळात होरपळला तरीही
शेतकर्याला दुष्काळी भत्ता नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बहिष्कृत चहा-पान
आपुलकीच्या निमंत्रणाला
तिरस्कारीत संगत असते
अन् अधिवेशनीय चहापान
दोन्ही बाजुने रंगत असते
विरोधकांची विरोधी काया
नाराजीतही प्रविण असते
बहिष्काराची ही रीत जुनी
पालवी मात्र नविन असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
छुप्या संपत्ती
कमावण्याला बंधन नाही
हेतु शुध्द असायला हवा
कमावलेला एक-एक पै
नीतीबध्द दिसायला हवा
ज्यांनाही याचे भान आहेत
त्यांच्या श्रीमंतीला मान आहे
नसता छुप्या संपत्ती या तर
काळ्या बाजारची घाण आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
उसणी मैत्री
स्वार्थ साधता यावा म्हणून
उसणी गोडी जपली जाते
मनी शत्रु असणार्याशीही
जनी मैत्री थापली जाते
प्रभारी मैत्रीतलं शत्रुत्व मात्र
मनी प्रकर्षानं भासत असते
अन् अहंतामिश्रीत मैत्री सदैव
मैत्रीमध्येच धुसफूसत असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
लोक समस्या
लोकसंख्या वाढीच्या तक्रारी
सर्रासपणे ठोकल्या जातात
अनेक अपत्यांच्या आशाही
पारंपारिक हाकल्या जातात
कुटूंब नियोजनाची मर्यादा
जरी अस्तित्वात आली आहे
तरी वाढती लोकसंख्या ही
लोक समस्या झाली आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३