हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३० जुलै, २०१८

तडका - मानवी प्रवृत्ती

मानवी प्रवृत्ती

कुणी लावली आग
तर कुणी ओतले तेल
माणसांच्या भावनांशी
कुणी खेळू लागले खेळ

माणसा-माणसांत पहा
हे डाव टाकले जातात
न्याय, हक्कापासुन दूर
माणसंच हाकले जातात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २८ जुलै, २०१८

तडका - माझी खंत

माझी खंत

कुणी भगवे,कुणी पिवळे
कुणी केले निळे मला
जाती-धर्मात वाटले लोक
लोकांमूळेच कळे मला

माझ्या हातातील तलवार
अन्याय तारक हेरतील का,..?
जाती अंताच्या लढ्यासाठी
माझा वापर करतील का,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १७ जुलै, २०१८

तडका - फसवा-फसवी

फसवा-फसवी

कोण कुणाला कसा फसवील
हे सांगता येत नाही
इथे तेही फसवु पाहतात
ज्याला रांगता येत नाही

जिकडे पहावे तिकडे
फसवा-फसवी दिसते आहे
इमानदारी,माणूसकी, आपुलकी
इथे सरळ-सरळ फसते आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १६ जुलै, २०१८

तडका - शेतकरी

शेतकरी

शेतकरी झटला-झटला
मोबदला भेटला नाही
जगण्यासाठी कर्ज केले
कर्जातुनही सुटला नाही

निमुटपणे सहन केले
तरी त्याला घाटा होतो
हक्कासाठी संघर्ष केला
तरी त्याचा तोटा होतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १२ जुलै, २०१८

तडका - अत्याचार

अत्याचार

हिंसक विचार सरणीचे
कित्तेकांना फॅड आहेत
जाणीवहीन माणसांचे
डोकेच जणू मॅड आहेत

सारं काही कळत असुनही
विचार त्यांचे सडले आहेत
म्हणून तर हल्ली समाजात
अत्याचारही वाढले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ११ जुलै, २०१८

तडका - एक वास्तव

एक वास्तव

प्रवास आणि खड्ड्यांचं
हे नातं भलतं जुनं आहे
कित्तेक रस्त्या-रस्त्यांवर
खड्ड्यांचंच ठाणं आहे

मुदत संपण्या आधीच कुठे
रस्त्यात खड्डे साकार आहेत
हे उचकटलेले रस्ते म्हणजे
बेइमानीचे शिकार आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० जुलै, २०१८

तडका - सुविचार

सुविचार

रोज-रोज वाचले तरीही
रोज अजुन नवे आहेत
वेग-वेगळ्या वेबसाइटवर
सुविचारांचे ठेवे आहेत

सोशियल मिडीया प्रभावी
कॉपी पेस्टच्या संधी आहेत
पण सुविचार वाचुन देखील
इथे वागणे अनागोंदी आहेत ?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ९ जुलै, २०१८

तडका - पाऊस हाल

पाऊस हाल

मुंबईचा पाऊस बघा
लक्षवेधक ठरू लागला
कोसळता कोसळता
फजितीही करू लागला

आपल्या शहरी रचनेचे
हे आपत्ती फळे आहेत
ठरवू नका कोणीच की
हाल निसर्गामुळे आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ८ जुलै, २०१८

तडका - पावसाळा

पावसाळा

"येतच नाही येतच नाही"
लोक भलते कष्टी होते
म्हणूनच की काय ही
संततधार अतिवृष्टी होते

अजुन लांबता संततधार
बळही मिळेल नवसाला
मनी आकांक्षा वाढू लागेल
मीटर असावेत पावसाला

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ७ जुलै, २०१८

तडका - घोटाळे

घोटाळे

दाबले जातात, राबले जातात
कधी ऊत्स्फूर्त काढले जातात
विकासाच्या नावावरती देखील
इथे हे घोटाळे घडले जातात

याला सत्तेचीच गरज नसते
सत्तेविनाही हे होऊ शकतात
दुसर्यांना दगड मारणारेही
काचेच्या घरात राहू शकतात ?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ६ जुलै, २०१८

तडका - जलदान

जल दान

वाट पाहता पाहता
लोक आतुर होते
पावसाळी दिवस
तरीही फितुर होते

आता येता पाऊस
आनंदी उधाण आहे
या तापलेल्या भुईस
नैसर्गिक जलदान आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ५ जुलै, २०१८

तडका - अफवा एक हत्यार

अफवा एक हत्यार

नुसती अफवाच फिरता
त्यावर संशयही स्वार होतो
अन् संशयापोटी कधी कधी
निरापराधांवरही वार होतो

निरापराधांना शिक्षा नसावी
लाख मोलाचा विचार आहे
अफवाची पडताळणी करा
अफवा घातक हत्यार आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ४ जुलै, २०१८

तडका - पुल एक झुल

पुल एक झुल

वरून दिसला तगडा तरीही
आतुन सारा बेगडा असतो
अन् मुदतपुर्व तूटणारा पुल
व्यवस्थेखालचा रगडा असतो,.?

कागदोपत्री परिपक्वतेची
नको तितकीच हूल असते
पण वास्तवात हे पुल म्हणजे
फक्त देखाव्याची झुल असते,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २ जुलै, २०१८

तडका - सत्याचे सत्य

सत्याचे सत्य

पुर्वीपासुनही ऐकतो आहोत
असत्य कधीच जिंकत नाही
ऊशिर होतो सत्य जिंकण्या
पण असत्यापुढे झूकत नाही

सत्य जिंकण्याच्या आशेवर
जिंदगी देखील वाहिली जाते
अन् सत्य जिंकण्याची वाट
वाट लागुस्तर पाहिली जाते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३