हा ब्लॉग शोधा

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

तडका - सरकारी धोरण

तडका

सरकारी धोरण

पिकवली सोयाबीन
करून करून कष्ट
विक्रीस होणार त्रास
दिसु लागले स्पष्ट

कष्टाची किंमत घेण्या
शेतकरी हरू लागले
सरकारचे धोरण बघा
गैरसोयी ठरू लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

तडका - झणका

तडका

झणका

आजकालच्या लोकांचा
भरवसाच नाय रे सोनु
ज्याची केली स्तुती तोही
बालिश लागलाय म्हणू

ज्याला बघावं तो इथे
कामापुरता गोड आहे
स्वार्थ साध्य होताच मग
अटळ गद्दारी मोड आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

तडका - अस्पष्ट मैत्री

अस्पष्ट मैत्री

दिसणारी मैत्री ही
निव्वळ फेको आहे
सत्ता हवी आहे पण
एकी मात्र नको आहे

त्यांच्या मैत्रीचा जणू हा
ओझरताच झुला आहे
विरोधकांच्या स्तुतीतही
मित्रत्वाला टोला आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

तडका - दिवाळी एक मुहूर्त

दिवाळी एक मुहूर्त

दिवाळी प्लॅनिंग करताना
केंद्रस्थानावर वित्त असते
कित्तेक कित्तेक व्यवहारांत
दिवाळीचेच निमित्त असते

रखडलेल्या व्यवहारांनाही
दिवाळी मुहूर्त कळवू लागलात
अन् दिवाळीच्या नावाखाली
लोक व्यवहार चालवु लागतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

तडका - राजकीय बोध

राजकीय बोध

कधी येतात,कधी जातात
हा राजकीय भाग आहे
लोकही तिकडेच पळतात
जिकडे सत्तेची बाग आहे

आपल्यात आले तर खुश
आपले गेले तर क्रोध आहे
अन् स्वार्थापुरतीच पक्षनिष्ठा
यातुन हाच तर बोध आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

तडका - मैत्री एक सोंग

मैत्री एक सोंग

एक-मेकांवर टिका करण्या
जरा देखील कमी नाही
कोण ग्वाही देईल सांगा
की यांच्यात खुमखुमी नाही

यांनी कितीही मैत्री सांगु द्या
आता विश्वासच बसत काही
हे म्हणायला मित्र असले तरी
मैत्रीचा लव-लेश दिसत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सत्तेचे स्वप्न

सत्तेचे स्वप्न

कुठे यश मिळते तर
कुठे अपयशही येते
विश्वासाने दिलेली
फेल ग्वाहीही जाते

तरी देखील उमेदीने
मनं सावरले जातात
सत्तेत जाण्याचे स्वप्न
गप्प आवरले जातात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

तडका - पाऊस

पाऊस

नको तितका पाऊस बघा
आता रोजच होऊ लागला
अन् दैनिक कामात व्यत्यय
पावसामुळेच येऊ लागला

पावसाच्या वार्ता ऐकल्याने
दबकुन दबकुन राहू लागले
अन् घराबाहेर जाण्याआधी
लोक पाऊसच पाहु लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

तडका - राजकीय निशाणा

राजकीय निशाणा

कधी कधी वार जबरा तर
कधी फक्त बहाणा असतो
राजकारण करताना मात्र
प्रत्येकजण शहाणा असतो

म्हणूनच टिकांच्या मार्यात
मुद्दाम सदैव घोळलं जातं
अन् वेग-वेगळ्या पध्दतींनी
हे राजकारण खेळलं जातं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

तडका - एक कटाक्ष

एक कटाक्ष

राहूलजींच्या तोंडून पुन्हा
नवा शाब्दीक तोडा आला
खोटं ऐकुन ऐकुन तर
विकास म्हणे वेडा झाला

त्यांच्या मते देशामध्ये
अधोगती पोसली आहे
अन् विकासाच्या प्रतिक्षेत
जनता इथली बसली आहे

हा अधोगतीचा गंभीर मुद्दा
आता लक्षात घ्यायला हवा
अन् विकासाचा प्रकाशझोत
आता जनतेत यायला हवा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

तडका - निकाली अंदाज

निकाली अंदाज

येणारांचे आणि जाणारांचे
मनात गणित हेरले जातात
एकुन झाल्या मतांमधुन तर
इक्झिट पोलही ठरले जातात

मनातील मताचे हिशोब हे
प्रबळ आशा पेरून जातात
पण कधी हे अंदाज खरे तर
कधी खोटेही ठरून जातात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - समीक्षा

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

तडका - कल

कल

कधी जवळचे दुर
कधी दुरचे जवळ
गावाकडचे इलेक्शन
लढले जातात प्रबळ

म्हणूनच तर पुर्ण जोर
इलेक्शनला लावला जातो
पण मतदारांचा कल मात्र
निकालातुनच दावला जातो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

तडका - प्रचार

प्रचार

कधी ऊघड ऊघड
कधी मात्र गुपित
हा प्रचार केला जातो
एकेक मत मापीत

एकेक मत मिळुन
फायदा ठरला जातो
म्हणूनच हा प्रचार
डोक्यात हेरला जातो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३