शाब्दिक वॉर
ना तलवारीची गरज
ना बंदूकही हवी आहे
हल्ली युध्दांची पध्दत
अगदीच नवी आहे
प्रत्यक्षात न येताही
दडून वार करता येतो
जिव्हारी लागेल असा
टामणा-टोमना मारता येतो
राग-द्वेश अन् षडयंत्रही
मना-मनावर स्वार आहेत
ऑनलाइन टू ऑनलाइन
हल्ली शाब्दिक वॉर आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा