हा ब्लॉग शोधा

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

तडका - निवडणूकीय निकाल

निवडणूकीय निकाल

कुणाला होतात गुदगुल्या तर
कुणाला मात्र धक्के बसतात
निवडणूकीय निकाल म्हणजे
लोकशाहीतील एक्के असतात

विरोधकांचा विजय पाहून पाहून
डोक्यात न सोसती जळजळ असते
थोडक्यात हूकलेली बाजी म्हणजे
मनातल्या मनातही हळहळ असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सुट्टे

रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

तडका - लाच एक कलंक

लाच एक कलंक

कितीही नाही म्हटलं तरी
अंधारातुन चालु आहे
लाच देणे-लाच घेणे
जणू व्यवहाराचा पैलु आहे

मात्र लाच देणे-घेणे
समाजात थांबायला हवे
अन् लाचेच्या व्यवहारवाले
तुरूंगात कोंबायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

तडका - इशारा धोक्याचा

इशारा धोक्याचा

काळाच्या ओघात माणसं
बदलत चालली आहेत
माणसांशी वागतानाही
माणसांवर कलली आहेत

माणसांशी माणसांचेच
अंदाज धुक्यात आहेत
इथे पाळणाघरं देखील
आता धोक्यात आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

तडका - लोकशाहीची खरी ताकत

लोकशाहीची खरी ताकत

विनवण्या वर विनवण्या
वारंवार होऊ लागल्या
पक्षवार प्रचार गाड्याही
दारात घिरट्या घेऊ लागल्या

पण भ्रष्ट आणि कुचकामींवर
आता जनता कोपयला हवी
लोकशाहीची खरी ताकत
लोकांमध्येच दिसायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

तडका - चंगळ

चंगळ

हि नोटाबंदीची स्वारी
देशभरात फिरली आहे
काळ्या पैशाची किंमत
कवडीमोल ठरली आहे

म्हणूनच काळा पैसा म्हणजे
आता रिकामी ओंजळ आहे
आणि ज्यांच्याकडे पैसा नाही
त्यांच्याच मनात चंगळ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

तडका - आपले अधिकार

आपले अधिकार

माणसं फसतात म्हणून
सहज फसवले जातात
पैशाचे अमिश दाखवुन
सहज ऊसवले जातात

स्वाभिमान ठेवत गहाण
कुणी पैशा पुढे झूकू नयेत
माणसांनी आपले अधिकार
कवडीमोल विकू नयेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

तडका - प्रचार गाडी

प्रचार गाडी

वेग-वेगळ्या रंगांचे
ते बांधुनिया झेंडे
मागे-पुढे गाडीच्या
हो टांगुनिया भोंगे

इकडून तिकडे फिरे
ते वाजवित गाणे
मतं द्या द्या म्हणत
कुणी आतुन गुणगुणे

आजु-बाजुला लटकलेली
बॅनरची झळाळी आहे
या प्रचाराच्या गाडीची
गल्लोगल्ली तलाली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

शिवार स्वप्न

----------( शिवार स्वप्न )----------

बीज पेरल्या मातीमधी
अंकुर लागलं फूटायला
हिरवा शालु नेसुन जणू
धरणी लागली नटायला

देऊन मायेचं खात आज
नजरेनं ठोंबांना गोंजारलं
खुशी-खुशीने डोले पीक
पाहून जीवाचं मन भरलं

मना-मनातील आशेमधलं
शिवार लागलं फूलायला
उदार मनातील हेरलेलं हे
सपान लागलं जुळायला

या स्वप्नाचे माणिक मोती
शेता-शेतात चमकतील
पाहूनी यांना नजरेचे झोत
मनाच्या मनात ठुमकतील

शिवार पाहून खुलु लागले
सारे धरणी आईचे लेकरं
नशिबातल्या दारिद्र्याची
म्हणे चुकेल आता ठोकरं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदरील कविता ऐकण्यासाठी आणि डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

तडका - सासु दहन

सासु दहन

हिवाळा सुरू होताच
सासुची आठवण येते
शेकोटीसाठी सासुची
आपुलकीने साठवण होते

मग सासुच्याच मदतीने
ती थंडीही ऊबवली जाते
सासु दहनाची हि परंपरा
राजरोसपणे राबवली जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पश्चाताप

पश्चाताप

कुठे अग्नीत तर कुठे
पाण्यामध्ये बुडू लागला
अंधारातला काळा पैसा
आता बाहेर पडू लागला

म्हणूनच तर नोटाबंदीचा
कुणाला रागही आला असेल
अन् अंधाराचा पश्चाताप तर
काळ्या पैशालाही झाला असेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

तडका - तीची धुंदी

तीची धुंदी

मी दुरच होतो पण
ती जवळ आली होती
माझ्या एकटेपणाला
तीने साथ दिली होती

आता तिच्याच साथीची
मनावरती हि धुंदी आहे
मला आपलंसं करणारी
ती प्रेमळ थंडी आहे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

तडका - आपला आनंद

आपला आनंद

आपला आनंद आपल्याला
सदैवच प्रिय असतो
आपल्या आनंदामागे इतरांचाही
सहभाग सक्रीय असतो

मिळालेला आनंद उपभोगताना
ऊगीच हूरळून जाऊ नये
आपल्या अल्पशा आनंदाचा
इतरांना त्रास देऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

तडका - सल्ला नोटांविषयी

सल्ला नोटांविषयी

कुठे अग्नीत आहेत तर
कुठे पाण्यात आहेत
रद्द झाल्या जुन्या नोटा कुठे
कचर्याच्या गोण्यात आहेत

मात्र हि चुकीची पध्दत
माणसांनाही कळली जावी
आणि जुन्या नोटांचीही
अवहेलना टळली जावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

तडका - क्षण बालपणीचे

क्षण बालपणीचे

आपलं बालपण स्मरूणही
मन अलगद हसुन घेतं
आपल्यासह इतरांचंही
लगेच बालपण दिसुन येतं

बाल मनावरती कोरलेले हे
अविस्मरणीय वण असतात
म्हातारपणालाही सुखावणारे
हे बालपणीचे क्षण असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बनावटीच्या कारस्थानात

बनावटीच्या कारस्थानात

काळा पैसा बाहेर काढण्या
चलनी बाजु ताणल्या गेल्या
अपव्यवहार टाळण्यासाठी
नव्या नोटा आणल्या गेल्या

हजार पाचशेच्या बंद करून
दोन हजाराची नोट नटली आहे
पण बनावटीच्या कारस्थानातुन
हि नवी नोटही ना सुटली आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

तडका - काळ्या पैशाचे गुपित

काळ्या पैशाचे गुपित

सरळ सरळ व्यवहारही
वाकडा-तिकडा घुमवला
जीवही घालुन धोक्यात
तो काळा पैसा कमवला

त्यालाच लपवता लपवता
कुणाची जिंदगी बुडाली असेल
मात्र तोच खपवता खपवता
आता तारांबळ ऊडाली असेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

तडका - नोटा बंद इफेक्ट

नोटा बंद इफेक्ट

हजार-पाचशेच्या नोटांची
धडाक्यास किंमत थिजली
मोदींनी घेतल्या निर्णयाची
देशभरातही चर्चा गाजली

या निर्णया विरोधात कुणी
राजरोसपणे वळू लागतील
सामान्यांच्या नावाखालीही
स्वत:चे दळणं दळू लागतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

तडका - जश्न

जश्न

आपल्याकडील नोटांचा
लोक हिशोब लाऊ लागले
हजार- पाचशेच्या नोटांचं
डोक्यात टेंशन घेऊ लागले

कुठे कशा खपवाव्यात
ज्याला-त्याला प्रश्न आहे
ज्यांच्याकडे नोटा नाहित
त्यांच्या मनात जश्न आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

गोष्ट नोटांची

गोष्ट नोटांची

बायको म्हणाली नवर्याला
अहो माझं ऐकुन घेता का,.?
हजार पाचशेच्या नोटा घेऊन
बँकेतुन बदलुन देता का,...?

बायकोचे बोल ऐकताक्षणी
नवर्याला नवल वाटू लागले
बायकोने नोटा हातात देता
तीचे बोलणेही पटू लागले

बायको विषयी त्याच्या मनात
विश्वासु पणत्या तेवल्या होत्या
नवर्याच्या चोरी गेलेल्या नोटा
बायकोने जपुन ठेवल्या होत्या

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

तडका - जुनं प्रेम

जुनं प्रेम

ती जवळ असली की
मी भलता खुलायचो
रूबाबामध्ये तीच्यासवे
ऐटी-ऐटीत चालायचो

तीला आपलं मानुन मी
ह्रदयामध्ये जागा दिली
पण आता मात्र आमच्या
ब्रेकअपचीच वेळ आली

माझ्यासाठी ती सदैवच
प्रेमाची तेवती ज्योत होती
जीच्यावरती मी प्रेम केलं
ती हजाराची जुनी नोट होती

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पक्ष नेतृत्व

पक्ष नेतृत्व

कधी असतो विश्वास तर
कधी मात्र डाऊट असतो
पक्ष नेतृत्व कमजोर तर
पक्ष देखील आऊट असतो

पक्ष दणकट करण्यासाठी
कार्यकर्त्यांनीही कसायला हवे
म्हणूनच राजकीय पक्षांचे
नेतृत्व दणकट असायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

तडका - डाव चुलता-पुतण्यांचे

डाव चुलता-पुतण्यांचे

कित्तेकांना लागु पडणारे
हे टवटवित टोमणे आहे
कित्तेक राजकीय डावांत
चुलता-पुतण्या सामने आहे

स्वत:चं वेगळं अस्तित्व आता
कित्तेक पुतणे सांगायला लागले
चुलता-पुतण्यांचे डावही हल्ली
राजकारणात रंगायला लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

तडका - आघात

आघात

विश्वासाची हमी
ना ऊरली ऊरात
माणूस फसतो आहे
विश्वासाच्या धूरात

जिथे टाकला विश्वास
तिथेही होतोय घात
माणूसकीवर माणसंच
करू लागले आघात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

तडका - बिझनेस फॅक्ट

बिझनेस फॅक्ट

वस्तुंची मागणी पाहून
उपलब्ध करतात साठा
मात्र कधी गरजा पाहून
गेमही करतात मोठा,...!

मोठा फायदा घेण्यासाठी
छोटा तोटा घेतला जातो
या षढयंत्रांच्या कारस्थानात
सामान्य माणूस पीडला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

तडका - राजकीय टाळी

राजकिय टाळी

खालच्या उमेदवारांचीही
वरूनच तर असते हेरणी
आटकलीने टाकतात डाव
इथले तरबेज राजकारणी

एक एक डावही जणू
धोबीपछाड खेळी असते
न सापडणारी गोष्ट म्हणजे
कुणाची कुणाला टाळी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

तडका - ऊचल

ऊचल

दिपावली संपते तोच
नव-नवे पेच वाढू लागले
पोटाची खळगी भरण्या
लोक गावही सोडू लागले

दिन-रात एक करून
ते ऊचल मिटवीत आहेत
नशिबाच्या ऊचली मात्र
अजुनही टवटवित आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बहिण

बहिण

भाऊबिजेच्या मंगल दिनी
मन अगदी भर-भरून जातं
अन् आनंदाने नटुन येतं
बहिण भावाचं प्रेमळ नातं

पण या प्रेमळ नात्यातील
संस्कारशील काया टिकावी
मुलींना देऊन समान दर्जा
भावांसाठी बहिण जपावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३