हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

तडका - नवे वर्ष

नवे वर्ष

जुने साल संपुन गेले
नव वर्षाचे स्वागत करू
दोषांना देऊन सोडचिठ्ठी
नव-नवे गुण पारंगत करू

वाढवु प्रेम,आपुलकीला
माणूसकीला देऊन साथ
हे नवे वर्ष जावो सर्वांना
यशभरीत आणि आनंदात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अंगठा एक ओळख

अंगठा एक ओळख

विविध कामांसाठी माणूस
सहज अंगठा मारतो आहे
अशिक्षितांसह शिक्षितांचीही
अंगठा ओळख ठरतो आहे

अंगठ्याने ओळख देण्या-घेण्या
नव-नविन जाळे विणू लागले
डिजिटलच्या नावाखाली लोक
अंगठे बहाद्दर बनु लागले,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

तडका - नोटांचे अच्छे दिन

नोटांचे अच्छे दिन

रांगाच्या रांगा लाऊन पैसे
बँकेत जमा केले आहेत
जमा केलेले कित्तेक पैसे
बँकेमध्येच गुंतले आहेत

कित्तेकांनी तर दावा केला
हि नोटाबंदी फसली आहे
पण अच्छे दिनच्या प्रतिक्षेत
जनता अजुनही बसली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

तडका - नोटाबंदीची फिफ्टी

नोटाबंदीची फिफ्टी

एका पाठोपाठ एक असे
आळीपाळीने बोलु लागले
नोटाबंदीच्या निर्णयाला
आता रोजच घोळू लागले

आर्थिक व्यवहारांना म्हणे
अजुनही ना सेफ्टी आहे
विरोधकांच्या रडारवरती
नोटाबंदीची फिफ्टी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

तडका - चर्चेतील बोलणे

चर्चेतील बोलणे

निवडणूका जवळ येतील
तसे सुत्रही हलले जातात
नव्या सह जुन्या कामांना
चर्चे मध्ये सोलले जातात

चर्चेतुन बाहेर पडणारे बोलणे
कधी फेकु कधी रास्त असतात
यात झालेले कामं कमी पण
न झालेले कामं जास्त असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

तडका - व्हाटस्अप Dp

व्हाटस्अप Dp

व्हाटस्अप चा वापर म्हणजे
हा तर दैनंदिन घटक आहे
असा व्यक्ती दुर्मिळ आहे जो
व्हाटस्अप पासुन तुटक आहे

दिवस-रात्र व्हाटस्अप वरती
आता माणसं सहज रंगु लागले
कुणाच्या मनात काय आहे ते
व्हाटस्अप Dp सांगु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

तडका - जीवनात

जीवनात

जिद्द आणि चिकाटी सह
ध्येय साध्य करता येतं
मन ध्येयवेडं असेल तर
अंगात बळ ही भरता येतं

जिद्दीच्या जोरावरच तर
यश सदैव हसु लागतं
लढणं समजुन घेतलं तर
जगणंही गोड दिसु लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

तडका - खिल्ली एक हत्यार

खिल्ली एक हत्यार

कोण कसली टिका करील
याचा काहिच नेम नसतो
असा नेता दुर्मिळ आहे की
ज्याकडे टिकेचा गेम नसतो

राजकारण करत असताना
टिका-टिप्पन्नी खेळली जाते
गंभीर आरोपांची बाजु देखील
खिल्ली ऊडवत टाळली जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

तडका - घोषणाबाजी स्पेशल

घोषणाबाजी स्पेशल

आरडा-ओरडा करण्यासाठी
अंगात जोर भरला जातो
जीव पिळवटून गेला तरीही
घोषणांवर ताव मारला जातो

प्रत्येक घोषणाबाजी मधून
होणारे इफेक्ट सोशल असतात
म्हणूनच काहि कार्येकर्ते सदा
घोषणाबाजी स्पेशल असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

तडका - नावामागचे सत्य

नावामागचे सत्य

अपत्याचे काय नाव ठेवावे
हा अधिकार पालकांचा आहे
कोणी काहिही ठेऊ शकतो
हा प्रभाव विचारांचा आहे

मात्र पाल्याच्या भविष्याचीही
कधीच नावामुळे झलक नसते
ज्याच्या-त्याच्या कर्तृत्वानुसार
ज्याची-त्याची ओळख असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - व्यवस्थेतील तिमिर

व्यवस्थेतील तिमिर

सहज सांगता येत नाही
की कोण किती लबाड आहे
सुरतच्या चहावाल्याकडेही
दोन हजार कोटींचं घबाड आहे

कसं आलं अन् कुठून आलं
हि गोष्टही मोठी गंभीर आहे
कोणीही घबाड कमवु शकतो
हा तर व्यवस्थेतील तिमिर आहे,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

तडका - अॅडमीनची सुटका

अॅडमीनची सुटका

हल्ली व्हाटस्अप वापरणं
जणू गरजेचं वाटत आहे
व्हाटस्अपमुळे कित्तेक काम
सहज सहज निपटत आहे

अंगलट येणारी ग्रुपची बाजु
दिशा बदलुन वळली आहे
ग्रुप मेंबरच्या चुकांची शिक्षा
अॅडमीन वरून टळली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

तडका - यंत्रणेतील घोळ

यंत्रणेतील घोळ

कैद्यांना बंदिस्त ठेवताना
जणू लक्ष घसरू लागले
कारण जेल मधील कैदीही
आता मोबाईल वापरू लागले

कितीही नाही म्हटलं तरी
हा मॅनेजमेंटचा झोळ आहे
कैद्यांनी मोबाईल वापरणे
हा यंत्रणेतील घोळ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

तडका - प्रांजळ सत्य

प्रांजळ सत्य

निवडणूकांना समोर ठेऊन
सांगे लोकांना विचार करा
मतदानापुर्वी येणार्या लक्ष्मीचा
"दान"वे म्हणाले स्वीकार करा

पण स्वाभिमान गहाण ठेवला तर
अंधविश्वासात जनता फसु लागेल
अन् मतदार जागृत असतील तर
लोकशाही जागृत दिसु लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कांद्याचा भाव

कांद्याचा भाव

लोकांना कांदा चारणाराही
आज कांद्यानेच खचला आहे
राब-राब राबुनही शेतकर्याला
कष्टाचा घास ना पचला आहे

विक्रमी ऊत्पादन करूनही
मार्केटींगमध्ये तो हरू लागला
कारण घसरता कांद्याचा भाव
डोळ्यात पाणी भरू लागला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

तडका - सांगा आता

सांगा आता,...!

नोटा बंदीच्या निर्णयानंतर
हि नविनच उत्तेजना आहे
काळा पैसा पांढरा करण्या
आता सरकारी योजना आहे

पन्नास टक्के टॅक्स भरून
पैसा पांढरा करता येईल
पण काळं झालेलं चारित्र्य
सहज कसं तारता येईल,...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

तडका - गोंधळ दिन,...!

गोंधळ दिन,...!

अनेक प्रश्नांचं निरासरण
अधिवेशनात केलं जातं
मात्र प्रत्येक अधिवेशन
अडचणीमध्ये आलं जातं

संसदीय कामकाजात
रोज गोंधळ करू लागले
अधिवेशनातील दिवसही
गोंधळ दिन ठरू लागले,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - "बोलणं" एक कला

"बोलणं" एक कला

बोलु दिलं जात नाही
हि जाहिर खंत आहे
अनेकांच्या बोलण्यात
हाच मुद्दा फ्रंट आहे

जर कुठे बोलु दिलं नाही तर
गपगुमानपणे बसावं लागतं
मात्र बोलणं ऐकवायलाही
कौशल्यच असावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कायद्याचा खुटा

कायद्याचा खुटा

वेग-वेगळ्या ठिकाणी
रोज धाडी पडू लागल्या
रोकड जप्तीच्या घटना
दिवसें-दिवस वाढू लागल्या

काळा पैसा पांढरा करण्या
कित्तेकांचा आटा-पिटा आहे
पण गैरव्यवहार टाळण्यासाठी
कायद्याचा आडवा खुटा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

तडका - नोटाबंदीच्या रडारवर

नोटाबंदीच्या रडारवर

या नोटाबंदीच्या निर्णयाला
कुणी म्हणे डोळ्यात धूळ आहे
तर हे गरिबांविरोधातील युध्द
अशी राहूल यांचीही हूल आहे

आप-आपल्या विचारांनुसार
कुठे विरोध कुठे समर्थन आहे
मात्र नोटाबंदीच्या या निर्णयात
रडारवरती काळे धन आहे,...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

तडका - जबाबदार व्यक्तिंनो

जबाबदार व्यक्तिंनो

चर्चेत राहता येतं म्हणून
ऊगीच काहिही बरळू नये
स्वत:च्या असभ्यपणाचं
स्वत:च वलय तरळू नये

शब्द शस्र असतात हे
कळत नकळत पाळावं
जबाबदार व्यक्तींनी सदा
तारतम्य बाळगत बोलावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

तडका - डिजिटल धोका

डिजिटल धोका

व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले

व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - मुलींची शैक्षणिक सुरक्षा

मुलींची शैक्षणिक सुरक्षा

स्री-पुरूष समानतेचा
समाजात तराजु आहे
मुलींना शाळेत धाडणं
हि प्रगतीची बाजु आहे

मुली शाळेत जाऊन
शिक्षण घेऊ लागल्यात
मात्र मुलींच्या सुरक्षेच्या
समस्याही येऊ लागल्यात

ज्यांच्यावरती विश्वास ठेऊन
मुलींना शाळेत धाडलं आहे
त्यांनीच नराधमी कृत्य करून
नैतिकतेलाही गाडलं आहे,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

तडका - ATM ची बोंबाबोंब

ATM ची बोंबाबोंब

हजार पाचशे बंद झाले
दोन हजाराचे सुट्टे नाहित
हमखास सुट्टे देण्यासाठी
कुणी स्वेच्छेने हट्टे नाहित

हा रोकडीच्या समस्यांचा
रोज वाढता कोंब आहे
आत्ता मिळेनात म्हणून
ATM ची बोंबाबोंब आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १० डिसेंबर, २०१६

तडका - आंदोलनं

आंदोलनं

जसे बोलुन तंडता येते
तसे मुक्यानेही भांडता येते
समस्यांसह मागण्यांचे तिडे
आंदोलनातुन मांडता येते

म्हणूनच आता आंदोलनंही
प्रभावीपणाचे ठरू लागलेत
अन् वेग-वेगळ्या प्रकारांसह
लोक आंदोलनं करू लागलेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

तडका - आरक्षण

आरक्षण

मागण्यांवरती मागण्या
सतत सतत होत गेल्या
तशा अश्वासनीय घोषणा
सरकारकडून येत गेल्या

जुन्यासह नव्या सरकारचा
फक्त अश्वासनीय पुर आहे
घोषणा कित्तेक आल्या पण
आरक्षण अजुनही दूर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

तडका - प्रवास

प्रवास

वेगावरती ठेऊन नियंत्रण
व्यसनांना आळा घालावा
जेव्हा गरज नसेल तेव्हा
प्रवास शक्यतो टाळावा

परिवहन गरज आहे पण
प्रवास प्राणावर नसावेत
रस्ते सुरक्षितते बरोबरच
ड्रायव्हर भानावर असावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आनंद थंडीचा

आनंद थंडीचा

झुळझुळणार्या वार्यासह
रमत रमत येते आहे
थंडीच्या या येण्याने ही
गंमत जंमत होते आहे

थंडीच्या गमती जमतीची
हि अवर्णनिय मजा आहे
थंडीचा आनंद उपभोगताना
दातांचाही गाजा-वाजा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

तडका - बाबासाहेब

बाबासाहेब

वादळातही तेवणारा
प्रकाशमान दिवा होते
समाजिक क्रांतीसाठी
समाजाची दवा होते

त्यांच्याच तर तेजामध्ये
आजही देश नांदतो आहे
अन् त्यांच्या विद्वत्तेला
जगही सारा वंदितो आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

हे ज्ञानसूर्य भिमराया

हे ज्ञानसूर्य भिमराया

तुमच्या प्रतिभेचा दिव्यपणा
मना-मनाला कळतो आहे
तुमच्या ज्ञानाचा प्रकाशझोत
जगभरातही दरवळतो आहे

जो-तो आता झूकतो आहे
तुमचे विचार शिकतो आहे
तुम्ही दिलेल्या तत्वांमुळे
समाजातही या टिकतो आहे

राष्ट्रीय बांधिलकी जोपासत
माणूस माणसाला प्रिय झालाय
जाती-धर्माला न देता थारा
तुमचा समाज भारतीय झालाय

भारत एकसंध नांदतो आहे
हि तुमचीच अमुल्य भेट आहे
तुम्ही केलेली ही राष्ट्र निर्मिती
आजही जगभरात ग्रेट आहे

कर्तृत्वाच्या जोरावरती
सामान्य सत्ताधारी झाले आहेत
तर सत्तेत उन्माद करणारेही
घटनेने पायऊतार केले आहेत

तुमच्या राज्य घटनेमुळेच
हि एकात्मता टिकलेली आहे
तुम्ही दिलेली ही लोकशाही
जगभरातही जिकलेली आहे

आयडॉल ऑफ नॉलेज म्हणून
जगभरात तुमचाच अदर्श आहे
तुमचा जगभरातील गौरव पाहून
आमच्या मनाला हर्ष आहे

तुमच्या मुळेच जगात श्रेष्ठ
या देशालाही स्थान आहे
हे ज्ञानसूर्य भिमराया
तुम्हा मानाचा हा प्रणाम आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9760573783

-------------------------------

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदर कवितेचा व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक :- https://youtu.be/MLHTlH9KESA

* चालु घडामोडीवर आधारित डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

तडका - पैशाचा ताळा

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

तडका - कॅशलेस

कॅशलेस

देश डिजिटल करताना
नव-नवे फंडे येऊ लागले
डिजिटलचं लेबल घेऊन
व्यवहार कॅशलेस होऊ लागले

व्यवहार कॅशलेस केले तरी
रोखीचा फतवा खिजवत बसेल
हाताने पैसे मोजण्याची सवय
रोज-रोज हात खाजवत बसेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

तडका - गोल्ड टार्गेट

गोल्ड टार्गेट

सोनं खरेदी करण्यासाठी
मर्यादांचं बंधन आलं आहे
तसं बायकोच्या हट्टी पणात
नविनतम स्पंदन आलं आहे

सरकारचा नवा नियम ऐकुन
तिनेही टूम-टूम लावलेलं आहे
अन् ५०० ग्रॅम सोनं खरेदीचं
बायकोनेही टार्गेट ठेवलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

तडका - सोनं खरेदी

तडका - अस्तित्व ओळख

अस्तित्व ओळख

कुणासाठी फजिती तर
कुणासाठी आनंद आहे
थंडीचा कसा अर्थ घ्यावा
ज्याचा-त्याचा छंद आहे

वेग-वेगळ्या अर्थासह
हल्ली थंडी येऊ लागली
तापमानाला खेचत खेचत
अस्तित्व ओळख देऊ लागली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३