हा ब्लॉग शोधा

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

तडका - गोड बोलणे

गोड बोलणे

बोलायचं असतं म्हणून
बोलणं नसावं गोड
गोड बोलण्याची मनी
नेहमी असावी ओढ

तेव्हाच हे गोड बोलणे
खर्या अर्थाने सार्थ होईल
नसता हे गोड बोलणेही
सरळ सरळ व्यर्थ होईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १३ जानेवारी, २०१९

तडका - २०१९ विशेष

२०१९ विशेष

गल्ली-गल्लीतील चर्चांना
भलतच उधाण आलंय
कुणा तोंडी टिका तर
कुणा तोंडी गुणगान झालंय

आपला नेता, आपला पक्ष
पोटतिडकीने मांडू लागले
हे इलेक्शनचे वादळ वारे
गल्लो-गल्ली नांदू लागले,...

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

तडका - जागांची घोकणपट्टी

जागांची घोकणपट्टी

योग्य जोडीदार मिळावा
सर्वांचीच  आशा असते
म्हणूनच इलेक्शन येता
इथे युतीची भाषा असते

मनात कट्टी असली तरी
वरून वरून गट्टी असते
इलेक्शन जवळ येताच
जागांची घोकणपट्टी असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

तडका - आमची खंत

आमची खंत

शिकला जरी समाज
तरीही मनी खंत आहे
वैचारिकतेची गती इथे
अजुनही का संथ आहे

सावित्रीच्या लेकींचा इथे
अजुनही बाट होतो आहे
शिकलेल्यांच्याही मतीत
अविचारी घाट येतो आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १ जानेवारी, २०१९

तडका - हॅप्पी न्यु इयर

हॅप्पी न्यु इयर

सालाने काळ पुढे सरकता
मनात चेतना आली जाते
शुभेच्छांची आयात-निर्यात
मग ऊत्साहाने केली जाते

वार्षिक सुख-समृध्दीच्या आशा
ढोबळ मनाने धाडल्या जातात
अन् वाइट क्षणांच्या पालव्याही
निर्गमन्याआधी खुडल्या जातात

अशीच आपुलकी टिकुन राहो
मनात हिच प्रबळ इच्छा आहे
हिच वर्षानुवर्षे माणवतेसाठी
आमची शुभेच्छा सदिच्छा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३