हा ब्लॉग शोधा

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

तडका - घरचा घनाघात

घरचा आहेर

बाहेरचे विरेध टाळताना
अंतर्गत वाद ऊफाळतात
अशा अवस्था पाहून तर
कित्तेक मनंही हळहळतात

आयता विषय रंगवण्याला
पानामधला कात असतो
कधी प्रेमाने,कधी द्वेशाने
हा घरचा घनाघात असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कर्तव्य पार पाडताना

कर्तव्य पार पाडताना

अहो कर्तव्याचे वारे
ऊलटपणे फिरू नये
दिल्या अधिकारांचा
गैरवापर करू नये

सामाजिकतेशी ऊगीच
ठेऊ नयेत दूरावे
आपल्या कर्तव्याशी
एकनिष्ठपणे रहावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, ३० जानेवारी, २०१६

तडका - आपली ओळख

आपली ओळख

कुणी सांगायची गरज नाही
माणूस मनालाच खाऊ लागला
अन् स्वधर्म सांगण्यासाठी
आता अनुपमही भिऊ लागला

पण जाती धर्मा विषयीचा
ऊगीचंच हा काळोख आहे
जाती-धर्म हवेच कशाला
भारतीय आपली ओळख आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शनीच्या रणी

शनीच्या रणी

बाईला प्रवेश बंदी
शनी तुझ्या दारात
बाई समजली तुच्छ
या सामाजिक धुरात

प्रवेश नाही तर नाही
जाऊच नये त्या रणी
समजुन सांगावे कुणी
बाईने त्यागावा शनी,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

तडका - रेल्वे सुरक्षा

रेल्वे सुरक्षा

वेळही वाचतो आहे
पैसाही वाचतो आहे
कमी वेळेत कमी पैशात
माणूस वेळेवर पोचतो आहे

म्हणूणच तर रेल्वे प्रवास
सामान्यांच्याही आटोक्यात आहे
मात्र व्यवस्थापकीय निष्काळजीने
हल्ली रेल्वे सुरक्षा धोक्यात आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शे.का.प. गरूड भरारी

शे.का.प. गरूड भरारी

स्मार्ट विद्यार्थी बनवण्याला
मदतीचा हात दावला आहे
दुष्काळग्रस्त भागासाठी
हिरीरीने सरसावला आहे

जनकल्याणी कामांमधुन
हल्ली चर्चेत येऊ लागला
शेतकरी कामगार पक्षही
गरूड भरारी घेऊ लागला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - खेळ खेळताना

खेळ खेळताना

जिंकण्याची गॅरंटी नाही
पण जिंकण्यासाठी खेळावं
हारण्याची अपेक्षाच नको
हरवण्या साठी भिडावं

हार होवो की जीत होवो
त्याची पर्वा मुळीच नाही
हरण्याच्या भीतीने खेळणे
ती खेळी खेळीच नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

तडका - अती आनंद धोक्याचा

अती आनंद धोक्याचा

हतबल होऊन रडण्यापेक्षा
ठाम राहून लढत रहावं
दु:खे झूकतील पायापाशी
सुखाची वाट चढत रहावं

पण दु:ख सरलं बाजु म्हणून
ऊत-मातपणा करू नये
अति आनंद धोक्याचा
आपल्याच हातुन ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

तडका - स्वाभिमान लिकेज

स्वाभिमान लिकेज

हूड्यासाठी झाला गुंडा
समाज आमचा जरा
येईल कधी सांगा इकडे
तो विवेकवादी वारा

मुर्दाड झाले ह्रदय त्यांचे
बेईमानी आहे श्वासा-श्वासात
स्वाभिमानही संपले त्यांचे
लिकेज आहेत नसा-नसात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राष्ट्रीय पीडा

राष्ट्रीय पीडा

तुमचा झाकू आम्ही
आमचा झाका तुम्ही
असे भ्रष्टाचारी सुत्र
इथे चालते हो सर्वत्र

नेटवर्क घोटाळेबाजांचे
न सुटता तीडा आहे
हा वाढता भ्रष्टाचार
हो,राष्ट्रीय पीडा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

तडका - ऐक बाई

ऐक बाई

अपायी रूढींचं खुळ सारं
झटक्या सरशी काढ गं
विषमतेच्या भींती सार्‍या
आता मनातुन पाड गं

तुला संविधानानं हक्क दिला
आता चार-चौघात बोलावं तु
प्रगतीची तुच धमनी आहेस
जगाच्या ओघात चालावं तु

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - २६ जानेवारी

२६ जानेवारी

न्याय आहे, हक्क आहेत
आहे एकात्मता अन् समता
भेटला आश्रय संविधानिक
जगण्यात आली निर्भयता

राज्य पध्दती या देशाची
ठरलीय जगात भारी
प्रजासत्ताक या राज्याची
साक्ष देते २६ जानेवारी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

तडका - सलाम तिरंग्याला

सलाम तिरंग्याला

पारतंत्री त्या तिमीरातुनी
ऊगवला आशा किरण
जनते हाती आली सत्ता
हे देश-विकासी धोरण

लोकसत्ताक झाले राष्ट्र
हो झाले मुक्त गुलाम
करीतो हो अभिमानाने
या तिरंग्याला सलाम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आदर्श राष्ट्र

तडका - संविधानाच्या आश्रयाने

संविधानाच्या आश्रयाने

संविधान हे या देशाच्या
स्वातंत्र्याची हो शान
होत राहील गौरव सदा
याचे गातोया गुनगाण

दिधली सत्ता प्रजे हाती
वाढला आमचा रूबाब
संविधानाच्या आश्रयाने
ही प्रजा रहाते सुखात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सन्मान

सन्मान

दखल प्रत्येकाच्या सत्कार्याची
जाणीवपुर्वक घ्यायला पाहिजे
हूकून-चुकून सत्कार्यकर्ता
सन्मानादूर ना रहायला पाहिजे

समाजातील तो खरा हिरो
समाजासमोर आलाच पाहिजे
योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान
योग्य रितीने झालाच पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २४ जानेवारी, २०१६

तडका - पगार २७ रूपये

पगार २७ रूपये

२७ रूपये कमावणारा
तुमच्या मते श्रीमंत आहे
पण तुमच्या या निष्कर्षांची
ग्रामीण भागास खंत आहे

वास्तव खुप भयान आहे
ग्रामिण भाग येऊन बघा
२७ रूपये पगार साहेब
तुम्हीही रोज घेऊन बघा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भांडके तोंडे

भांडके तोंडे

दोघांत मांडला संसार
अडी मात्र कायम आहे
इकडे-तिकडे दोघांच्याही
मनी स्थान दुय्यम आहे

दोघांच्या या संसारामध्ये
सतत वाजके भांडे आहेत
यांच्या आणि त्यांच्याकडेही
जबर भांडके तोंडे आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

तडका - माणसांचा वापर

तडका - सूड भाव

सूड भाव

यांच्या आणि त्यांच्याही
मनी सुडभाव जपले गेले
मात्र त्यांच्या हल्यामध्ये
नुकसानही आपले झाले

कोणावरती हल्ला करावा
या सुडाने बघूच नये
कुणी हल्ले करील असे
आपणही वागूच नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

तडका - निशाणा

निशाणा

कधी-कधी हूकून-चुकून
तर मूद्दामहून कधी-कधी
साधताना निशाणा हल्ली
कुणी असतात धुंदीमधी

कुणी कुठून कसा केला
तर्क-वितर्क हेरला जातो
अप्रत्यक्ष केला वारही
निशाणेबाज ठरला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वास्तव विश्वास घातकींचे

वास्तव विश्वास घातकींचे

वरून गोड बोलुन कधी
करतात गनिमी कावा
त्यांच्या गोड शब्दांतही
असतोच कडवट डावा

जपावे जरा,सदा त्यांच्या
अविश्वास असतो भेटीत
खांद्यावरती ठेऊन हात
खुपसतात खंजीर पाठीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

तडका - सिग्नल थंडीचा

सिग्नल थंडीचा

या थंड-थंड थंडी वरती
लोक भलते गरम आहेत
दाखवण्याचा भाग नाही
मनी तक्रारी तोरण आहेत

थंडी पासून बचावाला
तारांबळ ही होऊ लागली
गुलाबी समजली थंडीही
लाल सिग्नल देऊ लागली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हूंडा विसरा

हूंडा विसरा

हूंड्यासाठी घडतं
हूंड्यामुळे मोडतं
लग्नाचं सारं कांड
हूंड्यावरच अडतं

नका होऊ गुन्हेगार
सांगणं आहे पुन्हा
हूंडा देणं-हूंडा घेणं
कायद्यात आहे गुन्हा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २० जानेवारी, २०१६

तडका - पुन:प्रेम

पुन:प्रेम

तीने सतत वार केले
मी ही प्रतिकार केले
तीच्या जबर हल्यात
कित्तेक हो गार झाले

अशा कडाकी थंडीपुडे
वारंवार मी हरू लागलो
अडगळीतील स्वेटरवर
पुन:प्रेम मी करू लागलो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सांगा तुम्हीच

सांगा तुम्हीच

दहशती वात
पेटवली तुम्ही
माणूसकी राव
बाटवली तुम्ही

का धजताहेत
दहशती कर्माला
कसे म्हणावे हो
माणूस तुम्हाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

तडका - तिसरा डोळा

तिसरा डोळा

माणसांचे विश्वास हल्ली
आहेत टेक्नॉलॉजीवर स्वार
सी.सी.टी.व्हीत कैद आहेत
हल्ली गुन्हे करणारे गुन्हेगार

महत्वाची प्रत्येक जागा
रात्रंदिवस घेरली आहे
माणसांचा तिसरा डोळा
टेक्नॉलॉजी ठरली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जात पंचायत

जात पंचायत

तोडगे काढणारे माणसं
जणू लचके लागले तोडू
जात पंचायतीच्या नावे
इथे अन्याय लागले घडू

विकासाच्या पावलांनाही
वारंवार ही नडते जात
असल्या जाच पंचायतीस
थारा नसावा समाजात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

तडका - राजकीय विरोध

राजकीय विरोध

जिथे संधी मिळेल तिथे
एकमेकांस भिडले जातात
सत्ताधार्‍यांना विरोधक
पावलो-पावली नडले जातात

मात्र सुत्र जुळून आले तर
ऊलटवारे फिरू लागतात
सत्ताधार्यांची पाठराखण
विरोधकही करू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तो

तो

ज्याच्याकडे बळ उदंड
तो त्याची मालकी सांगतो
त्याच्या अतिक्रमणासाठी
नियम सारे जणू टांगतो

कुणीही जबरदस्ती करावी
इतपत जणू तो थंड आहे,.?
संभ्रमात न पडावे कुणी
तो सरकारी भुखंड आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १७ जानेवारी, २०१६

तडका - सन्मानाच्या जत्रेत

सन्मानाच्या जत्रेत

बसवा बसवा म्हटले
म्हणून हसवला गेला
सन्मानाच्या घोड्यावर
मुद्दाम बसवला गेला

देऊन सारा मान-सन्मान
रहावलं नाही एवढ्यावर
बसवलं ज्याला घोड्यावर
तोच रमतोय ऊड्यावर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शाई

शाई

असा काही धोका होईल
त्यांच्या मनी वाटले नाही,.?
शाई फेकीच्या मार्‍यातुन
केजरीवालही सुटले नाही,.!

प्रत्येक-प्रत्येक घटना ही
वेगळेच तर्क देऊ लागली
हल्ली निषेध म्हटलं की
सर्रास शाई येऊ लागली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

तडका - "टीईटी"चा पेपर

"टीईटी"चा पेपर

"टीईटी"चा पेपर म्हणे
भलते चाळे करू लागला
वेळेआधीच दिमाखात
बेडरपणे फिरू लागला

व्हाटस्अपची ओढ बघा
पेपरलाही लागली आहे
पेपर फूटीने परिक्षेची
जणू प्रतिमा डागली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मनाची काया

मनाची काया

एकदा लत लागली की
म्हणे सुटता सुटत नाही
पण सवय न सुटणं हे
आमच्या मनी पटत नाही

इच्छा असेल तर सवय
सोडवली जाऊ शकते
अन् मनाची काया ही
घडवली जाऊ शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

तडका - पद-प्रतिष्ठेच्या भुका

पद-प्रतिष्ठेच्या भुका

पक्षांतर्गत हेवे-देवे
वरपर्यंत पोचले आहेत
वरच्यांनी खाली येऊन
कान सुध्दा खेचले आहेत

तिळ-गुळ वाटून,खाऊन
प्रेमा-प्रेमाने रमतील का,.?
पद-प्रतिष्ठेच्या भुका त्यांच्या
तिळ-गुळाने शमतील का,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तिळ-गुळ देता-घेताना

तिळ-गुळ देता-घेताना

तिळ-गुळ देता-घेताना
बोलतात सारेच गोड
तरी मात्र जात नाही
इथे माणसांची खोड

पण रूसव्या-फूगव्यांचा
ना ऊगीच घोळ असावा
हातामध्ये तीळ आणि
मनामध्ये पीळ नसावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

तडका - ब्रीद संक्रातीचे

ब्रीद संक्रातीचे

मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा

कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सणांचे डिजीटायझेशन

सणांचे डिजीटायझेशन

मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
संक्रातीचा तिळ-गूळ
मनभरून पाहता येतो

रिती परंपरा वरतीही
आधुनिकतेचे जाळे आहेत
अन् सण-वारही हल्ली
जणू डिजीटल झाले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

तडका - बत्ती नैतिकतेची

बत्ती नैतिकतेची

रस्ता मोकळा असतानाही
ऊगीच जातात कुपाट्यात
आगीमधून ऊठून कधी
स्वत: पडतात फूपाट्यात

कित्तेक मनात वाढलेली
अशी मानवी वृत्ती असते
मना-मनातुन विझलेली
नैतिकतेची बत्ती असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माफी चुकी

माफी चुकी

वादग्रस्त वक्तव्य
जबर गाजतात
वादग्रस्तांच्याच
खबर माजतात

घडल्या चुकांची
मागतात माफी
माफी मागूनही
करतात चुकी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राजकीय वाटा

राजकीय वाटा

राजकीय हायवे वरुन
सहज फोडतात फाटा
ज्याला त्याला आपल्या
स्वतंत्र असतात वाटा

अटी-शर्तीवरती का होईना
दोघांनाही ते पटले पाहिजे
जाणारा जात असला तरी
घेणारानेही घेतले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

तडका - नैतिकते बाबत

नैतिकते बाबत,...

कुणी कसे वागावे हे
छाती ठोक सांगतात
मात्र स्वत: वागताना
अनैतिकतेत झिंगतात

ओठात आणि पोटातले
नको वेग-वेगळे फ्रॅक्शन
करावे नैतिकते बाबत
स्वत:चेच आत्मपरिक्षण

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

तडका - जिजाऊ

जिजाऊ

महाराष्ट्राच्या कल्याणार्थ
मॉ जिजाऊ लढली आहे
जिजाऊ जन्मा यावी म्हणून
हल्ली मागणी वाढली आहे

पण पुनर्जन्माची गळ घालत
ऊगीच आशा ना वाढवाव्यात
जिजाऊ जन्मा येणार नाहीत
त्या घरा-घरात घडवाव्यात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

आऊसाहेब माफ करा,...

आऊसाहेब माफ करा,....

                कवी :- विशाल मस्के, सौताडा.
                मो. 9730573783

आऊसाहेब आपला समाज,बदलला आहे खुप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| धृ ||
साठवून ठेवलेलं मनातलं काही
आज तुमच्यापुढे खोलायचं आहे
आजच्या वास्तवी परिस्थितीवर
आऊसाहेब तुम्हा बोलायचं आहे
अवजड आहे सांगणं,अंगाचा ऊडलाय थरकाप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| १ ||
ज्यांना इतिहास समजला नाही
त्यांचाच भलता रव होतोय
बदनामी केली तुमची ज्यांनी
त्यांचाही इथे गौरव होतोय
जणू निखळत चाललाय,तो दाप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| २ ||
स्रीया सोसताहेत झळ अजुनही
सामाजिक विषमता विरली नाही
कर्मकांड अन् घातक अंधश्रध्दा
समाजात अजुनही हरली नाही
आज असता तुम्ही तर,केला असता तोफ मारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ३ ||
जात पाहिली,ना धर्म पाहिला होता
सामाजिक अधोगतीचा तो वर्म पाहिला होता
महाराष्ट्राच्या मातीसाठी,मातीमधल्या माणसांसाठी
स्वराज्य निर्मितीचा तो मर्म पाहिला होता
विनला सामाजिक समतेचा एकात्मिक गोफ सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ४ ||
तुमचे नितीमुल्य अन तत्वही सारे
समाजात कसोसीने मांडतो आहोत
जिथे नैतिकता बिघडेल तिथे-तिथे
आज वैचारिकतेने भांडतो आहोत
पण ज्यांना आपले समजले,तेच ठरतात लोप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ५ ||
तुमच्या एका हाके सरशी तर
मावळे सारेच्या सारे एक झाले
तेव्हा कुठे स्वराज्य निर्मितीचे
ते सकस कार्य नेक झाले
शुर वीर त्या मावळ्यांचा,धन्य धन्य तो स्टाफ सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ६ ||
आज त्याच मावळ्यांचे वंशज
इतिहास जणू विसरले आहेत
इमान ठेवलंय गहाण आणि
बेइमानी मध्ये घसरले आहेत
राजे व्हायचंय त्यांनाही,असुन देखील पोटमारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ७ ||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता नावासहीत शेअर करण्यास परवानगी

* या कवितेचा ऑडीओ ऐकण्यासाठी  9730573783 या व्हाटस्अप नंबर वर संपर्क करा

तडका - सुटकेचा श्वास

सुटकेचा श्वास

होणार होणार म्हणता
बाळंतपण होतं विलंबलं
जान्हवीच्या बाळासाठी
सारं होतं खोळंबलं

मात्र श्री-जान्हवीच्या
आता बारसं होईल बाळाचं
सुटकेचाच श्वास घेईल
शेवटचं पान या खेळाचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पैसा

पैसा

आपल्या कुवतीनुसार
जो-तो कमवतो पैसा
चढ-ऊतार करत कधी
माणसांना रमवतो पैसा

पैशामुळं तर कधी कधी
माणूसकीलाही डागणं आहे
जगण्यासाठी हा पैसा की
पैशासाठी हे जगणं आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३