हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

तडका - बाजारे आण्णा

बाजारे आण्णा

नको तो जीवाचा आटापीटा
मोफत मोफत चालु करतात
समर्थनीय सरकार बदलले की
बाजारे आण्णा बोलु लागतात

जवळचे लोक सत्तेत असल्यास
जणू मुग गिळून गप्प असतात
समर्थनीय सरकार आहे तोवर
बाजारे आण्णा ठप्प असतात,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

तडका - हैदराबादी एन्काऊंटर

✨✨✨ *तडका - २१८५* ✨✨✨

हैदराबादी एन्काऊंटर

काय खरं काय खोटं
चौकशीचा भाग आहे
बलात्कारी आरोपींवर
देशभरातुन राग आहे

झटपट व्हावी शिक्षा
हे जनमनाचं सेंटर आहे 
त्याचंच एक उदाहरण
हैदराबादी एन्काऊंटर आहे,.?


अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

...................................................

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

तडका - ओळखा कोण,.?

ओळखा कोण,..?

आम्ही तिकडे होतो तेव्हा
लोक होते आमच्या मागे
आम्ही इकडे आलो तरीही
लोक आहेत आमच्या मागे

लोकांना मागे खेचत खेचत
आम्ही जातोहेत भलते पुढे 
तरी लोकांत आम्हीच श्रेष्ठ
आम्ही कोण ते ओळखा गडे,?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

तडका - निष्ठा एक चेष्टा

निष्ठा एक चेष्टा

आयाराम अन् गयारामांची
आता मोठीच ऊसंत आहे,.!
राजकारणात निष्ठा असते
हि कथा केवळ दंत आहे,.?

राजकारणाची दिशा तर
जनतेनेही हेरलेली नाही,.?
अन् निष्ठावंत म्हणायला
EVM हि उरलेली नाही,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

तडका - इलेक्शन जिंदाबाद

इलेक्शन जिंदाबाद

कुणी बदलले छत तर
कुणी बुड बदलले आहेत
कुठे-कुठे वाढलेत सुर तर
कुठे सुड ओसरले आहेत

निवडणूकांच्या पार्श्वभागावर
हि नेहमीचीच गजबज असते
अन् नेत्यांसह कार्यंकर्यांचीही 
जरा गोंधळलेलीच पोज असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १८ जून, २०१९

तडका - नवा अविष्कार

नवा अविष्कार

बघा नवनविन फतव्यांचे
लोक जणू शिकार आहेत
ऊघड -ऊघड मनमानीयुक्त
हे हल्लीचे अविष्कार आहेत

मनमानी सवय मानवांच्या
स्वभावापासुन तुटली नाही
मनमानीयुक्त अविष्कारातुन
ती ऊजळणीही सुटली नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १७ जून, २०१९

तडका - निष्ठा एक सत्य

निष्ठा एक सत्य

काल जे-जे शत्रु होते
तेच आज साथी आहेत
विरोधकांचा हातात हात
गुलालही माथी आहेत

आजही निष्ठावंत कार्यकर्ते
निष्ठा घोळसत बसले आहेत
अन् निष्ठावंतांच्या जीवावरच
बांडगुळ मात्र पोसले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १६ जून, २०१९

तडका - नैसर्गिक खेळी

नैसर्गिक खेळी

आधी निसर्गाचे केले हाल
आता निसर्गाकडून हाल आहेत
अन् मानवनिर्मित तलावांतही
आता केवळ गाळ आहेत

वाट पाहून पाहून पावसाची
जीवांची तळमळ झाली आहे
पाण्याचे महत्व समजवण्या
जणू हि नैसर्गिकच खेळी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १७ मे, २०१९

तडका - नमो बुध्दाय

नमो बुध्दाय

ती संपत्ती अन् नाती-गोती
हि सगळी मोह माया आहे
कितीही केला पोबारा तरी
सारं जीवनाअंती वाया आहे

लोभ,मत्सर, द्वेष द्या सोडून
अजुनही अंत:करन शुध्द ठेवा
जगणं सुखमय होऊन जाईल
पण फक्त मनामध्ये बुध्द ठेवा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १६ मे, २०१९

तडका - धार्मिक मुद्दा

धार्मिक मुद्दा

सांगण्याची गरज नाही
लोक किती बाद आहेत
चौका-चौकात माजलेले
धार्मिक दहशतवाद आहेत

इथे धार्मिक गुण-दोषांचे
जो तो समर्थन करतो आहे
अन् आपला धर्म धरता धरता
जणू मानवधर्मच चिरतो आहे.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

तडका - मतदान विशेष

मतदान विशेष

आता मतदान मागायला जणू
नेता  लोकांची छावणी आहे
पण मतदान करणं म्हणजेच
आपली हक्क बजावणी आहे

जागृत मतदान करणे म्हणजे
हा लोकशाहीचा खुबाच असतो
कालचे आजचे नको वाटल्यास
तिसरा पर्यायही उभाच असतो

म्हणूनच आपलं बहूमोल मत
योग्य व्यक्तीलाच गेलं पाहिजे
अन् जनहितवादी व्यक्तीमत्वच
आपण निवडून दिलं पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १९ मार्च, २०१९

तडका - रंग

रंग

नेत्यांचे रंग पक्षात कधी
कधी पक्षाचे रंग नेत्यांवर
फोडा-फोडी, सोडा-सोडी
इलेक्शनच्या या पात्यांवर

रंगात रंग मिसळून कुणी
भलते रंगीत झाले आहेत
मानवी स्वभावी रंगांपुढे
नैसर्गिक रंगही भोळे आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

इंतजार

व्हॅलेंटाइन स्पेसियल कविता :- इंतजार
कवी :- विशाल मस्के
           सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड
मोबाईल :- 9730573783

कवितेची लिंक :- https://youtu.be/bgBbw46GB88

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

तडका - गोड बोलणे

गोड बोलणे

बोलायचं असतं म्हणून
बोलणं नसावं गोड
गोड बोलण्याची मनी
नेहमी असावी ओढ

तेव्हाच हे गोड बोलणे
खर्या अर्थाने सार्थ होईल
नसता हे गोड बोलणेही
सरळ सरळ व्यर्थ होईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १३ जानेवारी, २०१९

तडका - २०१९ विशेष

२०१९ विशेष

गल्ली-गल्लीतील चर्चांना
भलतच उधाण आलंय
कुणा तोंडी टिका तर
कुणा तोंडी गुणगान झालंय

आपला नेता, आपला पक्ष
पोटतिडकीने मांडू लागले
हे इलेक्शनचे वादळ वारे
गल्लो-गल्ली नांदू लागले,...

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

तडका - जागांची घोकणपट्टी

जागांची घोकणपट्टी

योग्य जोडीदार मिळावा
सर्वांचीच  आशा असते
म्हणूनच इलेक्शन येता
इथे युतीची भाषा असते

मनात कट्टी असली तरी
वरून वरून गट्टी असते
इलेक्शन जवळ येताच
जागांची घोकणपट्टी असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

तडका - आमची खंत

आमची खंत

शिकला जरी समाज
तरीही मनी खंत आहे
वैचारिकतेची गती इथे
अजुनही का संथ आहे

सावित्रीच्या लेकींचा इथे
अजुनही बाट होतो आहे
शिकलेल्यांच्याही मतीत
अविचारी घाट येतो आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १ जानेवारी, २०१९

तडका - हॅप्पी न्यु इयर

हॅप्पी न्यु इयर

सालाने काळ पुढे सरकता
मनात चेतना आली जाते
शुभेच्छांची आयात-निर्यात
मग ऊत्साहाने केली जाते

वार्षिक सुख-समृध्दीच्या आशा
ढोबळ मनाने धाडल्या जातात
अन् वाइट क्षणांच्या पालव्याही
निर्गमन्याआधी खुडल्या जातात

अशीच आपुलकी टिकुन राहो
मनात हिच प्रबळ इच्छा आहे
हिच वर्षानुवर्षे माणवतेसाठी
आमची शुभेच्छा सदिच्छा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३