हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

तडका - दसरा

दसरा

वाटुन प्रेम एक-मेका
आनंद करा साजरा
आपुलकीने सर्वांनी
आनंदी ठेवा नजरा

तरच मनातील द्वेशाचा
सहजपणे निचरा होईल
अन् खर्या अर्थाने साजरा
आपणाकडून दसरा होईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८२

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

तडका - नैसर्गिक गेम

नैसर्गिक गेम

पेरणीला हरवतो
काढणीला मिरवतो
पाऊस देखील आता
माणसांना फिरवतो

हे एकदाचं नाही
प्रतिवर्षी सेम आहे
शेतकर्यांशी खेळलेला
हा नैसर्गिक गेम आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

तडका - आपले

आपले

कधी दुर जातात तर कधी
माणसं जवळही येतात हो
दैनंदिन जिवनात या अशा
सदा घडामोडी घडतात हो

आपले देखील कधी कधी
आपल्यावर तापले असतात
पण कितीही दुर गेले तरीही
आपले हे आपले असतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कॉर्नर

कॉर्नर

सिक्रेट-सिक्रेट बोलण्या
कॉर्नरच हेरू लागले
गावा-गावातील कॉर्नर
उपयोगी ठरू लागले

चांगल्यासह वाइटानेही
नवे विषय रंगत असतात
कॉर्नर कॉर्नर वरती बघा
कार्यकर्ते झिंगत असतात,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

तडका - आपले राने

आपले राने

अहो पेरणी केली एकाने
मशागत मात्र दुसर्याकडे
अन् नजरेचा झोत बघा
जाऊ लागला तिसर्याकडे

असेच झाले दुर्लक्षित तर
फायदा करणारे होतील कसे
जर राने झालेच नाराज तर
पीकं ऊत्पन्न देतील कसे,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

तडका - टोलेबाजीचे सत्य

टोलेबाजीचे सत्य

साधं साधं बोलणं देखील
खोचक पणाने बोललं जातं
राजकारणातील विरोधकास
शाब्दिक वाराने सोललं जातं

टोलेबाज वक्तव्यांचे तर
रोजच नविन तुषार आहेत
टोलेबाजी करण्यात इथे
लोक भलते हुशार आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

तडका - चिंता

चिंता

जिथे वाटतो विश्वास
तिथेच मिळतो धोका
अपेक्षा बाह्य जाऊन
जबर बसतो ठोका

विश्वास कुठे ठेवावा
याची चिंता झाली आहे
माणसांमधली नैतिकता
विकोपास गेली आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

तडका - नाराजीचे सत्य

नाराजीचे सत्य

नव्या नव्या धाटणीचे
पुन्हा पुन्हा तराणे आहेत
ऐकुन जुने झाले तरीही
नव्याने तेच गार्हाणेआहेत

राजकारणातील नाराजीचे
पाढे नेहमीच दिसले जातात
तर नाराज होऊन कधी कधी
नाराजीवालेच फसले जातात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

तडका - प्लॅनिंग

प्लॅनिंग

शाब्दिक विश्वासाची बाजु
कधी विश्वासाने दिली जाते
मनी मनसुबे हेरून हेरून
जबरी प्लॅनिंग केली जाते

कधी प्लॅनिंग दिवसा तर
कधी प्लॅनिंग रात्री असते
कोणता डाव केव्हा पडेल
याची काहिच खात्री नसते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

तडका - स्वच्छतेची हमी

स्वच्छतेची हमी

ठिक-ठिकाणी कचरा
इथे साठवला जातो
अन् आपलाच विकास
बघा गोठवला जातो

चला स्वच्छतेची ज्योत
आता मिरवायची आहे
शहरे स्वच्छतेची हमी
आपणा सर्वांची आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

तडका - ग्रामपंचायत बिझी

ग्रामपंचायत बिझी

निवडणूकीय रूल
पाळावे लागतात
लपे-छुपे डावही
खेळावे लागतात

हे निवडणूकीचे
ठरेल डावं आहेत
ग्रामपंचायत बिझी
गावंच्या गावं आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

तडका - निवडणूकीय सत्य

निवडणूकीय सत्य

ग्रामपंचायत निवडणूकीचे
आता गावो-गावी वारे आहेत
कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन
इथे चमकणारे तारे आहेत

स्वत:चं अस्तित्व म्हणजे इथे
प्रत्येकालाच हाय-फाय वाटतं
कोण हलकं कोण हाय-फाय
हे निवडणूकीय निकालातच पटतं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

तडका - मर्यादा बाह्य

मर्यादा बाह्य

जेव्हाही वाटतं यावं तु
मुद्दाम गायब होणार तु
जेव्हा तु येऊ नये वाटतं
तेव्हाच नेमकं येणार तु

अन् देणार इतका त्रास की
जगणंही वाटतं असह्य हे
ऐकुन घे पावसा थांबव जरा
तुझं येणंही मर्यादाबाह्य हे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

तडका - निवडणूक

निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक
तोंडावर आली आहे
तशी गावा-गावांमध्ये
तयारी सुरु झाली आहे

मनात मनसुबे घेऊन
राजकीय फड रंगु लागले
अन् गावाकडचे जबरे डाव
गटा-गटांत रंगु लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

तडका - वादातील संमेलनं

वादातील संमेलन

कधी नंतर तर कधी-कधी
अगोदरच बिघडले जातात
अन् होणारे साहित्य संमेलनं
वादात सापडले जातात

संमेलन अन् वादाचं हे
जुनंच समीकरण आहे
प्रत्येक नव्या संमेलनाला
नव्या वादाचं स्फुरण आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

तडका - आधार जरूरी है

आधार जरूरी है

इनबॉक्स मधील संख्या
जोरात वाढू लागली
मेसेजेस वरती मेसेजे
कंपनी धाडू लागली

आधार कार्ड लिंकसाठी
कंपनीकडून हट्ट आहेत
नसता सिमकार्ड बंदीचे
नियम देखील घट्ट आहेत

सिम नंबरला आधार देण्या
मोठी ऊडी घेतली जाईल
आधारचा आधार देण्यासाठी
जनता देखील लुटली जाईल,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नेता

नेता

जनतेमध्ये येऊन
समस्या जाणणारा
जनतेत मिसळुन
आपलं म्हणणारा

असाच पाहिजे नेता
समाज सुधारण्यासाठी
विकासाचे वेगवान वारे
समाजात फिरण्यासाठी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

तडका - काम-नाम

काम-नाम

काम कोणतंही असो
सहज रखडलं जातं
नावासाठी थोडं-फार
चर्चेत पाखडलं जातं

संधी मिळेल तिथे-तिथे
हेच श्रेय घेऊ लागतात
यांचेच नावे पुढे येऊन
कामं मागे राहु लागतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

तडका - परतीचा क्षण

परतीचा क्षण

जसे येण्याकडे असते
तसे जाण्याकडेही असते
पुढच्या वर्षी लवकर या
हमखास साकडेही असते

गणपती येण्या-जाण्याचे
प्रतिवर्षी हे कर्व्ह असतात
अन् परतीचे क्षण देखील
आनंदाचे पर्व असतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - राजकीय दुर्दशा

राजकीय दुर्दशा

भुतकाळाची तमा नाही
वर्तमानच पाहिला जातो
तत्व जरी तुटले तरीही
फायदाच पाहिला जातो

नक्की कोण कोणाचं ही
भरकटलेली दिशा आहे
जिकडे खाऊ तिकडे जाऊ
हि राजकीय दुर्दशा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

तडका - निमंत्रणाची खंत

निमंत्रणाची खंत

कुणाला बोलावले पण
कुणाला निमंत्रण नाही
घटकपक्षां बाबत म्हणे
आपुलकीचे चित्रण नाही

हि अंतर्गत मत भेदांची गोष्ट
भविष्यातही पाहिली जाईल
या निमंत्रणाची खंत देखील
निरंतरच राहिली जाईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

तडका - सत्ता

सत्ता

मागुन मागुन थकले कुणी
कुणी अजुनही मागत
सत्ता हाती मिळविण्यासाठी
शाब्दीक तोफा डागत आहेत

पण जनमनात प्रांजळपणे
आपली छबी यावी लागते
सत्ता मागुन मिळत नसते
ती विश्वासाने घ्यावी लागते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

तडका - आधारचा आधार

आधारचा आधार

हल्ली डॉक्युमेंट्री प्रुफ म्हणून
आधार भलतंच प्रगत आहे
इकडे आधार-तिकडे आधार
आधार सर्वत्र लागत आहे

वेळो-वेळी चेकींग होईल
कोण निराधार वागलं आहे
हल्ली मोबाईल नंबरही
आधार मागु लागलं आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३