हा ब्लॉग शोधा

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,...

माझ्या समस्त
मावळ्यांनो,महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||धृ||

आज तिनशे वर्ष होऊन गेले
हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे
पण या महाराष्ट्रात आज
रासवांचा बाजार फोफावला आहे

म्हणूनच तर तुम्हाला आज,हा सांगावा धाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||१||

काय,चाललंय काय या महाराष्ट्रात
सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय
जणू गतानुगतिक आले संपुष्टात
अन् अराजकतेचाच दरबार भरलाय

प्रत्येकजण आप-
आपल्या परीनं,या महाराष्ट्राला ओरबाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||२||

अन्याय अन् अत्याचार करणाराला
तेव्हा आम्ही पायदळी तुडवला
ते तुमचेच तर पुर्वज होते
ज्यांच्या सामर्थ्यांनं मी महाराष्ट्र घडवला

कुठे गेली ती क्रांतीची आग,का मराठी बाणा घुटमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||३||

आम्ही कित्तेक लढाया केल्या आहेत
पण कधीच शेतकर्याच्या पिकाला धक्का नव्हता
मंदिर,मज्जिद अन् कुराण बायबल
ना यांना कधी धक्का होता

म्हणूनच तर तो इतिहास, आजही जगभरात गौरवतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||४||

स्वराज्यात कधीच स्रीयांना भय नव्हतं
शत्रुंच्या स्रीयाही आम्ही जपलेल्या आहेत
कित्तेक गौरव केलेल्या स्रीयांना
इतिहासानंही टिपलेल्या आहेत

आज मात्र स्रीयांवरील अत्याचार
पाहून,तलवारीतला जोर सळसळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||५||

जाती-धर्माच्या भींती आम्ही तेव्हाच
पाडल्या होत्या
अठरा पगड जाती स्वराज्यासाठी झटल्या होत्या
स्वराज्याची निर्मिती हेच ध्येय मनी ठेऊन
क्रांतीसाठी जणू पेटून ऊठल्या होत्या

आज मात्र आम्हालाच जाती-धर्मात
अडकवण्याचा प्रयत्न होतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||६||

वागायचं असेल तर माणूसकीनं वागा
जगायचं असेल तर स्वाभिमानानं जगा
नाहीतर स्वत:चे शिरच्छेद करून घ्या
पण माझ्या महाराष्ट्राला काळीमा फासु नका

मानवतेच्या कल्याणासाठी हा,कठोरतेचा हूकूम
सोडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||७||

कित्तेक मावळ्यांनी रक्त सांडवुन
हा महाराष्ट्र जपलेला आहे
एका-एका मावळ्याचं शौर्य पाहून
हा आसमंतही दिपलेला आहे

म्हणूनच तर या महाराष्ट्रासाठी,आजही जीव
तळमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले
बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||८||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783
------------------------------------

कविता you tube वर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :-

https://youtu.be/p1TYnJ-kXYo

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

तडका - आजची गरज

आजची गरज

महापुरूषांविषयी आदर
मनामनात रूजला पाहिजे
महापुरूषांचा अनुयायी
विचारांनी साजला पाहिजे

ज्यांनीही वाचले महापुरूष
ज्यांच्यात ऊमेदी धीरज आहे
म्हणूनच सामाजिक ऊन्नतीसाठी
महापुरूष वाचणाची गरज आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

तडका - चला धडे शिकवुया

चला धडे शिकवुया

भुंकत राहतात कुत्रे हल्ली
अकलेचा भाग नसतानाही
तरी आम्ही का शांत बसावं
वैचारिक जाग असतानाही

आपणच संभाळून आपल्यात
हे कुत्रे असे ना भुंकायला हवे
बेअकली जरी असले तरीही
कुत्र्यांना धडे शिकवायला हवे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

तडका - झटपट सावरा

झटपट सावरा

अहो झटपट झटपट पैसा
कुणाला कमवावा वाटतो
झटपट झटपट पैशासाठी
भोंदुपणाही जमवावा वाटतो

म्हणूनच भोंदु महाराजांची
इथे संख्या वाढलेली आहे
अन् एका-एकाची पीढीही
भोंदू बुवांनी गाढलेली आहे

म्हणूनच तर गरज आहे
समाजाने जागृत होण्याची
तरच भितीही टळेल खरी
हा समाज विकृत होण्याची

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

तडका - यांना आवरा हो

यांना आवरा हो

वाचाळ बोलणारांवरती
अजुनही ना खीळ आहे
वादग्रस्त बोलण्यासाठी
जो तो उतावीळ आहे

आता या वाचाळ पटूंकडे
उगी काना डोळा करू नये
अन् हि वाचाळगीरी देखील
प्रसिध्दी माध्यम ठरू नये

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रेम

प्रेम

प्रेम व्यक्त करण्याचा
असतो हा एक दिवस
याच्यासाठी करतात
इथे कित्तेकजण नवस

कुणी होतं प्रेमळ तर
कुणी-कुणी सख्त होतं
पण खरं प्रेम असेल तर
मुहुर्ताविनाही व्यक्त होतं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

तडका - मदत,...?

मदत,...?

जखमेवरती मीठ
जणू हे चोळलं आहे
गारपीटीने नुकसान
भलतंच केलं आहे

निसर्गाच्या वागण्याची
मनामध्ये खंत आहे
सरकारच्या मदतीची
तरी ना ऊसंत आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

तडका - राजीनाम्यांचे विशेष

राजीनाम्यांचे विशेष

कित्तेकांनी सांगितलं
आत्ताच लिहिले आहेत
कित्तेकांनी सांगितलं
खिशातच ठेवले आहेत

बघा चर्चेचा विषय हल्ली
हे जोरदार ठरले आहेत
पण खिशाबाहेर येण्यासही
राजीनामे घाबरले आहेत,.!

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - गारपीट वार

गारपीट वार

निसर्गाचा कसा बघा
हा गारपीट वार आहे
याच्यापुढे ऊमेदीचा
तो अंकुरही ठार आहे

ते घात-पाती षढयंत्र
निसर्गही शिकला आहे,.?
त्याच्या अवकाळी येण्याने
शेतकरी ठकला आहे,...

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

तडका - राजकीय घरोबा

राजकीय घरोबा

अहो जेथुन तोडले संबंध
पुन्हा तिथेच लक्ष आहे
जमेनाही अन् करमेनाही
याला काळही साक्ष आहे

पुन्हा एकत्रित लढण्याचा
विचार नटला जाऊ शकतो
जुना घरोबा नव्या-नव्याने
इथे थाटला जाऊ शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

तडका - राजकारण

राजकारण

राजकारणाचा खेळ बघा
आटकलीने खेळला जातो
कुणाला सत्वर जवळ तर
कुणी मुद्दाम टाळला जातो

कित्तेकांच्या मनी हि अशी
प्रबळ मनाने खंत असते
पण नातेही ठकवण्या इतके
हे राजकारण तंतोतंत असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३