कर चर्चा
कर जमा करण्याचा
हा नविन फंडा आहे
सुट्या करांच्याऐवजी
एकच कर बंदा आहे
जी एस टी ची बातमी
मिडीयात फिरू लागली
काय स्वस्त,काय महाग
चर्चा जोर धरू लागली
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कर चर्चा
कर जमा करण्याचा
हा नविन फंडा आहे
सुट्या करांच्याऐवजी
एकच कर बंदा आहे
जी एस टी ची बातमी
मिडीयात फिरू लागली
काय स्वस्त,काय महाग
चर्चा जोर धरू लागली
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आपले वागणे
आपण कसे वागतो
आपणच तपासावे
आपल्या वागण्यात
विवेकीपण जोपासावे
तरच आपले वागणे
एक आदर्श होईल
आपल्या वागण्याचा
समाजाला हर्ष होईल
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सुकाणू समिती
कुणाचा विरोध तर
कुणाचे समर्थन आहे
सुकाणु समीती वरती
हे चर्चेचे मंथन आहे
कुणी इकडे-कुणी तिकडे
कुणी तटस्थ राहू लागले
अन् नानाविध दृष्टीक्षेपात
सुकाणू समीती पाहू लागले
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
दक्षता
इकडे घाण तिकडे घाण
घाणच घाण पसरलीय
म्हणूनच तर आरोग्याची
सीमा पार घसरलीय
आपणच घ्यावी दक्षता
घाणेरडेपण नसले पाहिजे
आपले गाव आपले शहर
स्वच्छपणे दिसले पाहिजे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
गोड बोले
जिकडे गेले तिकडे
गोल गोल फिरतात
पुढचे गणित हेरून
गोड गोड बोलतात
सफेद वाटले तरीही
आतुन काळे असतात
वाटेल तसे फिरणारे
हे गोडबोले असतात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
वाचाळकीचा फॅक्ट
वाचाळ बोललं म्हणजे
प्रसिध्दीचा चान्स असतो
हेच सुत्र हेरून जणू
वाचाळांचा नाच असतो
म्हणूनच तर वाचाळखोर
वाचाळवाणी बोलत असतात
नको तिकडे आकलेचे तारे
अविचाराने कोलत असतात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विकासाचे सत्य
ज्याला जसा जमेल
त्याने तसा लाटला
म्हणूनच तर भ्रष्टाचार
इथे अविरत दाटला
ज्याच्या हाती दोर दिला
त्यानेच तो काटला
विकासाचा गळा इथे
सिस्टिमनेच घोटला
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
पाऊस दांडी
आला आला म्हणता
तो चक्क निघुन गेला
जाता-जाता जनतेचे
होणारे हाल बघून गेला
आता त्याचा विचार करता
मनात धडकी भरली आहे
देऊन आनंदी आमिशही
त्याने दांडी मारली आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
नाले सफाई
आता मोठे मोठे पाऊस
लवकर लवकर येतील
तसे इथले रस्ते देखील
तुडूंब भरून वाहतील
तरीही शहरांतील सिस्टम
केअरलेस ना झाली जावी
पुढचा धोका लक्षात घेऊन
नाले सफाई केली जावी
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मानवी मनसुबे
कुणाचे मनसुबे असे
तर कुणाचे कसे असतात
कुणा-कुणाचे मनसुबे
निव्वळ जणू फासे असतात
कधी अनावश्यक वेळीही
सरळ मार्गात ऊभे असतात
सहजा-सहजी न कळणारे
हे मानवी मनसुबे असतात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
अपेक्षा
कधी काय होईल
सांगता येत नाही
कधी तर्क देखील
खरा होत नाही
तरी मात्र तर्कात
मन हरवत असते
नानाविध अपेक्षा
सदा गिरवत असते
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड
मो. ९७३०५७३७८३
शहाणी वाणी
आधी ते बोलले
आता हे बोलताहेत
मध्यावधीचे वारे
चर्चेत डोलताहेत
सारेच लढण्या सज्ज
बातमी कानी आली
मैदान सोडणार नाही
'शहा'नी वाणी दिली
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
सदृढ मंत्र
व्यसनापायी ऊगीच
कुणी वाया जाऊ नये
शरीरास घातक आहे
असे पदार्थ खाऊ नये
अहो सहज कळणारं
हे एक गुढ आहे
शरीर सदृढ तरच
जीवनही सदृढ आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आठवणीतील क्षण
या दाटून आल्या ढगांनी
आठवणीत फिरवलं आहे
पण पावसातलं बालगीत
आता जणू हरवलं आहे
पावसात भिरभिरणारी लेकरं
कोपरा धरून बसत आहेत
पावसातील आनंदी क्षण आता
फक्त आठवणीत दिसत आहेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जीवन मंत्र
जीवन हे आहेच
संघर्षमयी प्रवास
मात्र यात जिद्दीचा
मिळावा सहवास
केल्या सार्या संघर्षाला
मिळुन येतेच यश
म्हणूनच करू नये
कधी जीवनाचा द्वेश
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
टिप महत्वाची
करीअरच्या वाटेवरची
पात्रतेची चाळण असते
मॅट्रीकचा रिजल्ट म्हणजे
महत्वाचे वळण असते
तरी अशा वळणावरी
होतच असतात चुका
पडलं जरी वळणावरी
ऊठुन चालायला शिका
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जुळली हिच्याशी प्रीती,...
भुर-भुर फिरली-मनात भरली,नार जणू सोंगटी
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||धृ||
डोळ्यापुढून तीला,येता जाताना
असा गमतीचा,हो झोका घेताना
मी पाहिलं तीला,श्वास तुटताना
माझ्या काळजाचा,ठोका चुकताना
मनात रूसली-रूसुन हसली, वार्याची हो गती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||१||
माझ्यासाठी तीला,उभे राहताना
चोरून चोरून तीने,मला पाहताना
मी पाहिलं तीला,डोळे मिटताना
माझ्या डोळ्यात,कचरा लोटताना
कधी ती थंडली-कधी ती तापली,ही मौसमी हो रेती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||२||
वार्यासंगे तीला,पाहिलं वाहताना
माझ्या पाऊलखुणा,तीने मोडताना
मी पाहिलं तीला,मज भीडताना
माझ्यासाठी कधी,तीने रडताना
कधी सुखाची-कधी दु:खाची,ती जाहली सोबती
क्षणात भिजली,भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||३||
पाऊस धारेमधी,तीला भीजताना
हिरव्या शालुमध्ये,आज सजताना
मी पाहिलं तीला,सुख वाटताना
तीच्यामुळं मनी,हर्ष दाटताना
ऊन्हात भाजली-पावसात भीजली,ही भुरभुरणारी माती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||४||
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा, बीड.
मो. 9730573783
-----------------------------------
* कविता नावासह जशीच्या तशी शेअर करण्यास परवानगी
* सदर कविता पाहण्यासाठी you tube लिंक :-https://youtu.be/4u45gYgsDqU
* कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
सावधान
अगदी मनासारखा पाऊस
आता सर्वत्रच पडतो आहे
तसा पुलांच्या सुरक्षिततेचा
मनात विचार वाढतो आहे
गुत्तेदारीच्या नीच कामांची
दशा मनात ओळखली जावी
अन् पुला-पुलांवरून जाताना
सावधानता बाळगली जावी
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
पॉइंट ऑफ व्युव्ह
कर्जमाफीच्या निर्णयाचं
मनापासुन स्वागत आहे
निर्णय योग्य झाला पण
मन अंमलबजावणी मागत आहे
कर्जमाफीला लावला तसा
अंमलबजावणीला विलंब लाऊ नये
अंमलबजावणीसाठी शेतकर्यांवर
पुन्हा संपाची वेळ येऊ नये
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
मतभेद विशेष
अहो हे आजचे नव्हे तर
पुर्वी पासुनचे खेद आहेत
एकमेकांविषयी वाढलेले
अंतर्गत मतभेद आहेत
आप-आपसात वागताना
एकीचे बळ कळले जावे
एकमेकांना समजुन घेऊन
हे मतभेदही टाळले जावे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
निमित्त मान्सुन
ज्याची होती प्रतिक्षा
तो आता आला आहे
कित्तेकाच्या मनात
मान्सुन हा ओला आहे
आता सर्वांच्या सुखाचे
योगा-योगही जुळावेत
अन् जसे हवे तसे दुवे
प्रत्येकाला मिळावेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
राजकीय हस्तक्षेप
इकडे पहा-तिकडे पहा
सगळीकडेच सेम आहे
प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये
आता राजकीय गेम आहे
कितीही नाही म्हटलं तरीही
तर्काचं गणित फसतं आहे
सामाजिक सुरूवात केली तरी
मधेच राजकारण घुसतं आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
एक सल्ला
संपामार्फत कोणाचे
नुकसान होऊ नये
संप हिसक होण्याची
वेळ येऊ देऊ नये
आता नातं जबाबदारीचं
सरकारनेही घ्यायला हवं
घडला प्रकार पाहून तरी
लवकर जागं व्हायला हवं
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
पावसाची मजा
या गडगडणार्या ढगांसह
कडकडणार्या विजा आहेत
वाजत गाजत येतो पाऊस
या नैसर्गिक भुजा आहेत
अनुभवाने सांगता येईल
ऊगी गुण-गाण गात नाही
पावसात भिजल्याविना
पावसाची मजा येत नाही
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
चौकशीचे सिंचन
कधी कोणावर येईल
हे सांगता येत नाही
मात्र चौकशीचे सिंचन
चर्चेतुनही जात नाही
कित्तेकजण करू म्हणाले
मात्र चौकशी झाली नाही,.?
झाल्या सिंचन घोटाळ्याला
जणू कोणी वाली नाही,..!
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
संपातील सत्य
अहो पिछे-पिछे चलणारे
अचानकच आगे आले
अन् जे झोपलेले होते
ते ही आता जागे झाले
शेतकर्याच्या नावाखाली
हि जरी संपाची जंबड आहे
पण वेगळं श्रेय घेण्यासाठी
इथे नेत्यांचीच तुंबड आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३६७३
तडका
रंग बदलु
आज वेगळे अन् ऊद्या वेगळे
परवा देखील वेगळे असतात
मलिदा मिळताच बदलणारे
हे रंग बदलु बगळे असतात
जोवर खायला मिळत नाही
तोवर विरोध करून राहतात
एकदा खायला भेटलं की मग
विरोधकांतच मिळुन जातात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३