हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३१ मे, २०१७

तडका - करीअरच्या वाटा

करीअरच्या वाटा

इकडे आहेत, तिकडे आहेत
अजुन निर्माण होत आहेत
करीअरच्या नव-नव्या वाटा
विद्यार्थ्यांसमोर येत आहेत

ज्याला जिकडे आवडेल त्याने
तिकडे खुशाल जायला हवे
जिकडे जाल तिकडे यशाची
धगधगती मशाल व्हायला हवे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बारावी निकाल धारकांनो

बारावी निकाल धारकांनो

भरघोस घेऊन मार्क
इथे घेतले कुणी यश
तर थोडक्यात हूकून
भेटले कुणा अपयश

ज्यांना भेटले यश त्यांना
आमच्या आहेत शुभेच्छा
अन् अपयश भेटलेल्यांनो
तुम्ही हरवाव्या ना इच्छा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २९ मे, २०१७

तडका - एक कटाक्ष

एक कटाक्ष

कर्तव्यापासुन वेळोवेळी
सरकारची जणू जंप आहे
म्हणूनच तर नाईलाजाने
इथे शेतकर्यांचा संप आहे

जगाचा पोशिंदा जपण्या
सरकार फेल ठरले आहे
शेतकरी नजरेतुन पाहता
सकार जणू हरले आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २८ मे, २०१७

तडका - सामाजिक गरज

सामाजिक गरज

रासवटांच्या मनामध्ये
वाढले आहेत अविचार
होत आहेत वारंवारच
महिलां वरती अत्याचार

समाजामध्ये नारी इथे
निर्भयतेने फिरली जावी
रासवटांची रासवट काया
त्यासाठी चिरली जावी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २७ मे, २०१७

तडका - रस्ते

रस्ते

शंभर वर्षे आयुष्याचे
कागदोपत्री रस्ते आहेत
पण वास्तव पाहताना
सारे अंदाज फसते आहेत

माणसांचे इमानदारी गुण
माणसांतुन विखुरले आहेत
भ्रष्टाचाराची किड लागुन
रस्ते इथले पोखरले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २६ मे, २०१७

तडका - शॉर्टकट

शॉर्टकट

नेहमीच्या वापरातील
हा एक स्मार्ट गट
दुरून जाण्याऐवजी
वापरतात शॉर्टकट

पण ठरवलेला अंदाज
ऊलटही फिरू शकतो
अन् कधीकधी शॉर्टकट
धोक्याचाही ठरू शकतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २५ मे, २०१७

तडका - एक सुचना

एक सुचना

हा रोज-रोज बदलणारा
नैसर्गिक ढगाळपणा आहे
कुठे नफ्यात कुठे तोट्यात
हा निष्कर्षही जुना आहे

वेळो-वेळी होतात बदल
या नैसर्गिकतेच्या पर्वांनी
नुकसानापासुन वाचण्या
खबरदारी घ्यावी सर्वांनी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २४ मे, २०१७

तडका - विरोधक

विरोधक

बाहेरचेच विरोध करतील
हा समज साफ चुकीचा आहे
आपलेही करतात विरोध
निष्कर्ष अंतर्गत बेकीचा आहे

बाहेरच्यांसह आतले विरोधक
ऊघड विरोध करू शकतात
आपल्यात राहूनही आपलेच
पक्के विरोधक ठरू शकतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २३ मे, २०१७

तडका - प्रांतीय सलोखा

प्रांतीय सलोखा

आपल्याविषयी प्रेम असावं
पण दुसर्या विषयी द्वेश नको
प्रांतीय सिमांचा तिरस्कार
प्रांता-प्रांतातुन पेश नको

हा बहूमोलाचा संदेश आता
निसंकोचपणे बोधला जावा
मैत्रीचा मजबुत बंध सदैवच
प्रांता-प्रांतातुन साधला जावा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सामाजिक सत्य

सामाजिक सत्य

आपले महापुरूष म्हणजे
समाजाचा आदर्श असतो
पण महापुरूष समजायला
वैचारिकतेचा स्पर्श लागतो

ज्यांना महापुरूष समजले
ते आजही इथे ग्रेट आहेत
मात्र ज्यांना समजले नाही
ते पिकल्या पानाचा देठ आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २० मे, २०१७

तडका - जातीय डबक्यात

जातीय डबक्यात

आकुंचित जातीय विचारांनी
कित्तेक नाते तुटले आहेत
जाती-पातीच्या जळमटांत
लोक अजुन गुरफटले आहेत

सामाजिक ऐक्य साधणारे
विचार त्यांचे मेलेले आहेत
अहो लोक नष्ट करण्या इतपत
इथे लोक भ्रष्ट झालेले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १९ मे, २०१७

तडका - सरकार आणि शेतकरी

सरकार आणि शेतकरी

मागण्यावरती मागण्या झाल्या
मात्र कर्जमाफी झाली नाही
कर्जापोटी मरणार्या शेतकर्यांची
सरकारला किव आली नाही

शेतकर्याला आपला वाटेल असा
सरकारी बाणा वागायला हवा
जगाला सुखरूप जगण्यासाठी
शेतकरी सुखरूप जगायला हवा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १८ मे, २०१७

तडका - लढा

लढा

नाही आलं यश
तरी लढलं पाहिजे
मनाचं मनोबल
हे वाढलं पाहिजे

तरच यश जिद्दीने
आपलं होऊन जाईल
लढलं तरच जिंकतं
प्रचिती येऊन जाईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १७ मे, २०१७

तडका - सत्याचे मारेकरी

सत्याचे मारेकरी

जिकडं पहावं तिंकडं
तिच तीच बोंब आहे
असत्याचा इथे तर
रोज वाढता कोंब आहे

सत्याला नेहमी अडवणारे
सत्याचेच मारेकरी आहेत
वरून साव दिसले तरीही
मनी भलते अघोरी आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १६ मे, २०१७

तडका - पावसाची ओळख

पावसाची ओळख

कुणी समजला मान्सुन
तर कुणी मान्सुनपुर्व
घेऊ लागले अनुमान
या पावसाचे येता पर्व

वेग-वेगळ्या विचारांचे
वेग-वेगळे ग्रुप आहेत
पावसाच्या आयडेंटीटीचे
नानाविध प्रुफ आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १५ मे, २०१७

तडका - नैसर्गिक शिक्षा

नैसर्गिक शिक्षा

ऊन्हापासुन वाचताना
वाढला जीवाचा घोर
चढतोच आहे वर वर
हा तापमानाचा जोर

थंड हवेची झूळूकही
जणू परिक्षा घेतेय
झाल्या वृक्षतोडीमुळे
ऊन्हाची शिक्षा देतेय

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आमचं मत

आमचं मत

अकलेचे तोडत तारे
ते बेतालपणे बोलले
तसे मिडीयाचे झोत
त्यांच्याकडे वळले

त्यांच्या बेताल वक्तव्याची
मना-मनाला घृणा आहे
त्यांची पाठराखण करणे
हा नालायक पणा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १३ मे, २०१७

तडका - मान्सुनपुर्व

मान्सुनपुर्व

दाटून आले आकाशात
काळे काळे ढग
तशी ओसरू लागली
ऊन्हामधली रग

या हलक्या पावसाची
जणू एंट्री साजेरी आहे
पावसाने लावलेली ही
मान्सुनपुर्व हजेरी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १२ मे, २०१७

तडका - स्पिकिंग टिप्स

स्पिकिंग टिप्स

बोलण्यात करून चुका
नका फिरू गोल-गोल
समाजात बोलताना
जिभेचा सावरा तोल

वांगे सोलायचेच तर
नाकाने ना ते सोलावे
बोलुन फसण्या पेक्षा
विचारपुर्वकच बोलावे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ११ मे, २०१७

तडका - सावधान

सावधान

दिसले जरी सभ्य
तरीही फसु नका
घातक अंधश्रध्देत
लोकहो ग्रासु नका

या फसव्या प्रकाराने
लोकही त्रस्त झालेत
अंधश्रध्देमुळे कित्तेक
इथे ऊध्वस्त झालेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १० मे, २०१७

तडका - बोलण्यातील सत्य

बोलण्यातील सत्य

अहो हे आजचं नवं नाही
पुरतं जुणं झालेलं आहे
'दान'वे चं बोलणं म्हणे
घसरपट्टीवर गेलेलं आहे

कुणाची सभ्य,कुणाची वाकडी
कुणाची वाणी टिंगली असते
पण बरळलेलं बोलणं म्हणजे
हि स्टंटबाजीची चिंगळी असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ९ मे, २०१७

तडका - कायदा

कायदा

अन्याय अत्याचाराला
न्यायालयीन दणका आहे
प्रबळ लोकशाहीचा
कायदा हा मणका आहे

कायद्याच्या कचाट्यात आले
तरच हरले जातील गद्दार
सुखी समाज निर्मितीला
घ्यावा कायद्याचा आधार

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ८ मे, २०१७

तडका - चिंता तुर

चिंता तुर

ऊम्मेद ठेऊन
पिकवली तुर
पण बाजारी
झालो मजबुर

विकता विकंना
हि बाजारी तुर
शेतकरी झाले
इथे चिंतातुर

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ७ मे, २०१७

तडका - हमी

हमी

ऊन भलतं तापलंय
वाराही सुटला आहे
निसर्गाचा समतोल
गंभीर तुटला आहे

तुटलेल्या निसर्गाची
मनी खुमखुमी आहे
पर्यावरण जपणे ही
मानवाची हमी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ६ मे, २०१७

तडका - लबाड ओळखा

लबाड ओळखा

दाखवतात एक
अन् करतात एक
अशा लबाडांना
आता करावे चेक

जवळ जवळ राहून
हे करतात घात
म्हणून अशा लबाडांची
ओळखावी औकात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ५ मे, २०१७

तडका - लोड शेडींग

लोड शेडींग

ऊन्हाचा वाढला कहर
अंगातुन वाहे घाम
ए.सी. आणि कुलरविना
आता होत नाही आराम

नको-नकोशा ऊन्हाचा तर
जिकडे तिकडे दाह आहे
त्यात हि लोडशेडींग म्हणजे
दुष्काळी तेरावा माह आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ३ मे, २०१७

तडका - लाच

लाच

लाच देणे-घेणे गुन्हा आहे
कित्तेकजण रोज बोलतात
तरीही गरज नसताना इथे
लाचेचे व्यवहार चालतात

भ्रष्टाचारी व्यवहारांची तर
कित्तेक मनाला चीड आहे
पण लाच देणे अन् घेणे ही
टेबला-टेबलाला किड आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २ मे, २०१७

तडका - कचरा म्हणजे खतरा

कचरा म्हणजे खतरा

घरी कचरा,बाहेर कचरा
सुका कचरा ओला कचरा
आपणच केला निर्माण पण
हा जीवघेणा झाला कचरा

जिकडे पहावे तिकडे तर
इथे कचर्याचीच जत्रा आहे
पण वेळीच लक्षात घ्यावे
कचरा म्हणजे खतरा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १ मे, २०१७

तडका - शौचालय

शौचालय

ऊगीच स्वत:हून
कुणीही फसु नका
सत्य सांगतो तुम्हा
ऊघड्यावर बसु नका

नका वाढवु ऊगीच
आजारपण घरो-घरी
बांधुन घ्यावे सर्वांनी
शौचालय दारो-दारी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३