हा ब्लॉग शोधा

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

तडका - मतदान विशेष

मतदान विशेष

आता मतदान मागायला जणू
नेता  लोकांची छावणी आहे
पण मतदान करणं म्हणजेच
आपली हक्क बजावणी आहे

जागृत मतदान करणे म्हणजे
हा लोकशाहीचा खुबाच असतो
कालचे आजचे नको वाटल्यास
तिसरा पर्यायही उभाच असतो

म्हणूनच आपलं बहूमोल मत
योग्य व्यक्तीलाच गेलं पाहिजे
अन् जनहितवादी व्यक्तीमत्वच
आपण निवडून दिलं पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३