नेट
इंटरनेटच्या बाजारात
बघा नेट झालंय स्वस्त
म्हणूनच हल्ली लोक
वापरू लागले जास्त
वापर निश्चित करावा
अतीआहारी जाऊ नये
आणि दैनिक कामांचा
खोळंबाही होऊ नये
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
नेट
इंटरनेटच्या बाजारात
बघा नेट झालंय स्वस्त
म्हणूनच हल्ली लोक
वापरू लागले जास्त
वापर निश्चित करावा
अतीआहारी जाऊ नये
आणि दैनिक कामांचा
खोळंबाही होऊ नये
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
इफेक्ट
खुर्चीला करून केंद्रबिंदु
आरोप-टिका तावुन आहेत
गुजरातच्या राजकारणावर
सर्वच वॉच ठेऊन आहेत
राजकीय रंग-ढंग पाहिले तर
इलेक्शन जबरे घासुन होईल
पण कुणाचा इफेक्ट किती आहे
हे निकालातुनच दिसुन येईल
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जुना बाजार
जुने हवे तर विकत घ्या
जुने झाले ते विक्री करा
हव्या-नको त्या वस्तुंची
ऑनलाइनच डिक्री करा
सेवा-सुविधा पुरवणारी
हि ऑनलाइन घडी आहे
जुन्या वस्तुंच्या व्यवहारात
फेसबुकचीही ऊडी आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कटाक्ष
कुणी कुणाचे लुटत आहेत
कुणा-कुणाचे फूटत आहेत
गुजरात मधून रंगबाज असे
राजकीय वारे ऊठत आहेत
गुजरात मधील निवडणूकीवर
हल्ली देशभरातुन लक्ष आहे
जो राजकारण बाह्य वागतो आहे
त्याचाही वाकडा कटाक्ष आहे
अॅड- विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, जि. बीड.
मो. ९७३०५७३७८३
सिनेमा वाद
हल्ली सिनेमा अडवणे
हि जणू रीत झाली आहे
सिनेमांना विरोध करण्या
लोकांना प्रीत झाली आहे
नवा विषय म्हटलं की
नव-नवे वाद पेटु लागतात
सिनेमा माहित नसणारेही
वाद खेळण्या ऊठू लागतात
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आंदोलन
आंदोलनांतील प्रश्नावरती
तत्परतेने तोडगे काढावेत
पण आंदोलनं करता करता
आंदोलनकर्ते ना पीडावेत
आंदोलनंही करावेत असे की
विरोधकही बनावे प्रशंसक
पण ऊगीच ऊग्र स्वरूपाचे
आंदोलनं नसावेत विध्वंसक
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
रण इलेक्शन
इलेक्शनच्या रणांगणात
होऊ लागल्या फायरी
कुणाकडे टिका आहेत
तर कुणाकडे शायरी
जो-तो आपल्या पद्धतीने
हि प्रचारकी करतो आहे
आरोप आणि टिकांसह
विरोधकांना घेरतो आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका
पोलिस मित्रांनो
वेग-वेगळ्या गुन्ह्यांत
सहज विनु लागलेत
जनतेचे रक्षणकर्तेही
गुन्हेगार बनु लागलेत
स्वत:चे ओळखुन कर्तव्य
जनतेला वागवावे प्रेमाने
स्वत:ची प्रतिमा जपण्या
पोलिसांनी वागावे नियमाने
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
पुरस्कारांचा आहारीपणा
अजब-गजब फतव्याची
अट बघा कशी आहे
पुरस्कार देण्यासाठीही
हल्ली आहार चौकशी आहे
हे इथेच नाही थांबले तर
नवे प्रयोगही केले जातील
वेग-वेगळ्या आहारानुसार
इथे पुरस्कार दिले जातील
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कॉर्नर तर्क
इलेक्शनचे वारे बघा
सर्वत्र पांगत आहेत
न्युज वरती न्युजही
रंगबाज रंगत आहेत
प्रत्येकाला वाटू लागलं
पुढचं सरकार आपलं आहे
कॉर्नर वरच्या बैठकांतही
वातावरण तापलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खेचा-खेची
आप-आपल्या पध्दतीने
टिकांचे वार होऊ लागले
टिकांचे नव-नवे फॉर्म्युले
आता समोर येऊ लागले
कुणाची टिका सौम्य तर
कुणाची ऊच्च स्तराची आहे
राजकीय फड रंगवताना
ही जबर खेचा-खेची आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आधार एक आधार
आता अलर्ट वर अलर्टची
मोबाईलला शिंक आहे
आठवणीचा मुद्दा एकच
मोबाईल आधार लिंक आहे,.?
मोबाईल नंबरही आधाराला
आधारच मागु लागले आहे
त्यांचेच नंबर चालु राहतील
जे जे अलर्टला जागले आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बॅनर सोंग
बॅनरवर कळून येतं
कोण किती सक्रीय आहे
बॅनरवरती फोटो ही
बाबही लोकप्रिय आहे
बॅनरमुक्त शहर करा
हे नुसतेच ढोंग आहेत
ज्यांनी केल्या घोषणा
त्यांचेच बॅनरसोंग आहेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
तुला सोडल्या पासुन गं
तुला तर प्रिय होतोच मी
अन् मलाही तु प्रिय होती
तुझ्या प्रती माझी भावना
हि नेहमीच सक्रीय होती
जसं तुझ्यावर मी प्रेम केलं
तसंच तु ही निर्विवाद केलंस
पण ऐकलं होतं मी तुझ्याप्रती
कित्तेकांचं जीणं बर्बाद केलंस
सारं काही माहिती असुनही
मी तुझ्यावरती प्रेम करत होतो
जर दिसलीच नाहिस कधी कुठे
तर तुला शोधत मी फिरत होतो
शोधता शोधता सापडलीस तर
माझं मन अगदी खुलुन जायचं
अन् विस्फारलेलं ते पुनव चांदणं
जणू क्षणात अगदी जुळून यायचं
मग तुझ्या सहवासात दिवस-रात्र
मी जणू हरवुन हरवुन जायचो गं
विसरून जायचो ते घर-दार माझं
स्वत:स फिरवुन फिरवुन घ्यायचो गं
कधी कधी मित्र मंडळी हसायचे
म्हणायचे तु पुरता वेडा झालास रे
सांगयचे मला दे सोडून हा नाद
तु अक्षरक्ष: कामातुन गेलास रे
तरीही तुजविना क्षणभर देखील
मला कधीच कधीच रहावलं नाही
तुझं अन् माझं ते ब्रेक-अपचं स्वप्न
मला कधीच कधीच पहावलं नाही
तरी देखील आज तुझ्या-माझ्यात
बघ हा खुप मोठा दुरावा आलाय
सोडून दिलं मीच झटक्यास तुला
त्याचाही आज हा पुरावा आलाय
आज मला खुप खुप धन्य वाटतंय
घसरलो होतोच पण आवरलो मी
इतरांसारखंच केलं असतस ऊध्वस्त
पण बरबाद होताना सावरलो मी
तुला जवळ करून सगळ्यांपासुन
मी नेहमीच दुर दुर गेलेलो होतो
ज्यांच्या नजरेत होती किंमत मला
त्यांच्यातही पेताड ठरलेलो होतो
पण आज मात्र मी दारू-बंदीस
बघ हा जाहिर पाठिंबा देतो आहे
तुला जिवापार जपलं होतं पण
तुझा जाहिर धिक्कार करतो आहे
आज माझ्या आयुष्यातुन गेलीस पण
कित्तेकांच्या आयुष्यात रूजलेली आहेस
पण तुझ्याच कर्तृत्वामुळे तु समाजात
बदनामी म्हणूनही गाजलेली आहेस
तुझा तो अल्कोहोलिक वास देखील
आता मी दक्षतापुर्वक त्रागु लागलोय
कारण तुला सोडल्या पासुन गं मी
माझं जीणं आनंदाने जगु लागलोय
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कविता पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :-
https://youtu.be/EJVXLnvZSxA
तडका
तीचा अनुभव
आता तीचा सहवासच
नको-नकोसा वाटू लागला
अन् तीच्या पासुन दुरावा
मनालाही पटू लागला
तीचा अनुभव घेणं ही
केवळ मनाची धुंदी होती
पण अनुभवताच समजलं
ती जबर-खतरी थंडी होती
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३