हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

तडका - दारू बंदी,...!

दारू बंदी,...!

कित्तेकजण सांगुन गेलेत
कुणी अजुनही सांगत आहेत
दारूला वाईट म्हटलं तरीही
दारूने माणसं झिंगत आहेत

दारूच्या आहारी गेलं तर
सुखी कुटूंबही खपत आहे
मात्र इथली दारूबंदी तर
जाणीवपुर्वक रापत आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

तडका - साक्ष पक्ष

साक्ष पक्ष

कधी कोण सोडून जाईल
याचा काहीच नेम नसतो
नेते संभाळणे म्हणजे
हा साधा-सुधा गेम नसतो

आग्रह आणि बंडासह
नाराजी देखील स्पंदत असते
राजकीय पक्षा-पक्षांमध्ये
निवडणूकीय वारे कोंदत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २९ जानेवारी, २०१७

तडका - सत्तेचे सुत्र

सत्तेचे सुत्र

तो एकीचा मुलमंत्रही
मागे-मागेच राहून गेला
जुळता जुळता संसार
ऊध्वस्तही होऊन गेला

स्वबळ जाणून घेण्यासाठी
दुरावा आला जाऊ शकतो
सत्तेचे सुत्र जोडण्यासाठी
घरोबा केला जाऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

तडका - चर्चेचे ऊधाण

चर्चेचे ऊधाण

कोण कोणासोबत जाईल
याची जोरदार चर्चा आहे
राजकीय संसार जोडण्याचा
विचार ना आता दुरचा आहे

कुठे ही चर्चा आडवी-तिडवी
तर कुठे-कुठे मात्र सुजाण आहे
राजकीय घडत्या घडामोडींनी
धग-धगते चर्चेचे ऊधाण आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - व्यक्तीमत्व विकास

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

तडका - राजकीय प्रतिमा

राजकीय प्रतिमा

मतदार आकर्षित करण्यासाठी
राजकीय फडकते झेंडे आहेत
तर वस्तुंनाही लेबल लाऊन
वेग-वेगळे प्रचार फंडे आहेत

आमचा मुळीच आक्षेप नाही की
प्रतिमा कुणी कुठे ठेवल्या जाव्या
मात्र वस्तुंवरील प्रतिमां ऐवजी
राजकीय प्रतिमा पाहिल्या जाव्या

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

तडका - पक्षांचा वापर

पक्षांचा वापर

जो काल यांचा होता
तो आज त्यांचा आहे
पक्ष बदलणे म्हणजे
हा विचार मनचा आहे

कोणीही,कधीही,कसाही
कुठुन कुठेही जाऊ शकतो
राजकीय स्वार्थ साधण्यासाठी
पक्षांचा वापर होऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - घराणेशाही

घराणेशाही

आता प्रत्येक निवडणूकीत
तेच-तेच समोर आले जाते
घराणेशाहीचं लाँचिंग हे
प्रचारांपासुनच केले जाते

कित्तेक निवडणूकांमधुन
नव-नवे नेते थाटले जातात
कार्येकर्ते मात्र पळून पळून
गप-गारपणे आपटले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

तडका - सत्ता

सत्ता

आखाडे कसे रंगवायचे
हे बैठकीत ठरवले जाते
सत्तेसाठी राजकीय सुत्र
निशाण्यात हेरवले जाते

निर्णय घेणारे बदलले की
वेगळे सुत्रही येऊ शकते
मात्र जर सुत्र चुकले तर
सत्ता हातुन जाऊ शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

तडका - लाच

लाच

घेताही येत नाही
देताही येत नाही
तरी देखील लाच
बंद का होत नाही

कुठे ना कुठे रोज-रोज
हि समाजात भेटते आहे
विकासाच्या प्रगतीचा
लाच गळा घोटते आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - घोषणांचा गळ

घोषणांचा गळ

वेग-वेगळ्या अमिशांच्याही
आता घोषणा येऊ लागल्या
कुठे घोषणा फायद्याच्या तर
कुठे तोट्याच्या होऊ लागल्या

कधी कधी घोषणेत सत्यता तर
कधी कधी घोषणेत झोळ असतो
नव-नविन घोषणांचा वर्षाव हा
मतदानासाठीचा गळ असतो,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

तडका - जन आकांक्षा

जन आकांक्षा

कुणी म्हणाले जुळून येईल
कुणी म्हणाले तुटून जाईल
युती जुळणार की सुटणार हे
घोषणे अंतीच पटुन येईल

मात्र चर्चा-चर्चांमधून ऊगीचंच
शंका-कुशंका विणल्या आहेत
अन् राजकीय सुत्र हेरता-हेरता
जन आकांक्षा ताणल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

तडका - टिकाचे पिक

टिकांचे पिक

कोण कोणावर टिका करेल
याचा तर काहिच नेम नसतो
जणू टिकांविना  निभत नाही
हा तर राजकीय गेम असतो

राजकीय भाषणं,चर्चांमधुन
सुडाचे काहूर पेटले जातात
निवडणूकीय मोसम पाहून हे
टिकाचे पिकं घेतले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

तडका - दरवाढ

दरवाढ

कितीही नाही म्हटलं तरी
यातही दडेल स्वार्थ असतो
पेट्रोल डिझेल दरवाढीला
मध्यरात्रीचा मुहूर्त असतो

आमचा विश्वास ठाम आहे
हा चर्चेतुन ना जातो आहे
पेट्रोल डिझेल दरवाढीचा
वर-वर विकास होतो आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

तडका - थंडी गुलाबी

थंडी गुलाबी,...?

हा नैसर्गिक हा:हाकार जणू
पार्‍याचं रेकॉर्ड मोडलं आहे
थुड-थुड करण्या इतपत हे
थंडीचं सुमार वाढलं आहे

थंडीच्या मार्‍यात सापडल्यास
जीवाची जणू काहिली आहे
मनसोक्त आनंद घेण्यासाठी
थंडी गुलाबी ना राहिली आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १५ जानेवारी, २०१७

तडका - सत्तेचे गणित

सत्तेचे गणित

आपण कसे लढायला हवे
ज्याचा-त्याच्या फॉर्म्युला आहे
अनेकांच्या राजकीय कटाक्षात
स्वबळावरतीच डोळा आहे

स्वबळावरती लढले तर
स्वत:ची ताकत दिसु शकते
मात्र एकहाती सत्ता घेताना
बहूमताचे गणित फसु शकते,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

तडका - मकर संक्रांती निमित्ताने

मकर संक्रांती निमित्ताने

मकर संक्रांती निमित्ताने
तिळ-गुळ दिले-घेतले जातात
मनात मनापासुन घेतल्यास
जुने वादही झटकन मिटले जातात

म्हणूनच तिळ-गुळ देता-घेताना
मनातील कटूता विसरून जावे
माणसांशी वागताना माणसांमध्ये
आपुलकी अन् प्रेम स्मरून यावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

तडका - निवडणूकीय भाषणं

निवडणूकीय भाषणं

सत्तेत संधी मिळविण्यासाठी
नव-नवे फर्मान काढले जातात
लोकांच्या मनात भरण्यासाठी
घोषणांचे पाऊस पाडले जातात

निवडणूका जवळ येतील तसे
घोषणाबाजीचे जश्न असतात
मनाला भुरळ पाडतील असे
हे निवडणूकीय भाषणं असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

तडका - आऊसाहेब

आऊसाहेब

तुमच्या विचारांतील तेजाने
तुम्हीच शिवबांना घडवले
प्रजेचं रक्षण करता-करता
अराजकतेलाही बुडवले

तुमची ती युध्दनिती आणि
राजनिती आजही ग्रेट आहे
सुखमय नांदतो महाराष्ट्र हा
हि तुमचीच अमुलाग्र भेट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

तडका - युतीचं घोंगडं

युतीचं घोंगडं

ज्याच्या-त्याच्या मनामध्ये
स्वबळाचीच गती आहे
जवळ जावं की दूर रहावं
या संभ्रमात युती आहे

निवडणूका जवळ येऊनही
फाटक्यामध्येच तंगडं आहे
धरता येईना,सोडताही येईना
असं हे युतीचं घोंगडं आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

तडका - सरकारी तिजोरी

सरकारी तिजोरी

नोटाबंदी केल्यामुळे
कॅश टंचाई आली आहे
व्यवहार कॅशलेस करताना
जनता त्रस्त झाली आहे

विरोधकांकडून वारंवार
जबर कानपिळी आहे
सरकारची तिजोरी मात्र
माला-माल झाली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

तडका - निवडणूकीय चकमक

निवडणूकीय चकमक

जवळचे दुर जातात कधी
दुरचे जवळ येऊ शकतात
ज्यांना निस्वार्थी ठरवले
तेही स्वार्थ पाहू शकतात

निवडणूक आली म्हटलं की
हि चकमक बहूपात्री असते
कोणाचा पक्ष कधी बदलेल
याची काहिच खात्री नसते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ८ जानेवारी, २०१७

तडका - वाचाळांनो

वाचाळांनो

कितीही नाही म्हटलं तरी
नैतिकतेतुन विरळतात
जे बोलायला नको तेही
जाहिरपणे बरळतात

म्हणूनच आपल्या बोलण्यात
नैतिकतेचा गाभा असावा
बोलताना किमान स्वत:चा
स्वत:वरती ताबा असावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

तडका - समाजाच्या ओघात

समाजाच्या ओघात

सत्यासाठी भांडणारेही
समाजात पिडले आहेत
न्यायासाठी आजवर
इथे कित्तेक रडले आहेत

ज्यांनीही आवाज ऊठवले
त्यांचे आवाज दाबले जातात
बेईमान करतात चंगळ आणि
इमानी सत्यासाठी राबले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

तडका - स्वाभिमानींचे सत्य

स्वाभिमानींचे सत्य

स्वार्थाचा बाजार धुंडाळताना
थोडासा राजकीय विषय घेऊ
जिकडे मिळेल खायला खाऊ
तिकडेच पळतील सदा 'भाऊ',.?

हा वेळोवेळी प्रत्यय येत राहिल की
आपलेच आपल्याला काचु शकतात
ज्यांना मानलं त्यांनीच ताणलं तर
स्वाभिमानी हमखास खचु शकतात,!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

तडका - डिजिटल डुप्लिकेट

डिजिटल डुप्लिकेट

डिजिटल स्वप्न पाहताना
डिजिटल व्यत्यय आहेत
डिजिटल फसवनुकीचेही
आता अनुक्रमे प्रत्यय आहेत

डिजिटल दुव्यांचे देखील
आता डुप्लिकेट हजर आहेत
सत्यापन पडताळणी करताना
युझर्स भलते बेजार आहेत,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

तडका - समाजाची धुरा

समाजाची धुरा

व्यक्तीमत्व न पाहताच
कुणी उचलले जातात
तर पात्र व्यक्तीमत्वही
कधी कुचलले जातात

हि समाजाची रीत आहे
पण पात्रतेचा चुरा आहे
पात्रतेचा सन्मान करणे
हि समाजाचीच धुरा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

तडका - क्रांतीचा पेन

क्रांतीचा पेन

घरा-घरातील मुली
आज शिकत आहेत
जिवनाची लढाई ही
सहज जिंकत आहेत

स्रीयांची शैक्षणिक प्रगती
हि सावित्रीची देण आहे
तीच्या अथक परिश्रमाने
हातात क्रांतीचा पेन आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २ जानेवारी, २०१७

तडका - पॉलिटिकल गेम

पॉलिटिकल गेम

कधी हाकलुन देतात तर
कधी-कधी जवळ करतात
घरगुती राजकारणाचे इथे
नव-नविन माहोल भरतात

कट्टर राजकीय सुत्र देखील
कधी घरातच लढले जातात
मिडीयाचे झोत मुद्दामहून
अंगावरती ओढले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३