हा ब्लॉग शोधा

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

तडका - दांडी

दांडी

याला वयाचेही बंधन नाही
कोणत्याही वयात घडत आहे
दांडी मारण्याची सवय बघा
दिवसें-दिवस वाढत आहे

कधी-कधी ही मुद्दामहून तर
कधी अचानकही घडू शकते
पण भल्या-भल्यांना सहजपणे
हि दांडी महागात पडू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

तडका - एक्झिट बिक्झिट

एक्झिट बिक्झिट

इलेक्शन पार पडले की
निकालाचे ओढ असतात
नको त्या तर्क-वितर्कांचे
मना-मनाला लोड असतात

ज्यांचे-त्यांचे एक्झिट पोल
माना वर-वर काढू लागतात
कुणाला दिलासा कुणाला धास्ती
एक्झिट पोलही धाडू लागतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

तडका - हे एक सत्य

हे एक सत्य

कुणी देतो आहे तर बघा
कुणी पाठिंबा काढतो आहे
इलेक्शन मध्ये हा प्रकार
आता सर्रासच घडतो आहे

जिकडे स्वार्थ होइल त्याचे
लगेच गोडवे गाऊ लागतात
स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी
लोक लाचार होऊ लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

तडका - रफ टफ

रफ टफ

वाटलं होतं खरोखरच
सोडलं असेल मला तीने
आठवणींच्या बाहूपार
धाडलं असेल मला तीने

मनाला ऊबदार फिल करत
आनंदलो मनातच या धुंदीने
पण अचानक तीच्या बाहूत
आज जखडून ठेवलंय थंडीने

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३