हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

तडका - खुमखुमी मध्यरात्रीची

खुमखुमी मध्यरात्रीची

अार्थिक शोषण करत आहे
पेट्रोल-डिझेल भाव वाढता
अहो कमी केल्या भावाचाही
काढला जातो एकदाच कडता

हि इंधन दर वाढवण्याची
जणू सरकारची हमी असते
सकाळी इंधन भरणारांना
मध्यरात्रीची खुमखुमी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गोष्ट लाजीरवाणी

गोष्ट लाजीरवाणी

समाजा मध्ये वावरणारे
कित्तेक माथेफिरू आहेत
सामाजिक सुव्यवस्थेचे
पोलिस हे महामेरू आहेत

सुरक्षेच्या परिघातील
हे वास्तव स्पष्ट आहे
पोलिसांवरती हल्ले होणे
हि लाजीरवाणी गोष्ट आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

तडका - नफ्याचा ताळा

नफ्याचा ताळा

लावताना लावला
विचार करून
विकताना विकला
प्रचार करून

मात्र झाला खर्च देखील
कांद्यातुन आला नाही
कसं जगावं कांद्यावर
यात नफ्याचा ताळा नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - समाज मत

समाज मत

सुसंवादाचा मार्ग सोपा
कळत नाही सरळ तो
ज्याला बोलता येत नाही
तो हि भलता बरळतो

आपण कुठे काय बोलतो
यावर आपली किंमत असते
योग्य वेळी योग्य बोलल्यास
समाज मतही संमत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

तडका - मोर्चा वरच्या चर्चा

मोर्चा वरच्या चर्चा

वेग-वेगळे विषय घेऊन
मोर्चे हे काढता येतात
वेग-वेगळे अर्थ देखील
मोर्चांना जोडता येतात

मात्र मुख्य हेतु पासुन
विषयांतर हे होऊ नये
अन् मोर्चा वरच्या चर्चा
या भरकटत जाऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सामाजिक ऐक्यासाठी

सामाजिक ऐक्यासाठी

कुणी माणसं जोडतात
कुणी मुद्दाम तोडतात
म्हणूनच तर समाजात
राजकारण घडतात

सामाजिक बदलांकडे
विशेषत: लक्ष असावं
सामाजिक ऐक्यासाठी
सदैव कर्तव्यदक्ष असावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

तडका - एकीचे तोरण

एकीचं तोरण

कित्तेकांच्या डोक्यात
राजकारणी किडा आहे
राजकारण म्हणजे हल्ली
जणू समाजाची पीडा आहे

कुठल्याही घटणेत सर्रास
राजकारण घुसवलं जातंय
सामाजिक एकीचं तोरण
धसधसा ऊसवलं जातंय,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - फसवी जाहिरात

फसवी जाहिरात

वस्तुंचं नावलौकिक
जाहिरात सदैव करते
जाहिरातीनेच वस्तु
लोकांच्या मनात बसते

अॅम्बेसीडरचा फेस पाहून
वस्तुंचे ट्रेंण्ड वाढू शकते
मात्र फसवी जाहिरात करणे
महागात सुध्दा पडू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

तडका - व्यसन

व्यसन

समाजाच्या दिशा
भरकटत आहेत
अहो व्यसनामध्ये
फरफटत आहेत

भरकटल्या लोकांना
ना मनाची वेसन आहे
समाजाच्या अधोगतीस
कारणीभुत व्यसन आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - समाज रक्षक

समाज रक्षक

स्वत: घेऊन परिश्रम
सुव्यवस्था राखतात
म्हणूनच तर माणसं
इथे एकीने टिकतात

अशा समाज रक्षकांचा
सदैवच करावा आदर
पोलिसांमुळेच समाज
इथे जगतो आहे बेडर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

आकाशवाणी प्रोग्राम

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

तडका - अंधश्रध्देचा महामेरू

अंधश्रध्देचा महामेरू

अंध रूढीच्या अंधारात
समाज गुरफटतो आहे
जादू-टोना करणीमध्ये
समाज फरफटतो आहे

हा सामाजिक अंधकार
दूर लोटायला हवा
अंधश्रद्देचा महामेरू
आता तुटायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - माणसांची मानसिकता

माणसिकता माणसांची

कायद्याने का होईना
समान होऊ लागतील
मंदिरासह दर्ग्यामध्ये
स्रीया जाऊ लागतील

समानतेनं वागण्याची
भुमिका बजवायला हवी
माणसांची मानसिकता
आता बदलायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

तडका - जखमी पणाचा भोग

जखमी पणाचा भोग

मनोरा ऊंच करण्यासाठी
खुप मोठी होते धडपड
मात्र कधी दहीहंडी फुटता
मनोर्याचीही होते पडझड

मग कुठे काय विपरीत घडलं
ऊत्सवाअंती सुगावा लागतो
अन् जखमीपणाचा भोगही
यात गोविंदाला भोगावा लागतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कायदा पाळा

कायदा पाळा

कोर्टाचे नियम
पाळायला हवे
नियमांचे ऊद्देश
कळायला हवे

म्हणून सांगतो
कायद्यात रहा
कायदा पाळून
फायद्यात रहा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

तडका - आमचं मत

आमचं मत

नियम पाळण्यासाठी
जनतेला स्फूरण असावं
सर्वांगिन विचारांतीच
सरकारी धोरण असावे

पण करता येतात म्हणून
ऊगीच काहीही करू नये
अन् सरकारी नियम हे
समाजात टाकाऊ ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सरकारी नियम

सरकारी नियम

जनहित पाहून
नियम करावेत
समाजात याने
संयम भरावेत

सरकारी नियमांना
जनता त्रासु नये
सरकारी नियम हे
जाचक असु नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

तडका - वर्गणी बाबत

वर्गणी बाबत

सर्वांच्या सहकार्याने
ऊत्सव पडतात पार
म्हणूनच तर आहेत
हे वर्गणीचे प्रकार

घेणारांसह देणारांनाही
ऊत्साहाचं हूरूप असावं
मात्र वर्गणीच्या व्यवहारास
खंडणीचं स्वरूप नसावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांदा पाच पैसे किलो

कांदा पाच पैसे किलो

शेतकर्याला कांदा देताना
भाव भलताच वाढतो आहे
शेतकर्याचा विकत घेताना
भावाने कांदा पडतो आहे

वारंवार भेटणारं सांगा हे
दु:ख कुठवर भोगायचं
पाच पैसे किलोने कांदा
विकुन कसंच जगायचं,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

तडका - मानव निर्मित पाऊस

मानव निर्मित पाऊस

पावसाळ्यात पाऊस
दुर्मिळ होतो आहे
पावसाळी मोसमही
कोरडाठाक जातो आहे

कपटी पणाने असा
निसर्ग ही क्रुर आहे
मानवनिर्मित पाऊस
अजुनही दुर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विचार मानवतेचा

विचार मानवतेचा

धार्मिक संख्या वाढीचे
कुणी बीज पेरू लागले
बहू अपत्यांचा अट्टाहास
अविचारी करू लागले

अविचारी खुळ धरून
असा ना प्रचार करावा
धार्मिकता सोडून देऊन
मानवतेचा विचार करावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

तडका - अमिशाचे बळी

अमिशाचे बळी

गरजा लक्षात घेऊन
सुत्र हलवले जातात
वेग-वेगळ्या अमिशाने
लोक भुलवले जातात

फसव्या बाबींचे प्रसंग
कित्तेकांच्या भाळी येतात
वेग-वेगळ्या अमिशाचे
सतत इथे बळी जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तुर डाळ

तुर डाळ

मिडीयातुन वार्ता आहेत
तुर डाळ स्वस्त म्हणून
मात्र समाजातील भाव
आहेत महागाईग्रस्त म्हणून

मिडीया आणि समाजातील
तुर-डाळ भावात दरी आहे
९५ रूपये किलोची डाळ
नक्की कुणाच्या घरी आहे,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मॅनेजमेंटच्या कचाट्यात

मॅनेजमेंटच्या कचाट्यात

               कवी :- विशाल मस्के, सौताडा.
               मो. :- 9730573783

विद्यार्थ्यांच्या हितासाठीच,जीवाचं केलंय चुर्ण
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||धृ||

कित्तेकांचं भविष्य आम्ही
आमच्या हातानं घडवलं
अहो कित्तेकांचं मनोधैर्य
सहज सहजच वाढवलं

विद्यार्थ्यांच्या जीवनाला,बांधलेत यश तोरणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||१||

आमच्या शिक्षण देण्यानं
अनेकांचं दारिद्र्य हरवलं
आमच्या वर्तमानात मात्र
आमचं स्वातंत्र्य हिरावलं

तरी देखील ऊमेदीने,आमचं सुरू आहे जगणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात, जीणं झालं जीर्ण,...||२||

हे जिवंत असं वास्तव आहे
ऊगी रचलेला मनसुबा नाही
कोणताही निर्णय घेण्याची
आम्हाला कधीच मुभा नाही

गपगुमान त्यांचे जाचक आदेश,सुरू आहे पाळनं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||३||

त्यांचे आदेश पाळता पाळता
नको तो मनस्ताप होतोय
शैक्षणिक होणार्या नुकसानाचा
विद्यार्थ्यांना पश्चाताप होतोय

कितीही झाला त्रास तरी,मान्य करणार नाही हरनं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात, जीणं झालं जीर्ण,...||४||

असहाय्य या यातना आहेत
मना-मनात पोचवा हो
मॅनेजमेंटच्या जाचापासुन
शिक्षकांना वाचवा हो

एवढंच सांगुन झालं नाही, बोलायचं आहे पुर्ण
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||५||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

तडका - राजकीय डाव-पेच

राजकीय डाव-पेच

वरून एक दिसले तरीही
आतुन मत-भेद असतात
एकमेकांच्या खच्चीकरणा
त्यांच्या मनी वेध असतात

वरून सरळ दिसणारेही
इरादे रस्सीखेच असतात
स्वत:चे अस्तित्व टिकवण्या
राजकीय डावपेच असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आपले सण

आपले सण

वेग-वेगळ्या धर्माचे
वेग-वेगळे सण आहेत
वेग-वेगळ्या सणांचे
वेग-वेगळे क्षण आहेत

असे कुठले सण नाहीत
जे आनंदात नटले नाही
मात्र आपले सण सुध्दा
राजकारणातुन सुटले नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

तडका - ध्येय सिध्दी

ध्येय सिध्दी

जिंकलो नाही म्हणून
कधी हताश होऊ नये
जिंकत नाही म्हणून
प्रयत्न सोडून देऊ नये

प्रयत्न करत राहिल्यास
यश पायाशी धाऊन येतात
मनोबल भक्कम असेल तर
ध्येय साध्य होऊन जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रीती रिवाज

रीती रिवाज

चिकित्सा केल्याविना
ऊगीच काही बोलु नये
मागुन आलं आहे म्हणून
पुढे-पुढे रेटत चालु नये

रीती-रिवाजांचे बळी
समाजात ना घडले जावे
समजाला घातक असे
रिती-रिवाज मोडले जावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

तडका - जिद्द

जिद्द

मनात जिद्द असेल तर
यश सहज मिळू शकते
कार्याचं बळ जिद्द असते
निर्विवादपणे कळू शकते

म्हणूनच प्रत्येक कार्य हे
जिद्द ठेऊन करायला हवं
आपल्यातील जिद्द पाहून
ते अपयशही हरायला हवं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वास्तव बाताड्यांचे

वास्तव बाताड्यांचे

भलत्या सलत्या बाता
सहज सहज बोलतात
थापांना दाद मिळताच
काया त्यांच्या फुलतात

कामाच्या नावाने बोंबा
कर्तव्याला बीळ असते
अशा या बाताड्यांची
प्रगतीला खीळ असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

तडका - रक्षाबंधन निमित्ताने

रक्षाबंधन निमित्ताने

अहो कित्तेक रक्षाबंधन
आले आणि गेले आहेत
तरीही बहिणींचे जीणे
सुरक्षित ना झाले आहेत

सेल्फ डिफेन्स बाबतीत
त्यांना ट्रेनिंग द्यायला हवी
स्वत:चं रक्षण करण्यासाठी
बहिण सक्षम व्हायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - नराधमी टोळ्या

नराधमी टोळ्या

काल इथे, आज तिथे
ऊद्या होईल भलतीकडे
रोज घडत्या अत्याचारांचे
मनामध्ये पडती कोडे

समाजामध्येच पोसलेल्या
या नराधमी टोळ्या आहेत
त्यांच्या वैचारिक भागाला
रासवटी जाळ्या आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

आज तु असती तर,...

तडका - बस हाय फाय

बस हाय फाय

डिजिटल युगाकडे
सार्यांचीच ओढ आहे
प्रगतीच्या ओघाला
इंटरनेटची जोड आहे

इंटरनेट लक्षात ठेऊन
बसही हाय-फाय होईल
जेव्हा प्रत्येक बसमध्ये
मोफत वाय-फाय येईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सामाजिक समता

सामाजिक समता

नाइलाज म्हणून जणू
महिलांना संधी आहे
समाजात अजुनही
विषमतेची धुंदी आहे

वैचारिक प्रगतीमध्ये
समाज सारा दिसावा
स्री-पुरूष विषमतेला
मुळीच थारा नसावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

तडका - स्पर्धा

स्पर्धा

मानवी जीवनात आता
स्पर्धेला मोठं महत्व आहे
स्पर्धेनं माणूस मोठा होतो
हे मना-मनात तत्व आहे

प्रत्येकाच्या मनात इथे
स्पर्धेसाठीची तृष्णा आहे
दैनंदिन जीवनात देखील
नजरेस स्पर्धामय चष्मा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जबाबदारी

जबाबदारी

प्राणांचाही करूनी त्याग
स्वातंत्र्य वीर झटले हो
त्यांच्या पराक्रमा मुळेच
देशास स्वातंत्र्य भेटले हो

देशाला स्वातंत्र्य मिळाले
हि बाब आहे गर्वाची
पण स्वातंत्र्याचे संरक्षण
हि जबाबदारी आहे सर्वांची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

तडका - शान तिरंग्याची

शान तिरंग्याची

मनात हर्ष दाटे
सलामी ठोकताना
फूलुन येते छाती
तिरंगा फडकताना

दुमदुमतो आवाज
याचे गाता गुणगान
राष्ट्राच्या या ध्वजाची
वाढेल अशीच शान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अहो डॉक्टर

अहो डॉक्टर

अहो जीवनदाता म्हणून
डॉक्टरकडे पाहिलं जातं
डॉक्टरांमुळेच कित्तेकांचं
संपनारं जीवन वाढलं जातं

पण आडमुठे पणा करत
ऊगीच बाजुला सरू नये
अन् रूग्नांची हेळसांड
आता डॉक्टरांनी करू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रवासी अनुभव

प्रवासी अनुभव

प्रवास करताना सदा
तो सुखकर व्हावा
येणारा प्रवासी अनुभव
हा आनंदी यावा

मात्र प्रवासी आनंदास
खड्डे-खुड्डे नडले जातात
म्हणूनच तर रस्त्यांवर
अपघातही घडले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

तडका - कर्ज वसुलीत

तडका - रेल्वे रूळ सेल्फी

रेल्वे रूळ सेल्फी

सेल्फीचा छंद हल्ली
अनावर होतो आहे
डेंजर झोन सेल्फी
जीवावर बेततो आहे

हा सेल्फीचा छंद वेडा
जीवघेणा ठरू शकतो
रेल्वे रूळावर सेल्फी
महागात पडू शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

तडका - चौकशीच्या धाडीमध्ये

चौकशीच्या धाडीमध्ये

ज्याला बळ समजलं
तोच कटकट झाला
बेहिशोबी संपत्तीचा
भुज अंगलट आला

जे कमावलं सुखासाठी
तेच वेदना देऊ लागलं
चौकशीच्या धाडीमध्ये
जप्त होऊन जाऊ लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सावकारी जाच

सावकारी जाच

सावकारी कर्जाचं
अडमाप सुत्र आहे
हा सावकारी पाश
अगदी विचित्र आहे

कित्तेकांचं जीणंही
कर्जापाई हरलं आहे
तरी सावकारी वागणं
इथे ना भेदरलं आहे

कायद्याच्या साथीने
हा प्रश्न सुटला जावा
सावकारी जाच हा
कायमचा मिटला जावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

तडका - यंदा कांदा

यंदा कांदा

मनाला वाटलं
हा फेडील पांग
म्हणून लावली
कांद्याची रांग

पण यंदा कांदा
कवडीमोल गेला
भावासाठी ठेवला
तो सुध्दा सडला

सुखासाठी खुप
धडपड केली
पण कांद्याने फक्त
रडा रड केली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - इच्छा अपेक्षा

इच्छा अपेक्षा

ज्यांनी लढायला हवे
तेच दडायला लागले
म्हणूनच तर अनपेक्षित
बदल घडायला लागले

जर मनात इच्छा असेल तर
निश्चित योगही जुळू शकतात
अनावश्यक गोष्टी टाळल्या तर
अनपेक्षित घटना टळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तडका - शोभेनं बोलत असताना

शोभेनं बोलत असताना

दुसर्याचं दळण्यापेक्षा
आपलं आपण दळावं
बोलायचंच असेल तर
शोभेल असंच बोलावं

हा विचार लाख मोलाचा
जे तोलतं तेच तोलावं
शोभेनं बोलत असताना
जे कळतं तेच बोलावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३