हा ब्लॉग शोधा

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

तडका - SSC मित्रांनो

SSC मित्रांनो

हि SSC परिक्षा म्हणजे
भविष्याचे होकायंत्र असते
प्रयत्न केल्यास यश मिळते
हे तर साधे-सुधे तंत्र असते

म्हणूनच भविष्य घडवण्याला
मनी आत्मविश्वास भरून घ्या
यश ही तुम्हाला शरण येईल
तुम्हा शुभेच्छा भरभरून या

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अर्थ बजेट

अर्थ बजेट

सर्वांचा विचार करून करून
हि आर्थिक आखणी असते
नाही तर विरोधकांच्यासह
स्वकीयांचीही टोचणी असते

सर्वांची मनधरणी करणारा
ऊद्गार बाहेर सोडला जातो
नसता अर्थ बजेटचा अर्थ
वेग-वेगळा काढला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

तडका- लीप टू लीप

लीप टू लीप

२९ दिवसांचा फेब्रुवारी
प्रतिक्षेतील बेत असतात
"हे क्षण" हे असे आहेत
जे प्रतिवर्षी येत नसतात

साजरा केला तर आनंद
कष्टी झाल्यास व्याप असतो
हा लीप टू लीप चा प्रवास
म्हणजे चार वर्षीय गॅप असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अवकाळी डरकाळी

अवकाळी डरकाळी

जेव्हा-जेव्हा तो हवा तेव्हा
निसर्ग सारा तरसतो आहे
त्याची टायमिंग विसरला तो
भलत्या वेळी बरसतो आहे

निसर्ग चालतो रूतुवर
हि बाबही जणू बंकस आहे
अन् डरकाळी हि अवकाळी
हल्ली सुखाची विध्वंसक आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

तडका - इथला कोलाज

इथला कोलाज

सहज समजण्या जोगा
आहे कोलाज इथला
डोक्यावरती घेऊनही
नाचतो समाज इथला

ज्यांना घेतलं डोक्यावर
तेच बसतात डोक्यात
तेव्हा अशांना खाली पाडून
थेट घेतले जातात पायात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - मोसम दुष्काळी अवकाळी

मोसम दुष्काळी अवकाळी

पाऊस नाही आला तरी
दुष्काळाने मरण आहे
अवकाळीच्या पावसानेही
विध्वंसीच धोरण आहे

या नैसर्गिक बदलांतुन
केवळ दु:ख भाळी आहे
विध्वंसी हा मोसमच
दुष्काळी अवकाळी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

तडका - आपले माणसं

आपले माणसं

चुकां वरती हसणारे
सारेच भासतात टवाळके
आपल्या चुका सांगणारे
ते खरे असतात जवळचे

आपलेच सांगतात चुका
नसतात सांगत दुरचे कोणी
म्हणून चुका सांगणारांचा
आदर असावा सदा मनी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

तडका - फ्रिडम 251

फ्रिडम 251

ऐकायला बरं आहे
पहायला बरं आहे
स्वस्तातला मोबाईल
घ्यायलाही बरं आहे

अफवा आणि विनोद
याचाच आला महापुर
खरा फ्रिडम 251
अजुन मात्र आहे दूर

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - संजय सुटला,...!

संजय सुटला,...!!!

बॉलीवुडचा ब्लॉग
आनंदाने नटला
बॉलीवुडचा हिरो
संजु बाबा सुटला

हि संजयची सुटका
कुतुहलाने पाहतील
वर्तणूक सुधारण्या
कैदीही धजतील,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

तडका - कुटूंब झालं बेजार

कुटूंब झालं बेजार

पुतण्याचा नंबर होताच
पुन्हा काका झाला परेशान
धोक्यामध्ये येऊ लागली
मिळवलेली सारी शान

राजकीय वस्तीमधला
तो हसू लागला शेजार
चौकशीच्या घेर्‍यामध्ये
सारं कुटूंब झालं बेजार

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

तडका - ट्विटर वॉर

ट्विटर वॉर

इकडून सोडले ट्विट
तिकडून सोडले ट्विट
ऑनलाइन खेळू लागले
हे ट्विटर वॉर स्वीट

एकदा खेळून भागत नाही
पुन्हा पुन्हा ओढ लागते
पण ट्विटर वॉर खेळायलाही
कौशल्याची जोड लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कुपी माणूसकीची

कुपी माणूसकीची

माणसांकडून माणसं
आता ठरू लागले हीन
माणसांच्या जगण्याची
ऊडालीय दाना-दीन

दिवसेंदिवस वाढतेय
ती रासवटकी छूपी
माणसांमधून हरवली
माणूसकीची कुपी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

तडका - कवितेतील आठवले

कवितेतील आठवले

हसत हसत बोलतात
बोलत बोलत तोलतात
असे आठवले कवितेतुन
सदा मनसोक्त खुलतात

विनोदाने भासली तरी
तितकंच आहे गांभीर्य
विनोदाने गांभिर्य देते
यांच्या कवितेचे कार्य

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सत्याच्या बाबतीत

सत्याच्या बाबतीत

दाखवणारे ठरवतात
काय दाखवायचं ते
त्यांना पक्क ठाऊक
कसं ठकवायचं ते

पाहताहेत लोक म्हणून
ऊगीच असे ना ठकवावे
म्हणूनच दाखवणारांनी
सत्य आहे तेच दाखवावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

तडका - दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा

अस्मानी हे संकट जबर
जगण्याचीच कोंडी आहे
जिद्द पुरवण्या जगण्याची
जणू ही भांडा-भांडी आहे

शब्दांमध्ये न मावणार्‍याच
माणसांच्या अवकळा आहेत
लग्न देखील टाळण्या इतपत
या दुष्काळाच्या झळा आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - भोग

भोग

काय चांगले काय वाईट
सर्वच जाणतात सर्व
तरीही वाईट कर्माचे
ऊतावीळ चालतात पर्व

बेबंध सुटल्या मनालाही
वेळोवेळी डागावे लागतात
दुसर्याच्या कर्माचे भोगही
विनाकारण भोगावे लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

तडका - सौ-लत सवलत

सौ-लत सवलत

सवलतीची जाणीव
मना-मनात धडकते
ठिणगीही आरक्षणाची
वनवा होऊन भडकते

यांना हवी,त्यांना हवी
प्रत्येकाला हवी सवलत
सवलत मागण्याचीही
हि लागुन गेलीय लत

एकटीच मागणी ही
भासे जणू सौ-लत
हवी असेल त्यांना
देऊ करा सवलत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - घसरती जीभ

घसरती जीभ

संतापले मन तरीही
संयम ठेवावा थोडासा
आपण कुठे काय बोलावं
विचार करावा जरासा

तोल सुटत असेल तरी
आपली गती सावरावी
बोलताना काळजीपुर्वक
घसरती जीभ आवरावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

तडका - विचार महापुरूषांचे

विचार महापुरूषांचे

समाजाच्या एकीसाठी
विचार आहेत मोलाचे
त्रिकालबाधी टिकतील
अशा वैचारिक खोलाचे

जीवन सफल करण्यासाठी
वेग-वेगळ्या पर्वांनी
महापुरूषांच्या विचारांचे
आचरण करावे सर्वांनी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - जयंती शिवरायांची

जयंती शिवरायांची

हर्ष जाहला
या धरणीला
मनी दाटला
स्पंद रंगीला

सुर दुमदुमती
हे आसमंती
शिवरायांची
आली जयंती

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शिवाजीचा वार झाला

कवितेचे नाव :- "शिवाजीचा वार झाला"

कवी :- विशाल मस्के,
           सौताडा, पाटोदा, बीड.
           मो. :- 9730573783

सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

तडका - अभिवादन शिवबाला

अभिवादन शिवबाला

सोनेरी किरणे घेऊन आली
ती आठवण शिवणेरीची
हर्षा-हर्षानं खुलली काया
चकाकली हो अंबरीची

नसा-नसातुन दौडू लागल्या
स्वाभिमानी धग-धग ज्वाला
सुवर्ण क्षण हा जयंतीचा
अभिवादन हे शिवबाला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर गाजलेली कविता;

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,...

माझ्या समस्त मावळ्यांनो,महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||धृ||
आज तिनशे वर्ष होऊन गेले
हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे
पण या महाराष्ट्रात आज
रासवांचा बाजार फोफावला आहे
म्हणूनच तर तुम्हाला आज,हा सांगावा धाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||१||
काय,चाललंय काय या महाराष्ट्रात
सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय
जणू गतानुगतिक आले संपुष्टात
अन् अराजकतेचाच दरबार भरलाय
प्रत्येकजण आप-आपल्या परीनं,या महाराष्ट्राला ओरबाडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||२||
अन्याय अन् अत्याचार करणाराला
तेव्हा आम्ही पायदळी तुडवला
ते तुमचेच तर पुर्वज होते
ज्यांच्या सामर्थ्यांनं मी महाराष्ट्र घडवला
कुठे गेली ती क्रांतीची आग,का मराठी बाणा घुटमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||३||
आम्ही कित्तेक लढाया केल्या आहेत
पण कधीच शेतकर्‍याच्या पिकाला धक्का नव्हता
मंदिर,मज्जिद अन् कुराण बायबल
ना यांना कधी धक्का होता
म्हणूनच तर तो इतिहास, आजही जगभरात गौरवतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||४||
स्वराज्यात कधीच स्रीयांना भय नव्हतं
शत्रुंच्या स्रीयाही आम्ही जपलेल्या आहेत
कित्तेक गौरव केलेल्या स्रीयांना
इतिहासानंही टिपलेल्या आहेत
आज मात्र स्रीयांवरील अत्याचार पाहून,तलवारीतला जोर सळसळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||५||
जाती-धर्माच्या भींती आम्ही तेव्हाच पाडल्या होत्या
अठरा पगड जाती स्वराज्यासाठी झटल्या होत्या
स्वराज्याची निर्मिती हेच ध्येय मनी ठेऊन
क्रांतीसाठी जणू पेटून ऊठल्या होत्या
आज मात्र आम्हालाच जाती-धर्मात अडकवण्याचा प्रयत्न होतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||६||
वागायचं असेल तर माणूसकीनं वागा
जगायचं असेल तर स्वाभिमानानं जगा
नाहीतर स्वत:चे शिरच्छेद करून घ्या
पण माझ्या महाराष्ट्राला काळीमा फासु नका
मानवतेच्या कल्याणासाठी हा,कठोरतेचा हूकूम सोडतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||७||
कित्तेक मावळ्यांनी रक्त सांडवुन
हा महाराष्ट्र जपलेला आहे
एका-एका मावळ्याचं शौर्यर पाहून
हा आसमंतही दिपलेला आहे
म्हणूनच तर या महाराष्ट्रासाठी,आजही­ जीव तळमळतोय
होय,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,शिवाजी राजे भोसले बोलतोय,...||८||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783

सदरील कविता विशाल मस्के यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी आणि चालु घडामोडींवर आधारित दैनंदिन वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

सदरील कविता आवडल्यास नावासहीत शेअर करू शकता.

तडका - कायदा ऊल्लंघन

कायदा ऊल्लंघन

ज्यांच्याकडून रोखायला हवेत
त्यांच्याकडूनच होतंय संगोपन
समाजातील या गुन्हेगारीचं
जरा वाढून आलंय "मी पण"

जनतेमध्ये आहे त्यातुनही
विश्वास गमवला जाऊ नये
कायद्याच्या रक्षकांकडूनच
कायदा ऊल्लंघन होऊ नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

तडका - HSC मित्रांनो

------(  तडका - १३४८ )-----

HSC मित्रांनो

परिक्षा आली म्हटलं की
जणू मनामध्ये कोंडी असते
पण स्वत:ला पात्र ठरवण्याची
परिक्षा हिच संधी असते

वर्षभराच्या मेहनतीची
खर्‍या अर्थी कसरत असते
कधी भीती पसरते तर
कधी भीती ओसरत असतेे

निशंक होईल जीत तुमची
हा विश्वास आहे आम्हाला
धैर्यानंच हे जिंका समर
शुभेच्छा आहेत तुम्हाला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील वात्रटिका ऐकण्यासाठी आणि डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

तडका - छावण्या बंद,...???

छावण्या बंद

दुष्काळ जरी पडला तरी
शेतकर्‍याला मदत नाही
जनावरांना पोसण्यासाठी
शेतकर्‍याकडे ताकत नाही

तरीहा छावण्या बंद म्हणून
सरकारी निर्णय येऊ लागले
का वास्तवही झूगारण्या इतपत
सरकार अवलक्षणी होऊ लागले,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निर्णय घेताना

निर्णय घेताना

कोणता निर्णय कधी घ्यावा
याचं भान असायला हवं
आपल्याकडील शहाणपण
निर्णयांतुन दिसायला हवं

योग्य निर्णय घेतले तरच
योग्य दिशा कळू शकतात
मात्र निर्णय चुकले तर
खडसावणे मिळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

तडका - देश प्रेम

देश प्रेम

कित्तेकांना मातृत्व देण्या
कमीच पडली नाय
कित्तेकांची माता झाली
हिच धरणी माय

ज्या मातेने जन्म दिला
त्या मातेचे रूण स्मरावे
ज्या देशात जगतो आहोत
त्या देशावर प्रेम करावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डिजीटल बोलणं

डिजीटल बोलणं

दुर-दुरच्या दुराव्याचंही
कर्तबगारीने निर्वाण झालं
ऑनलाइन भेटणारांचंही
नविन जग निर्माण झालं

दैनंदिन जीवनातही हे जग
डिजीटल वेडं झालं आहे
ओठांवरचं बोलणं सुध्दा
हल्ली बोटांवर आलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

तडका - रजनीची आग

तडका - वागता-बोलताना

वागता-बोलताना

नको तसं वागण्या-बोलण्या
मनी भलतं आकर्षन असते
आपल्या वागण्या बोलण्यातुन
आपले संस्कार दर्शन असते

संस्कार चांगले असतील तरच
इथे माणूसकीसह टिकता येईल
आपणही तसंच वागावं-बोलावं
ज्यातुन लोकांनाही शिकता येईल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

तडका - काम करताना

काम करताना

कोणती गोष्ट कशी करावी
हा कौशल्याचा भाग असतो
मात्र न होणार्‍या गोष्टींवर
मनी भलता राग असतो

पण ऊगीच राग करत
विवेकाशी दुय्यम नसावा
कुठलीही गोष्ट करताना
मनावरती संयम असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रेम कहाणी

प्रेम कहाणी

वारंवार प्रचिती येऊन जाते
दुनिया प्रेमाची दिवाणी आहे
अन् प्रत्येकाच्या आयुष्यात
वेग-वेगळी प्रेम कहाणी आहे

हि कधी ओळखीचीच तर
कधी अनोळखी भेट असते
अन् प्रत्येकाचीच प्रेमकहाणी
हि निर्विवादपणे ग्रेट असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

स्वप्नातली परी,...

स्वप्नातली परी,....

                कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                मो. :- 9730573783

मनात पोचतो,खुदकन हसतो
आठवण तुझीच येते गं
माझ्या मनातील कोना-कोनात
प्रीत ही तुझीच जागते गं

डोळ्यांच्याही पापण्यांमध्ये
अस्पष्ट तुझं हसणं गं
सांग शब्दांत मी घेऊ कसं
तुझं प्राजक्ताचं हे दिसणं गं

ओठ गुलाबी घेऊन सखे
तु नजरेतुन गं मिरवतेस
तुझ्या प्रेमाचं मंजुळ गाणं
मनात माझ्या फिरवतेस

मी देतो तुजला हाक आणि
तु अस्पष्ट-अस्पष्ट भासते
का कळेना सांग साजनी
तुला माझ्या मनातील आस ते

तुला पाहण्या माझे गं
मन मनापासुन वेडावले
मी येताच मागे-मागे
तु का पुसुन जाते पावले

त्राण हरपते,भान हरपते
झाक जाते गं डोळ्यांतली
मग मलाही कळून येते
तु परी आहेस स्वप्नांतली

का तुटले गं स्वप्न माझे
मी होतो सताड बावरा
या मनाला सावरण्याला
मज दे तुझाच सावरा

रातंदिस मी तडफडतो गं
तुझ्या विरहाच्या विस्तवात
तुजसाठी मी अातुर झालो
तु ये स्वप्नातुन ये वास्तवात,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

---------------------------

* सदर कविता नावासहीत शेअर करू शकता.
* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

तडका - Valentine फिड

Valentine फिड

प्रेम करण्यासाठीही
मुहूर्त शोधला जातो
१४ फेब्रुवारी दिवस
व्हँलेंटाइन वदला जातो

आम्ही हे मान्य करतो की
यात तरूणाईचं लीड असतं
पण लहानांपासुन वृध्दांपर्यंत
व्हँलेंटाइनचं फीड असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - बोल शेतकर्‍याचे

बोल शेतकर्‍याचे

कर्ज फेडता फेडता
आयुष्याची झाली वाफ
पण प्राधान्याने इथे मात्र
ऊद्योगपतींचे कर्ज माफ,.?

आम्हा त्याचा हेवा नाही
पण दुष्काळात हिंमत करा
आमचे कर्जही फेडू नका
फक्त कष्टाची किंमत करा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

तडका - चर्चा

चर्चा

कोण कसा तर्क काढील
याचा काही नियम नसतो
वास्तव जाणून घेण्याइतका
माणसांकडे संयम नसतो

म्हणूनच विषय मिळताक्षणी
जणू त्यांना लागतातच मिर्च्या
अन् पडता फक्त ठिणगीही
ऊधाणी भडकतात चर्चा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शेतकरी

शेतकरी

स्वत: पिकवल्या धान्याचा
ना तोंडी सुखाचा घास आहे
कर्जात बुडतोय शेतकरी
गळी सावकारी फास आहे

आर्थिकदृष्ट्या समाजात
शेतकरी बळावला पाहिजे
आता प्राधान्याने विकास
त्याकडे वळवला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

तडका - स्टेटस

स्टेटस

जो येतोय,तो रमतोय
ऑनलाइन युगात या
हर्षासह रूसवे-फूगवे
डिजिटल ओघात या

सोशियल मिडियाचे फिड
वर-वरतीच पांगु लागले
अन् मनातील भावनाही
हल्ली स्टेटस सांगु लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३