हा ब्लॉग शोधा

सोमवार, १६ एप्रिल, २०१८

तडका - न्याय,...?

न्याय,...?

कितीही दिल्या घोषणा
कितीही काढले मोर्चे
तरी देखील न्यायापासुन
आहोत कोसो-दुरचे

धर्मांधतेला दूर सारून
लोक जागे होतील का
आसिफाच्या किंचाळ्या
न्यायापर्यंत येतील का,..?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १५ एप्रिल, २०१८

तडका - रंगीत निषेध

रंगीत निषेध

हे निषेधाचे रंग देखील
रंगी-बेरंगी होऊ लागले
जात-आणि धर्म पाहून
निषेधी रंग घेऊ लागले

कुठे काळा तर कुठे निळा
कुठे-कूठे तर भगवा आहे
रंगीत निषेध करता-करता
धार्मिक विचार नागवा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

तडका - हे क्रांतीसुर्या

हे क्रांतीसुर्या

स्री-पुरूषांच्या भेदावरती
चढवला समानतेचा साज
एकेक केलं कार्य असं की
ज्याने घडवला हा समाज

तुमच्या मुळेच विषमतेचे
आज तुटले आहेत बंधन
तुमचे विचार अन् कार्याला
आमचे विनम्र अभिवादन

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

तडका - ज्योतीबा

ज्योतीबा

स्री-शिक्षणाची ज्योत तुम्हीच
निस्वार्थपणावे लावली आहे
आजच्या या प्रगत समाजास
तूमच्या कर्तृत्वाची सावली आहे

आमच्या मना-मनावर आरूढ
तुमचे वैचारिक फर्मान आहेत
हे स्री-शिक्षणाच्या पुरस्कर्त्या
तुम्हा मानाचे हे प्रणाम आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

तडका - कायदा

कायदा

गुन्हेगारीला आवरण्या
वेग-वेगळे कायदे आहेत
कायद्याचे पालन करणे
यात आपले फायदे आहेत

वेळो-वेळी गुन्हेगारीस
कायदा नक्कीच नडेल
जर कायदा मोडला तर
माणूस नक्कीच पीडेल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

तडका - गाड्या

गाड्या

इकडे गाड्या-तिकडे गाड्या
या गाड्याच गाड्या चहूकडे
वाढल्या इतक्या गाड्या की
यापुढ्यात भरले लोक थोडे

हि माणसां पेक्षा संख्या बघा
गाड्यांचीच तर वाढली आहे
माणसांची ढोबळ आशाही
आता गाड्यांनीच वेढली आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

तडका - "सल" मानाची

"सल" मानाची

पळून-पळून पळणार कुठे
इथे कायद्याचे कुंपन आहे
वेळो-वेळी हे ही सिध्द झाले
गुन्हेगारांस याचे कंपन आहे

कायद्याचा धाक असेल तरच
अंतर्मन मनाला दटवू लागेल
गुन्हा करण्याआधी नक्कीच
"सल" मानाची आठवू लागेल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

तडका - प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा

अहो सोनु-जानु झालेत कुणी
कुणा-कुणी बाबु झाले आहेत
आता हे हमखास म्हणू शकतो
की लोक प्रेमात भोळे आहेत

मॉडर्न यूगाची मॉडर्न झलक
आजची आजीही कळवू लागली
अन् सत्तरी पार आजोबालाही
ती पिल्लु म्हणून बोलवु लागली

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निर्लज्ज विशेष

निर्लज्ज विशेष

एकदा झाले,दोनदा झाले
तरी देखील कळत नाही
निर्लजांचा हा उर्मटपणाच
की त्यांचे त्यांना छळत नाही

कितीही सांगा समजुनही तरी
त्यांच्या अकलेत भरत नाही
हे देखील फक्त त्यांनाच कळेल
जे जे निर्लज्जपणा करत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २ एप्रिल, २०१८

तडका - ही एक कमाल

ही एक कमाल

फोटोमधले माणसं हल्ली
हाय-फाय दिसु लागले
अन् वास्तवी माणसांना
बघा माणसंच फसू लागले

नैसर्गिक सौंदर्यावरती जणू
तंत्रज्ञानाचा हा रूमाल आहे
अन् फोटोंमधला देखणेपणा
हि फोटोशॉपची कमाल आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३