हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३० एप्रिल, २०१६

तडका - शान महाराष्ट्राची

शान महाराष्ट्राची

या भुमीवर शौर्य ऊजळती
अहो गरजती यश वल्गना
चरा चरातुन मिळतो सन्मान
नव पिढीच्या कला गुणांना

वैचारिक त्या क्रांतीमधली
इथे सदाबहर ही ऊत्तराची
महाराष्ट्रवासी राखु सदैव
जगी शान ही महाराष्ट्राची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - विरोधक

विरोधक

कोणी विरोधक नसेल
तर लढायला मजा नाही
म्हणूनच तर जीवनात
विरोधकही खुजा नाही

स्वेच्छेने विरोध करणे
विरोधक मनावर घेतात
सर्वात जास्त प्रसिध्दी
विरोधकच तर देतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

ऊन्हाळी प्रेम

***** ऊन्हाळी प्रेम *****

भर ऊन्हामधी मी
वाट तुझी गं पाहतो
तु ना दिसता दुरवर
जाळ काळजात होतो

अशी आस ही  मनाला
सखे तुझी गं लागली
काळजातं खोलवर
प्रीत तुझी ही जागली

जीव तुटतो तीळ-तीळ
याद तुझी ही घेताना
मनी दाटते काहूर
विरह तुझा हा पिताना

का तु दुर गं माझ्या
मी का दुर गं तुझ्या
तु ना दिसते आस पास
झाल्या सावल्या खुज्या

कुण्या क्षितिजाच्यापार
सखे दडलीस तु
तार माझ्या गं मनाची
आज छेडलीस तु

तु ना येता आस-पास
देते तुझा भास हा
स्तब्ध होतं माझं मनं
आणि फूलतो श्वास हा

राहू नको दूर दूर
आता ये ऊन्हात गं
प्रेम माझं हे ऊन्हाळी
घे तुझ्या मनात गं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता आवडल्यास नावासह शेअर करण्यास परवानगी

तडका - नीट करा निट

नीट करा निट

काळ बदलेल तस-तसे
नव-नविन फंडे होताहेत
विद्यार्थ्यांच्याही ललाटी
नव-नविन कंडे येताहेत

शिक्षण घेण्यासाठी पहा
झाले कठीण सारे बिट
पण विद्यार्थ्यांना शुभेच्छा
नीट पार पाडावी निट

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आदर्श

आदर्श

आदर्श घडवताना
आदर्श घोटाळा झाला
आदर्शच्या बरखास्तीस
आदर्श वेटोळा आला

आदर्श कोर्ट कारवाईत
आदर्श घेरू शकते
आदर्श पाडली तर 
आदर्श ठरू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

तडका - विवाह प्रवाह

विवाह प्रवाह

कुणा-कुणाच्या नशिबी
विलासाचा भोग आहे
विवाहाच्या प्रवाहाचा
शाही शाही ओघ आहे

ज्यांच्याकडे पैसा आहे
त्यांना अमाप पाणी आहे
ज्यांच्याकडे पैसा नाही
त्यांचं मरणं रानी आहे

माणसांच्याच महा चुकींमुळे
जगताना माणूस खचला जरा
माणसांना जगवण्याचा जिम्मा
आता माणसांनो ऊचला जरा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - ऊद्योजक होताना

ऊद्योजक होताना

पैसे कमवत असताना
लोकही झाले त्रस्त
कष्ट कमी करूनही
त्यांना पैसा हवाय जास्त

कुणी चान्स सोडत नाहीत
मात्र कुणाला भेटत नाही
ऊद्योजक होण्याचा मोह
कित्तेकांना सुटत नाही

कोणताही ऊद्योग करताना
नैतिकपणा पाळावा
आणि ऊद्योजक होताना
बेकायदेशीरपणा टाळावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

तडका - सैराट झिंगाट

तडका - घोटाळी भरभराट

घोटाळी भरभराट

घोटाळ्यांचा होतोय विकास
गल्लीचे वेगळे,दिल्लीचे वेगळे
धारण करून नविन स्वरूप
पुर्वीचे आणि,हल्लीचे वेगळे

अशा योजनी कळ्या नाहित
ज्यांना कुणी खुडल्या नाही
घोटाळे करत घोटाळेबाजांनी
हवाई जागाही सोडल्या नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - ऊसाचा दोष

ऊसाचा दोष

बाहेरून आले
सांगत बसले
नव-नवा वाद
टांगत बसले

तर्का मधुन वितर्क
नवा भरती केला
दुष्काळाचा दोष
ऊसावरती आला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

तडका - सोनसाखळी चोरांनो

तडका - काम देई नाम

काम देई नाम

काम करताना
राखावे भान
प्रत्येक कामात
जपावी शान

तरच जीवनात
मिळेल मान
नाही तर जीवन
क्षणात तमाम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

तडका - पुळकेबाज लोक

पुळकेबाज लोक

आपल्याकडे असेल तरच
आपले झाकुन ठेवता येते
पण आपल्याकडे नसतानाही
लोकांचे वाकुन पाहता येते

ज्या गोष्टींची घ्यावी त्यांची
दखल कुणी ना घेत असतात
पण नको त्या गोष्टींचे पुळके
नको त्या व्यक्तींना येत असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दुखण्याचा आधार

दुखण्याचा आधार

जेलमधील जगण्याला
गुन्हेगार बेजार असतो
पण कोठडीतील व्यक्तींना
दुखण्याचा आधार असतो

ज्यांना सासर समजले
तेच कधी माहेर होतात
कायद्याने आत गेलेलेही
कायद्यानेच बाहेर येतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २४ एप्रिल, २०१६

तडका - मुद्दे गुद्दे

मुद्दे गुद्दे

एकट्याची डाळ
कधी भाजत नाही
एका हाताने टाळी
कधी वाजत नाही

विरोधात राहिल्याने
मुद्दे दिसु शकतात
त्यावर एका हाताने
गुद्दे बसु शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - युतीच्या गतीत

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

तडका - विदारक सत्य

विदारक सत्य

प्रत्येकाच्या विचारांतुन
प्रत्येकाची पारख असते
कधी वास्तव मधाळ तर
कधी ते विदारक असते

समोर आल्या घटनांनाही
मनी साचवाव्या लागतात
न पटणाऱ्या गोष्टी देखील
कधी पचवाव्या लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - फुटकी पाईपलाइन

फुटकी पाईपलाइन

जसं शक्य होईल तसे
मी पाणी वाहते आहे
पाण्याच्या टंचाईसह
दुरूपयोग पाहते आहे

पाण्याची हेळसांड थांबावी
हिच मागणी आहे हटकी
मी दुरूस्तीच्या प्रतिक्षेतली
पाईपलाइन आहे फूटकी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

तडका - राजकीय वगात

राजकीय वगात

राजकारण प्रेमींनी
राजकारणातुन शिकावे
राजकारण करताना
टिका करून टिकावे

राजकारणात टिका हि वार
तर कधी कधी ढाल असते
पण खरं तर यांचीही अन्
त्यांची सुध्दा लाल असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सावरा वसुंधरा

सावरा वसुंधरा

जगण्यासाठी जीवन हवं
जीवनासाठी जमीन हवी
हिच जमीन जपण्यासाठी
कर्तव्यात कमी न व्हावी

भविष्यात होणारा धोका
आता लक्षात यायला हवा
पृथ्वी वाचवण्याचा जीम्मा
माणसांनीच घ्यायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

तडका - आमचा सल्ला

आमचा सल्ला

नैसर्गिक या दुष्काळात
राजकीय सुकाळ आहे
टिका आणि टिपण्यांचा
बहरलेला अवकाळ आहे

असे ऊकसत बसण्यापेक्षा
परिस्थितीचे भान धरावे
एकमेकांची खेचण्यापेक्षा
एकत्रितपणे काम करावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जबाबदारी

जबाबदारी

नैसर्गिक संकटां पेक्षा देखील
कृत्रिम योजना वरचढ ठरावी
भविष्यातील दुष्काळ हटवण्या
वर्तमानातच तडजोड करावी

पाणी जमीनीत गाडण्यासाठी
ऊत्स्फूर्ततेने यायला हवे
जल संधारणांच्या कामाला
प्रतेकाने हाती घ्यायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २० एप्रिल, २०१६

तडका - घोटाळ्यांत

घोटाळ्यांत

घोटाळ्यांच्या शिडीवरती
भले भले स्वार असतात
त्यांच्या त्या भ्रष्ट प्रवृत्तीचे
सामान्यांवर वार असतात

जोवर मलाई मिळेल तोवर
भ्रष्टाचारी घोटाळ्यांचे फॅन
मात्र घोटाळा बाहेर येताच
पद प्रतिष्ठाही होते म्यान,..

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बाई v/s बाई

बाई v/s बाई

बाईला बाईच
अडवु लागली
बाईची टरही
ऊडवु लागली

घातकी प्रवृत्ती
लाजली नाही
बाईला बाई
समजली नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

तडका - योजनी फासा

योजनी फासा

योजना आली म्हणताच
लोक ऊतावळे होतात
स्वत:ला लाभ मिळवताना
संगती गोतावळे घेतात

योजना वेडे लोक पाहून
कुणी फायदा घेऊ लागले
लोकांची लुबाडणूक करण्या
योजनांचा फासा लाऊ लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - लाच एक खाच

लाच एक खाच

लाच घेणे आणि देणेही
कायद्यानेच गुन्हा आहे
तरी देखील लाचखोरीचा
व्यवहार पुन्हा पुन्हा आहे

हि लाचखोरी टाळण्यासाठी
जन जागरण आहे गरजेचे
तेव्हाच सामाजिक वातावरण
होईल सुव्यवस्थेच्या बेरजेचे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


सोमवार, १८ एप्रिल, २०१६

तडका - सेल्फी

सेल्फी

कुणी काढायची गरज नाही
आपणच आपला काढता येतो
काढू द्या कुणीही काहीही अर्थ
आपला वेगळा अर्थ जोडता येतो

ज्वलंत ज्वलंत विषयांचंही
सेल्फी विषयांतर करू शकतो
ऐकुन आश्चर्य वाटायला नको
सेल्फी डावपेचही ठरू शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - दुष्काळ

दुष्काळ

माणसं तडफडत असताना
मदतीला कुणी सरकत नाहीत
पाण्याचं राजकारण करण्यालाही
हल्ली लोक टरकत नाहीत

मना-मनातुन वाहणारा
माणूसकीचा झरा आटला आहे
पाण्याच्या दुष्काळासह
भावनांचा दुष्काळ दाटला आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


रविवार, १७ एप्रिल, २०१६

तडका - दुष्काळी हमी

दुष्काळी हमी

कुणी खचुन गेले
कुणी त्रासुन मेले
दुष्काळ सोसताना
सुख रूसुन गेले

तरी देखील इथे
गांभिर्य ना समजले
दुष्काळाने कित्तेकांचे
जीवनांकुर कोमेजले

पाणी फक्त पिण्याचे नव्हे
वापरण्याचेही कमी आहे
तरीही दारू बनवण्यासाठी
कित्तेकांनी घेतलेली हमी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - सुकर्मक कुकर्मक

सुकर्मक कुकर्मक

सुकर्मक थोडे अन्
कुकर्मक झाले फार
कुकर्मिकांकडून सदा
सुकर्मकांवरती वार

परिस्थितीचे वास्तव
सदैवच बोधक
सुकर्मातील कुकर्मक
सुकर्मास बाधक

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


शनिवार, १६ एप्रिल, २०१६

तडका - राजकीय क्षेत्रात

राजकीय क्षेत्रात

नेते असो की अभिनेते
यांना प्रसिध्दी हवी असते
या लोकांची लोकांच्या
मना-मनात छवी असते

पण राजकिय वाऱ्यासारखे
शब्द फिरवत फिरू लागले
अन् नेत्यांसह अभिनेतेही
राजकारण करू लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - ऊन्हाचे मोजमाप

ऊन्हाचे मोजमाप

सुर्य ओकतो आहे आग
जमीन भलती तापते आहे
जमीनीसह हवा देखील
ऊन्हाचे चटके भोगते आहे

परिस्थितीच्या गांभिर्याने
श्वासातील अंतर वाढू लागले
तापमापीने जागो-जागी
ऊन्हाचे सर्वे घडू लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

तडका - सशक्त जीवनासाठी

सशक्त जीवनासाठी

तंबाखु गुटखा
पान मसाला
जीवाला घातक
हौस कशाला

सशक्त जिवनाचे
सुर पहावे
व्यसना पासुन
दूर रहावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - पाणी वापर

पाणी वापर

पाण्याचे अपव्यय
आता ना लांबवावेत
अनावश्यक ऊद्योग
तत्परतेने थांबवावेत

ऊद्योजकांनी आता
इथले जलदुत व्हावे
अन् पिण्यासाठी पाणी
आता प्राधान्याने द्यावे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

तडका - वाटणीचे सत्य

वाटणीचे सत्य

विदर्भाचे जनक होण्यासाठी
स्वप्नांची धडपड ऊशाला
एका आण्याचा केक कापुन
जीवाची तडफड कशाला,.?

वेगळा संसार थाटण्या साठी
आता भलतेच आतुर आहेत
पण घराची वाटणी करण्या
घरातलेच फितुर आहेत,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - वाटणीचे सत्य

वाटणीचे सत्य

विदर्भाचे जनक होण्यासाठी
स्वप्नांची धडपड ऊशाला
एका आण्याचा केक कापुन
जीवाची तडफड कशाला,.?

वेगळा संसार थाटण्या साठी
आता भलतेच आतुर आहेत
पण घराची वाटणी करण्या
घरातलेच फितुर आहेत,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - आयडॉल ऑफ नॉलेज


भिमरायाचे अनुयायी

* महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गाजत असलेली  " भिमजयंती १२५ "निमित्त एक खास रचना

-------* भिमरायाचे अनुयायी *-------

                 कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                 मो. 9730573783

फक्त घोषणा देणारे नाही
आत्मसात करणारे आहेत
वेळ प्रसंग लक्षात घेऊन
नसात वादळ भरणारे आहेत

इतिहासाला साक्ष ठेऊन
भविष्याचे आहेत निर्माणकर्ते
करताहेत हे कार्य असे
पाहूनी यांना छाती स्फूरते

कुठे नरम,कुठे गरम तर
कुठे सारेच भन्नाट आहेत
हवे तिथे होतात लीन अन्
हवे तिथे ते ऊर्माट आहेत

अन्यायाचा प्रतिकार अन्
दांभिकतेला हे तडे आहेत
वाघिणीचं दुध पिणारे हे
भिमरायाचे बछडे आहेत

शिक्षण चांगलं घेऊन हे
समाजात टिकणारे आहेत
अन्यायाच्या महासुरांना
कायद्याने ठोकणारे आहेत

महापुरूषांना डोक्यात घेऊन
मनसोक्त वाचणारे आहेत
डोक्यावरती घेऊन घेऊन
ऊत्साहात नाचणारे आहेत

घरात आहेत, दारात आहेत
गल्लीत आणि गावात आहेत
अहो भिमरायाचे हे अनुयायी
आता प्रगतिच्या तावात आहेत

या देशाची ते शान आहेत
नाहीत कुठल्याच जातीतले
राज्य घटणेने वागणारे आहेत
आहेत याच  भारतीय मातीतले

* विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
--------------------

* कविता आवडल्यास नावासह शेअर करू शकता

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

-------------------------


बुधवार, १३ एप्रिल, २०१६

तडका - घटनेचा आधार


तडका - भिमजयंती 125

भिमजयंती 125

दण् दणानण् ढोल
तर् तररा हे ताशे
अंबरीचा आनंदही
आज भुतली भासे

अहो मनात साजे
हर्षा-हर्षाने लाइव्ह
भिमरायांची जयंती
वन ट्वेन्टी फाइव्ह

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३


तडका - जात पंचायत खल्लास

जात पंचायत खल्लास

जातपंचायती राड्यांचा
आता ना ऊल्हास असेल
कायद्याच्या कचाट्याने
जातपंचायत खल्लास असेल

सामाजिक बहिष्काराचा
ढोंगीपणा हटला जाईल
कायद्याला साक्ष ठेऊन
समाजही नटला जाईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

तडका - प्रश्न महत्वाचे

प्रश्न महत्वाचे

जे दाखवायला हवेत
ते दडवले जात अाहेत
जे दाखवायला नको
ते दौडवले जात आहेत

महत्वाचे प्रश्न देखील
षढयंत्रांचे बळी आहेत
अन् नको त्या प्रश्नांच्या
मिडीयात खळी आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


तडका - इच्छा अपेक्षा

इच्छा अपेक्षा

ज्यांनी लढायला हवे
तेच दडायला लागले
म्हणूनच तर अनपेक्षित
बदल घडायला लागले

जर मनात इच्छा असेल तर
निश्चित योगही जुळू शकतात
अनावश्यक गोष्टी टाळल्या तर
अनपेक्षित घटना टळू शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


सोमवार, ११ एप्रिल, २०१६

तडका - कारणं दुष्काळाचे

कारणं दुष्काळाचे

पडल्या दुष्काळाचा प्रभाव
मानवी जीवनावर पडलाय
काम नाही पाणी नाही
माणूस दुष्काळानं पीडलाय

जगण्यापुढे माणसं आज
परिस्थितीने षंढ आहेत
मात्र दूष्काळाचे कारणंही
कुठे डोळस कुठे अंध आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


तडका - ज्योतिबा

ज्योतिबा

मुली शिकु लागल्यापासुन
बदलु लागला हा समाज
समाजात वाढू लागला
हा वैचारिकतेचा  साज

पुरूषांसह स्रीया देखील
प्रगतीच्या वेगात आहेत
तुमच्या शैक्षणिक क्रांतीने
समानतेच्या जगात आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


रविवार, १० एप्रिल, २०१६

तडका - फुलेंना वाहू फुले

फुलेंना वाहू फूले

सावित्रीची घेऊन साथ
दिप लावला ज्ञानाचा
स्रीयांना देऊन शिक्षण
मान दिधला मानाचा

स्री शिकुन प्रगत झाली
ते फेल ठरले डाव खुळे
स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या
तुज वाहतो ही भाव फूले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


तडका - दुष्काळी राजकारण

दुष्काळी राजकारण

कुणी अडवले
कुणी वाढवले
दुष्काळी मुद्देही
वारंवार चढवले

त्यांचे सारे षढयंत्र
जनतेला कळू लागले
दुष्काळी राजकारण
ते जोमाने खेळू लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


शनिवार, ९ एप्रिल, २०१६

तडका - जुणी खोड

जुणी खोड

इकडून कधी तिकडून कधी
टोमण्यावरती टोमने आहेत
परिस्थिती निर्माण करून
खिलाडी आमने सामने आहेत

कुणी मांडता मुद्दा नविन
त्यावर टिकेची झोड आहे
टिका,टोले देवाण-घेवाण
हि तर जुणीच खोड आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


तडका - जुता है कमाल का

जुता है कमाल का

पायात जर घातला
तर व्यक्ती रूबाबदार
व्यक्तीमत्व विकासाला
हा जुताही जबाबदार

अपमानही घडवू शकतो
बोलबाला है झोल का
मान-अपमान घडवणारा
ये जुता है कमाल का,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

तडका - हाक कोरडी

हाक कोरडी

विहिरी कोरड्या ठाक झाल्या
तलावही पडले कोरडे ठाक
या दूष्काळलेल्या भागांतली
कोणी ऐकेल का सांगा हाक

पाणी बचत,वापरासाठी
नवं-नवं तांडव घडू लागलं
रोजचं जीवन जगण्यालाही
पाणी महागात पडू लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३