हा ब्लॉग शोधा

रविवार, ५ जुलै, २०२०

तडका - कानपुर खबर

कानपुर खबर

दिवसेंदिवस वाढती ही
गुन्हेगारीची उभर आहे
फिल्मी गोष्ट नव्हे तर
हि कानपुर खबर आहे

चकमकीत पोलिस शहिद
हि घटना अनपेक्षित  आहे
पण यंत्रणेपेक्षाही गुन्हेगारी
सांगा कशी विकसित आहे

पोलिसांना हवी ती सुरक्षा
हवी तेव्हा धाडली जावी
अन् गुंडांना विकसित करणारी
मानसिकताच उधाडली जावी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३