हा ब्लॉग शोधा

सल्ला मोलाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सल्ला मोलाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

तडका - सल्ला मोलाचा

सल्ला मोलाचा

जिद्दीने तर सारेच लढतात
पण विजय नसतो सर्वांचा
कुणी हारतात कुणी जिंकतात
हा सिलसिला असतो पर्वांचा

विजय जरी भेटला तरीही
कधीच मन हूरळू देऊ नये
अन् पराजय जरी भेटला
तरी ऊगीच खचुन जाऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १४ मार्च, २०१६

तडका - सल्ला मोलाचा

सल्ला मोलाचा

विश्वास टाकला कुणी तर
विश्वासघात करू नका
विश्वासाला तडा देत
शब्दांवरून फिरू नका

जे सत्य असेल तेच बोला
पोकळ थापा ऊपसु नका
पाठीशी आहोत म्हणून
पाठीत खंजीर खुपसु नका

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३