हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

गीत मोडलेल्या आयुष्याचे

 ~!!! गीत मोडलेल्या आयुष्याचे  !!! ~


माझ्याच पाऊलखुणा, मोडत मी जात होतो

मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो


त्यात नव्हता भाव काही

त्यात नव्हता डाव काही

जे मी आज मोडत होतो

ते होते माझेच नाव काही


माझ्याच बरबादी चा, मी जणु कात होतो

मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो


ना कुणीही माझे होते

ना कुणाचे ओझे होते

आपुलकीच्या उंची वाले

आज स्वार्थापुढे खुजे होते


त्यांचा स्वार्थही मी, घटघटा पीत होतो

मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो


या मोडलेल्या आयुष्याचा 

यमक आज हुकला आहे

आणि आयुष्य जगण्याचा

हा अंदाज ही चुकला आहे


माझी जीभ चावणारा, मीच जणु दात होतो

मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो


हा धडा शिकण्यासाठी

कित्येक धडे घ्यावे लागले

गोड वाटणारे  कडवट घोट

कित्येक घडे प्यावे लागले


तरी सुखाची वाट, अधाशीपणे पहात होतो

मोडलेल्या आयुष्याचे, गीत मी गात होतो


विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड.


कविता ऐकण्यासाठी व्हाट्सएप नंबर :- 9730573783

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

तडका २२३० - गांधीजीगांधीजी

दिसुन येते स्वार्थी लगबग
इथे सत्ता ओढुन पळायची
आज भारत जोडायची नव्हे
गरज आहे जोडुन ठेवायची

तरच भारताचे भविष्य सदा
सदाबहार फुललेले असेल
भारतीयांचे मन भारतीयांशी
आपुलकीने जुळलेले असेल

हि तर क्रांतीची झलक आहे
त्या दिशेने एकेक पाऊल आहे
आणि या यात्रेचा अथक यात्री
गांधीजी तुमचाच राहुल आहे

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

तडका - विशाल संदेश

विशाल संदेश

तुज हाती चावी आहे
या देशाच्या ही सत्तेची
तुच ठरव दिशा आता
या देशाच्या गुणवत्तेची

संविधानिक बलाढ्य बल
बघ तुज पाठी खंबीर आहे
उठ उधळून भोवळ तुझी
तुच देशाचा शूरवीर आहे

सत्तेतील सुस्त गेंड्यांपुढे
तु कधीही घसरू नकोस
तुज हातीच चावी सत्तेची
कदापिही विसरू नकोस

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

तडका - हे मनोरूग्णिका

✨✨✨ *तडका - २२२८*✨✨✨

हे मनोरूग्णिका

मनावरती  झालाय आघात
तुझं मन भलतच बडबडतय
कुणी म्हणावं शहाणं म्हणून
ते कडू लाही गोड बोलतय

तुझ्या बुध्दीचा विचार करता
विचारणार नाही की हे "क्युं" आहे
कारण "अवार्ड ऑफ द मनोरूग्णिका"
"स्पेसिअली फॉर यु" आहे,...

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. 9730573783

___________________________________

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

तडका - 'पेट रोल'

'पेट रोल'

कुणीही बोला, कितीही बोला
हा घोळ वाटतं सुटणार नाही
त्यांचेच बोल त्यांनाच दाखवा
आज त्यांनाही पटणार नाही

त्या जुन्या त्यांच्या बाता आणि
जुन्याच त्यांच्या थापा आहेत
अहो अच्छे दिन जगता जगता
सामान्यांना भलत्या धापा आहेत

यात झालेत कुणी उबदार मात्र
कुणी भलत्या आर्थिक थंडीत आहे
महागाईचा विकास करता करता
इथे 'पेट रोल' मात्र कोंडीत आहे

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३