हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २५ जून, २०२०

तडका - पदाच्या नादात

पदाच्या नादात

या भूलथापा नाहित
हि खबर ताजी आहे
काल जो माजी होता
तोच आज आजी आहे

कितीही बदलल्या टर्म
त्यांना फरक पडत नाही
लोक जाऊ द्या गेले तरी
पण घर पद सोडत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

https://youtu.be/5pH1zp9gTGo

बुधवार, २४ जून, २०२०

तडका - कमळाचा गोपी छंद

कमळाचा गोपी छंद

करावा लागला संघर्ष
मग बनवला गेला मोहरा
मोहरा बनुन डाव खेळुन
आता बदलुन आला चेहरा

त्याने खेळलेला खेळही 
इथे प्रचंड गाजलेला आहे
त्याचीच दिलती कुर्बानी
आता तोच सजलेला आहे

त्याच्या प्रत्येक बोलण्याला
आताही त्यांचाच गंध आहे
शाब्दिक शिंतोडे उडवणारा
हा कमळाचा गोपी छंद आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

--------------------------------------------------

लिंक :- https://youtu.be/siNORktT1LM

तडका - अनलॉक 2.0

अनलॉक 2.0

कोरोना म्हणजे कर्दनकाळ
हे जगजाहिर झालेले आहे
म्हणूनच जगभर कोरोनाला
विशेष महत्त्वही दिलेले आहे

स्वत:चाच करावा घात
हे जनतेलाही पटत नाही
पण कितीही पाळा बंद
गरजा, कर्तव्य सुटत नाही

अनलॉकच्या सवलती घेताना
जनता जपुनच वागली आहे
उत्सुकता अनलॉक 2.0 ची
आता जनतेलाही लागली आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

युट्युब लिंक :- https://youtu.be/3yuNwf9j_Rg


रविवार, २१ जून, २०२०

तडका - ग्रहण

ग्रहण

ग्रहण आणि सुतक यांचे
अगदी जुने नाते आहेत
कुणी म्हणतात खरे तर
कुणी म्हणतात हे खोटे आहेत

नाते खरे वा खोटे असो
ग्रहण मात्र गाजले जाते
कुठे पाळतात सुतकही
कुठे मात्र हे पुजले जाते

ग्रहण म्हणजे नैसर्गिकता
मना-मनात पटवले जावे
अफवा आणि अंधश्रध्दांना
समाजातूनच हटवले जावे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३


शुक्रवार, १९ जून, २०२०

तडका - चीनला चंदन

चीनला चंदन

बुलेट को वॉलेट से टक्कर
विचार नक्कीच छान आहे
स्वदेशी वस्तू आणि व्यक्तींचा
आम्हालाही अभिमान आहे

आयात आणि निर्यातीवरती
बंधन घालता येईल का,...? 
खर्या अर्थाने वॉलेटने चीनला
चंदन लावता येईल का,...?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

-----------------------------------------------
सदरची वात्रटिका युट्युब वर नक्की पहा

लिंक :- https://youtu.be/j5KNWShaX8U

गुरुवार, १८ जून, २०२०

तडका - बेत

बेत

आकाशातील काळे ढग
रोज-रोज हेरले जातील
शेतकर्यांचे स्वप्न देखील
मातीमध्ये पुरले जातील

शेतातील पिकांसह स्वप्नही
नव अंकुर घेऊन वर येतील
कर्ज फेडण्याच्या आशाही
मग नव-नविन जोर धरतील

निसर्गाने दिली साथ तरच
सुखावतील  सारे शेतकरी
हिच अपेक्षा घेऊन मन
मनातल्या मनात बेत करी

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १६ जून, २०२०

तडका - सुनो चाइना

सुनो चाइना

आमच्या देशातील जवान हे
आम्हा देशवासियांचा प्राण आहे
आमच्याशी नडला तो फोडला
आम्हाला अस्मितेची आन आहे

हुडबुध्दीने वागाल तर नक्कीच
तुमच्या सुखाचा खो होईल,...! 
आम्हाला नडल्यास जगभरातून
तुमचा युज अँण्ड थ्रो होईल,..! 

तरीही तुम्हाला सांगणं आहे
या वाटेवर कधीच यायचं नाही
नसता आम्ही मनावर घेतल्यास
चीन अस्तित्वातही रहायचं नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

________________________________

युट्युब वर पहा जबरदस्त चपराक - https://youtu.be/5YMiUB6oQQ0


सोमवार, १५ जून, २०२०

ऑनलाइन एज्युकेशन

ऑनलाइन एज्युकेशन

अहो शिक्षणाचे धडे आता
ऑनलाइन फेकु लागतील
मग घरात बसल्या बसल्या
विद्यार्थीही शिकु लागतील

या डिजिटल प्रणालीमुळे
शिक्षण नक्कीच स्मार्ट होईल
शिक्षण देणे आणि घेणेही
एक ऑनलाइन आर्ट होईल

पण या ऑनलाइन शिक्षणापासून
गोर-गरिबं ना हिरावली जावी
विद्यार्थी ऑनलाइन येण्यासाठी
साधन सामग्रीही पुरवली जावी,.!

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३


रविवार, १४ जून, २०२०

तडका - सुसाइड

सुसाइड

कोणते ना कोणते कारण
मनाला तणाव देत असते
मनावरती तणाव म्हणजे
मनही सुन्न सुन्न होत असते

मनावरती तणाव येणे हे
लक्षण भयंकर वाइट आहे
मात्र ताण-तणावावर उपाय
कदापीही ना सुसाइड आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १३ जून, २०२०

तडका - कोविड योध्दा सर्टिफिकेट

कोविड योध्दा सर्टिफिकेट

कोरोना जागतिक आपत्तीत
अनेकांनी योगदान दिले आहे
लोकांचे दारू पिणे देखील
जाहिरपणे कामी आले आहे

अर्थव्यवस्थेला लावला हात
छातीठोकपणे सांगु शकतील
अन् कोविड योध्दा सर्टिफिकेट
आता दारूडेही मागु लागतील

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १० जून, २०२०

तडका - पावसाळी प्रेम

पावसाळी प्रेम

तो दिसत नव्हता तर
ती पुरती बैचेन होती
तीच्यासाठी तो म्हणजे
अगदी दैवी देण होती

तीची आणि त्याची जोडी
उत्तुंग प्रेमाचं प्रतिक आहे
नातं तानलं तरी तोडू नये
हि त्यांचीच तर शिक आहे

तीची व्याकुळता पाहुन
तो आज तिच्या चरणी आहे
तो म्हणजे मेघराजा आणि
ती म्हणजे ही धरणी आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ८ जून, २०२०

तडका - ऑफिस ऑफिस

ऑफिस ऑफिस

ऑफिस म्हणजे धावपळ
पुन्हा एकदा जाहिर झाले
ऑफिस सुरू झाल्यामुळे
लपलेले चेहरे बाहेर आले

कर्मचार्यांना पाहुन कदाचित
ते ऑफिसही दचकलं असेल
जुन्या आठवणीच्या हूंदक्यानं
अहो नक्कीच आचकलं असेल

हि नव्याने सुरूवात समजून
प्रगती नव्याने वधारली जावी
काळजी आणि जबाबदारीही
अगदी चोख निभावली जावी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ७ जून, २०२०

तडका - अनलॉक १.०

अनलॉक १.०

सामाजिक बांधिलकी साठी
आमचं मुद्दाम छापणं आहे
आपण स्वत:ला जपणं म्हणजे
हे समाजालाही जपणं आहे

आपण हे विसरूच नये की
आपणच समाजाचा हिरो आहे
कारण प्रत्येकाच्या जबाबदारीचं
आज हे अनलॉक १.० आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

तडका - दुकानांची व्यथा

दुकानांची व्यथा

जरी अटी-शर्तींवरती दुकान
उघडण्यासाठी मुभा आहे
तरी दुकानाच्या असपास
कुणी ग्राहक ना उभा आहे

पोट भरण्याचा प्रश्न म्हणून
दुकाने जरी उघडले आहेत
तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
आर्थिक स्रोत गडगडले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

................................................... 

युट्युब लिंक :- https://youtu.be/RqnjDtDEnJ8

शनिवार, ६ जून, २०२०

सम-विषम

सम-विषम

आज बंद उद्या चालु
नियम आहे गरजेचा
लॉकडाऊन सोडताना
आरोग्याच्या बेरजेचा

सम-विषमता पाळत
प्रशासनाला साथ द्या
एकमेका सहाय्य करत
कोरोनाला मात द्या,...

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो.  9730573783

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

युट्युब लिंक :- https://youtu.be/X_Wvx1QYLRU

गुरुवार, ४ जून, २०२०

तडका - हात्तीच्या आईला

हात्तीच्या आईला

प्राणी मित्रांवर दया करा
समाजाचे हे ब्रीद आहे
तरी प्राण्यांची हत्या होते
याचा मनाला खेद आहे

अविचारी त्या माणसाला
हा प्रकार कसा पटला असेल
नक्कीच हात्तीच्या आईला
माणूस राक्षस वाटला असेल.?

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

वात्रटिका :- हात्तीच्या आईला
वात्रटिकाकार :- विशाल मस्के
मोबाईल नंबर :- 9730573783


वात्रटिका पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :- https://youtu.be/19B8qb5kdMU

मंगळवार, २ जून, २०२०

तडका - आपत्तीच्या सामन्याला

आपत्तीच्या सामन्याला

कोरोना वाढत असतानाच
उंबरठ्यावर वादळ आहे
एकामागून एक संकटाने
ही आपत्तींची वर्दळ आहे

आता खचलेल्या मनांनीही
पुन्हा नव्याने उठावे लागेल
प्रत्येक आपत्तीच्या सामन्याला
सार्यांनी मिळुन झटावे लागेल

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३

एक खाच मनाची

एक खाच मनाची

घरात रहा, घरात रहा
सुरक्षेचे सांगणे आहे
तरी देखील समाजात
लोकांचे हे पांगणे आहे

कुणी भलताच दक्ष तर
कुणी मात्र ढिलाच आहे
माणसांचा शत्रू माणूस ही
मानवी मनाची खाच आहे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३