हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

तडका - चैतन्याचा हर्षदिप

चैतन्याचा हर्षदिप

दिवाळीच्या ऊत्सवाची
आतिशबाजी रात आहे
आनंदाच्या दिव्यांना
हि स्नेहाची वात आहे

हर्षाच्या ऊत्कर्षासह
दिव्याने दिवा पेटावा
चैतन्याचा हर्षदिप
घरा-घरात नटावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

करंजी बोले अनारस्याला

-----( करंजी बोले अनारस्याला )-----
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

करंजी बोले अनारस्याला
भाऊ दिवाळी आली आहे
गरम-गरम उकळत्या तेलात
तळायची वेळ झाली आहे

मग अनारसे बोले करंजीला
मनी भीती का जमवली आहे
आपल्या कित्तेक पुर्वजांनीही
स्वादिष्ट चव कमवली आहे

आज त्याचाच फायदा होतोय
लोक आवडीने खाऊ लागलेत
मोजक्या-मोजक्या पदार्थांत
नाव आपलंच घेऊ लागलेत

त्यांनीच अस्तित्व दिलंय हे
मग त्यांच्याच हातुन मोडू दे
अन् घरा-घरात दिपावलीचा
आता आनंद सर्रास वाढू दे

करंजी बोलली हसुन हसुन
समजलं रे माझ्या भाऊराया
आपल्या पुर्वजांची परंपरा
नाही जाऊ देणार मी वाया

हे सारं काही कळून देखील
मी मुद्दाम तुला घुमवले आहे
माणसांची सेवा करण्यातंच
आपले सौख्य सामवले आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783
_______________________

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783

* सदर कविता शेअर करण्यास परवानगी

* www.vishalmske.blogspot.in

तडका - शुभ शुभ दिपावली

शुभ शुभ दिपावली

या गगणात वाजे
फटाक्यांचा सुर
दिवाळीच्या हर्षाने
हा आनंदला ऊर

रांगोळीच्या स्पर्शाने
धरणीही सुखावली
सर्वांनाच जावो ही
शुभ शुभ दिपावली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

तडका - अवस्था युतीच्या

अवस्था युतीच्या

कधी आहे म्हणतात
कधी नाही म्हणतात
कधी ठाम बनतात
कधी वाही बनतात

इलेक्शन जवळ येताच
चर्चा वाढतात युतीच्या
पण त्यांच्याच अवस्था
आता आहेत गुंता-गुंतीच्या

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

तडका - आपले बोलणे

आपले बोलणे

आपण काय बोलतोय
हे ही विसरतात माणसं
बोलता बोलता सहज
कधी घसरतात माणसं

न घसरण्याजोगे सदा
शब्द हे ठाम असावेत
आपल्या बोलण्यावरती
आपले लगाम असावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

तडका - अधिकारी

अधिकारी

कर्तव्यदक्ष अधिकारी
जनतेला हवा असतो
त्याच्या कर्तव्यदक्षतेचा
गर्वाने गव-गवा असतो

मात्र स्वाभिमानी
इथे टोचला जातो
जो असेल लाचार
तो पोसला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

तडका - सिनेमा आणि वाद

सिनेमा आणि वाद

सिनेमांवरती वाद
आता सजु लागलेत
वादांमुळेच सिनेमे
खरं तर गाजु लागलेत

सिनेमांवरचे वादही
प्रसिध्दि पुरक आहेत
कित्तेक वादग्रस्त सिनेमे
आजही प्रेरक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

तडका - चौकशीचं हत्यार

चौकशीचं हत्यार

पुढे जाणारालाही कधी
मुद्दाम मागे खेचता येतं
नियतीबाह्य वागणाराला
सतासपणे टोचता येतं

सहज वार करण्याजोगी
लपलपती कट्यार आहे
भल्या भल्यांना सतावणारं
हे चौकशीचं हत्यार आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

तडका - एक हेतु

एक हेतु

कधी बिनबुडाचे तर
कधी बुडासकट आहेत
या आरोपांच्या पार्श्वभुमी
इलेक्शन निकट आहेत

इलेक्शनच्या निमित्ताने तरी
यावी ती खरी सच्चाई बाहेर
परस्परांतील मत-भेदांमधून
यावी लुच्चांची लुच्चाई बाहेर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

तडका - राजकीय संसार

राजकीय संसार

कुणी सुसाट जातील
कुणाला अडवले जातील
नव्यासह जुने पॅटर्नही
नव्याने लढवले जातील

मैत्रीचं नातं सांगत सांगत
हातात हात घेतील का,..?
तुटलेले राजकीय संसार
पुन्हा एकत्र येतील का,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

तडका - जीत

जीत

इलेक्शन जवळ येताच
नव्या-नव्याने जोर घेतात
नव्यासह जुने आरोप
जहालपणे बाहेर येतात

इलेक्शन म्हटलं की
हि हेरलेलीच रीत असते
मात्र शेवटी ठरलेली
जनते हातीच जीत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

तडका - सरकारची भुमिका

सरकारची भुमिका

प्रश्न तेच ते जुने आहेत
बदललेत फक्त मांडणारे
आक्रमक आहेत आजही
सरकार विरोधी भांडणारे

मागण्या करणारांच्या हाती
आज सत्तेचा लगाम आहे
सत्ताधारी विरोधक झाले तरी
सरकारची भुमिका ठाम आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

तडका - भेटीचे अर्थ

भेटीचे अर्थ

कधी गुपित,कधी जाहिर
होत असतात भेटी
कधी घडल्या प्रसंगासह
भेटी राहतात ओठी

जस-जसे क्षेत्र बदलतील
तस-तसे तर्कही बदलतात
काळ-वेळ-ठिकाण पाहून
भेटीचे अर्थही ओघळतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

तडका - संधी

संधी

संधी नसताना
न खचावं मनं
असलेल्या संधीचं
करावं सोनं

संधी नाहित म्हणून
ना आशा हराव्यात
संधी येत नसतात
त्या निर्माण कराव्यात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

तडका - अफवा टाळा

अफवा टाळा

सोशियल मिडीयामुळे
ऑनलाईन ऐक्य होऊ लागलं
प्रचार आणि प्रसारणही
सहज शक्य होऊ लागलं

मात्र ऑनलाईन असताना
जागरूक पणाही पाळावा
आणि सोशियल मिडीयात
अफवांचा उपद्रव टाळावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

तडका - भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

मानसांच्या मनसुब्यांत
इमानदारी फिड डागली
विकासाच्या मजबुतीला
भ्रष्टाचारी किड लागली

माणसांच्या कटू नियतीने
विकास इथे किडले आहेत
पण भ्रष्टाचार पोसणारेही
समाजातच दडले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

तडका - बोलण्याची कला

बोलण्याची कला

विविध पैलु घेत-घेत
कुणाचं बोलणं रंगलं जातं
तर शब्दांनी वार करणारं
कुणाचं बोलणं झोंबलं जातं

कुणाचं बोलणं ऊत्साह
कुणाचं बोलणं बला आहे
योग्य वेळी योग्य बोलणं
हि सुध्दा एक कला आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

तडका - राजकारण

राजकारण

आलेली संधी कुणीच
सहजपणे सोडत नाही
संधी ओढून आणायलाही
आता कुणी नडत नाही

आतल्यासह बाह्य चित्र
स्पष्ट स्पष्ट दिसत आहे
ऊत्सवांमध्ये देखील इथे
राजकारण घुसत आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

तडका - दसरा

दसरा

अयोग्य रिवाज टाळून
योग्य तेच टिपलं जावं
ऊत्सव साजरे करताना
पर्यावरण जपलं जावं

भविष्यात येणारा
आताच टाळावा खतरा
वृक्षारोपण करून
साजरा करावा दसरा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - खंत आपटा सौंदडीची

खंत आपटा सौंदडीची

प्रत्येक वर्षी दसरा येतो
अन् आनंदाने निघून जातो
आमच्या मान सन्मानासह
हाल अपेष्टाही बघून जातो

तुमच्या आनंदाचा बोजा सारा
दु:ख बनुन आमच्या भाळी येतो
आमच्या पाल्यासह फांद्याचाही
यात प्रत्येकच वर्षी बळी जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आंदोलनं

आंदोलनं

निषेधार्ह गोष्टींचा
निषेध जरुर करावा
समाजात मिसळावे
न बाळगता दुरावा

जेव्हा समाजात प्रकार
अनुचित घडतात
तेव्हा आंदोलनीय शक्ती
ऊपयोगी पडतात

आंदोलनांतुन निश्चित
जागरूक बाणे दिसावेत
मात्र आंदोलनं हे
हिंसक लयाचे नसावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

तडका - सामाजिक सुव्यवस्थेसाठी

सामाजिक सुव्यवस्थेसाठी

चिंताजनक स्थिती
इथे घडू लागलीय
समाजातील गुन्हेगारी
हल्ली वाढू लागलीय

गुन्हेगारीला रोखण्यासाठी
कायद्याचेच वार व्हावेत
सामाजिक सुव्यवस्थेसाठी
समाजात गुन्हे गार व्हावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

तडका - मिडीयाचा दरवाजा

मिडीयाचा दरवाजा

कधी आतुन तर कधी
बाहेरूनही रेटा असतो
चर्चेमधे राहण्यासाठी
मोठा आटा पिटा असतो

छोट्या छोट्या गोष्टींचाही
भलता गाजा-वाजा असतो
मात्र ठराविक लोकांनाच
खुला मिडीयाचा दरवाजा असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

नयन भावना

--------------------} नयन भावना {------------------

माझ्या नयनाची कामना,पुरेपुर होऊ दे
तुझ्या नयनात सखे,खोल खोल पाहू दे

भारावलो मी हरवलो,प्रेमात गं तुझ्या
शोधतो मलाच मी, नयनात गं तुझ्या

आठवणी या हूंदक्यात,मावेनात गं
जीर्ण जीर्ण झालो मी,तुझ्या प्रेमात गं

ऐकुनी ये तु सत्वरी,हाक ही जुनी
तुझ्या विना मनाची,काया हि उणी

नको देऊस सये,असह्य ती उपेक्षा
लयास जा तु घेऊनी,माझी ही प्रतिक्षा

मनामध्ये तुझ्या,मला तु सामावुन घे
जीवनात माझ्या,तु विना विलंब ये

आपल्या गं जगण्याला,देऊया ऊभारी
जिद्दीची एक दिमाखात,घेऊया भरारी

सखे तु न् डगमगता,हातात हात दे
तुला देईन साथ मी,तु मला साथ दे

आयुष्याच्या पटलाला,नवा रंग देऊ
सुख-दु:खे कवटाळत,संग संग राहू

माझ्या नयनाची कामना,पुरेपुर होऊ दे
तुझ्या नयनात सखे,खोल खोल पाहू दे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783

-------------------------------

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदरील कविता ऐकण्यासाठी आणि चालु घडामोडीवर आधारीत वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

www.vishalmske.blogspot.in

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

तडका - चिंतेची बाब

चिंतेची बाब

काळाच्या ओघात
भलते चतुर झाले
ज्यांना मोठं केलं
तेच फितुर झाले

निव्वळ स्वार्थ
त्यांच्या डोक्यात आहे
इमानदारी सुध्दा
आता धोक्यात आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - जाहिरातीचे तथ्य

जाहिरातीचे तथ्य

वस्तु खपवण्यासाठी
प्रचार हवा असतो
प्रत्येक जाहिरातीचा
विचार नवा असतो

त्यांची प्रत्येक स्टेप ही
निव्वळ खपाव सुत्री असते
मात्र जाहिराती मधील
आश्वासनांची खात्री नसते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

तडका - अनारकी भाषा

अनारकी भाषा

कार्येकर्ते सांभाळण्याची
भली पराकाष्ठा असते
हे ओळखने अवघड की
कुणाची खरी निष्ठा असते

स्वकीयांसह मित्रत्वातील
निवडणूकीय दशा हेरतात
अन् छोटे-मोठे नेते देखील
अनारकीची भाषा करतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निवडणूकीत

निवडणूकीत

निवडणूका जवळ येताच
मताचे शेतं हेरू लागतात
समाजात आग लावणारेही
गोड गप्पा मारू लागतात

मात्र समाजाने न चुकता
आपलं हित जाणून घ्यावं
सामाज हित जपणारांनाच
निवडणूकीत निवडून द्यावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

तडका - समाज

समाज

कधी मोर्चात,कधी आंदोलनात
कधी मेळाव्यात रेटला जातो
जस-जशी गरज भासेल तसा
समाज वापरून घेतला जातो

मात्र या ढोंगीं हेतुं पासुन
समाज कधी ना फसला पाहिजे
सामाजिक अस्मिता जपण्यासाठी
समाज डोळस असला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - राजकीय वारे

राजकीय वारे

निवडणूका जवळ येताच
आरक्षणावर डोळे असतात
राजकारण खेळण्या लोक
भलतेच ऊतावळे असतात

जसे आरक्षण भेटले असेल
तसे सुत्र फिरायला लागतात
गल्ली-गल्लीतुन राजकीय वारे
नवे डावपेच करायला लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

तडका - कलंक

कलंक

समाजात गुन्हेगारांची
नवी फळी होऊ लागली
रोजच्या वाढत्या गुन्ह्यांची
रोज बातमी येऊ लागली

गुन्हेगारांच्या दुष्कृत्याचे इथे
जाती-धर्मालाही डंख आहेत
मात्र गुन्हेगार जाती धर्माचे नव्हे
तर समाजालाच कलंक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

तडका - राजकारण

राजकारण

नको नको म्हणतानाही
सहज सहज घूसले जाते
अन् सामाजिक मुद्यांनाही
राजकारणाने पुसले जाते

प्रसिध्दीच्या झोतामध्ये पुढे
सदा राजकारण राहिलं जातं
सामाजिक कार्यामध्ये देखील
राजकीय कोण ते पाहिलं जातं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - रेन इफेक्ट

रेन इफेक्ट

पावसासाठी माणसं
इथे झाले होते आतुर
मात्र आता पावसाने
केलं आहे चिंतातुर

आल्या पावसाने इथे
दुष्काळाला ओलं केलं
हाती तोंडी आलेलंही
ओरबाडून सारंच नेलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

तडका - समाजहित

समाज हित

हल्ली समाजामध्ये
सर्रासपणे खेळलं जातं
प्रत्येक विषया मध्ये
राजकारण घोळलं जातं

मात्र राजकारणात
समाजहित ना लपावं
राजकारण खेळताना
समाजालाही जपावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नैसर्गिक बदल

नैसर्गिक बदल

खळखळ वाहणारेही
बदा-बदा पडू लागले
आगळे वेगळे दर्शन
निसर्गाचे घडू लागले

जिथे सुंदरता दिसायची
तिथेही रौद्र रूप आहे
नैसर्गिक त्या बदलांचा
हा जाहिर प्रुफ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

तडका - चुकांचे सत्य

चुकांचे सत्य

कधी अवचकलीने घडतात
कधी मुद्दाम होऊ शकतात
चुका या घडतच असतात
मात्र टाळता येऊ शकतात

म्हणूनच चुका टाळणे हा
कर्तव्यातला मथळा आहे
परंतु चुका न् समजायला
माणूस हा ना पुतळा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - यारी

यारी

कुठे ओळख आहे
कुठे ओळख नाही
तरी देखील मैत्रीत
कधीच काळोख नाही

दूर-दूर असुन देखील
ना कधीच दुरी आहे
मना-मनाला जोडणारी
हि यारीच भारी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३