हा ब्लॉग शोधा

गोष्ट लाख मोलाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोष्ट लाख मोलाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

तडका - गोष्ट लाख मोलाची

गोष्ट लाख मोलाची

देशाने कसे वागायचे
राज्यघटना शिकवते
राष्ट्राचे राष्ट्र ऐक्यही
मना-मनात टिकवते

देशाची प्रतिकृती ही
धार्मिकतेने ना बाटावी
वादंग भडकावणारांना
थोडीशी लाज वाटावी

आपला धर्म आपली जात
यापेक्षा देश हा श्रेष्ठ आहे
राहू द्या भारताला भारतच
हि लाख मोलाची गोष्ट आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३