हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

तडका - प्रिय वाचकहो,...

प्रिय वाचकहो,...

मी लेखणीने माझ्या
समाजाला टिपतो आहे
समाजाचं हित सदैव
विचारांतुन जपतो आहे

तुमच्या स्फूर्तीसुमनांनी
लेखणीला त्राण भेटतो
आपण भेटलात याचा
मनी अभिमान दाटतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रेमळ सल्ला

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

तडका - हल्लेखोरांनो

हल्लेखोरांनो

समोर यायची हिंमत
तुमच्या श्वासांत नाही
रणांगणातील शौर्य
तुमच्या नसांत नाही

म्हणूनच तर तुमच्याकडून
ते होताहेत हल्ले भ्याड
मात्र आम्ही हल्ले केल्यास
पाहणार नाहीत भीड-भाड

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

तडका - चित्रकारांनो

चित्रकारांनो

आपण काय काढतोहेत
याचं भान ठेवायला हवं
काढलेलं चित्र समाजात
आदरानेच यायला हवं

दर्जेदार चित्राला समाज
दर्जेदार स्थान देऊ शकतो
नाही तर दर्जाहिन लोकांना
पायाखालीही घेऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कलाकारांनो

कलाकारांनो

चित्र व्यंग असले तरी
हेतु वाकडे असु नयेत
कलाकारांचे विचारही
कधी तोकडे दिसु नयेत

त्यांच्या कलेमधून सदा
संदेश नेक दिसावेत
समाजातील कलाकार
आगलावे नसावेत,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

तडका - समाजात

समाजात

ज्याच्या त्याच्या पध्दतीने
जो तो समाज पाहतो आहे
कुणी सत्कार्यामुळे तर कुणी
कुकर्माने चर्चेत राहतो आहे

मात्र समाजात राहताना
नियतीला ना डागले पाहिजे
माणसं आहोत माणसाप्रमाणे
सामाजामध्ये वागले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आमचा स्वभावी बाणा

आमचा स्वभावी बाणा

ऊगीच झोडायचं म्हणून
कुणालाही झोडत नाही
मात्र जो चुकेल त्याला
आम्ही कधी सोडत नाही

सदा निपक्ष,निर्भिडपणाने
लेखणीचा ताठ कणा आहे
सामाजिक जाण ठेवणारा
आमचा स्वभावी बाणा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

तडका - एक सल्ला मोलाचा

एक सल्ला मोलाचा

असे थोडेच लोक आहेत
चे समाजाला हाताळतात
कुणाला घेतात डोक्यावर
मात्र कुणाला लाथाळतात

जस जसा समाज ढवळेल
तस तसं तेही चेकाळतात
त्यांच्या कपटी मनसुब्याने
नव-नवे वादंग बोकाळतात

मात्र आता समाजाने
जागरूकता बाळगायला हवी
कपटी लोकांची जागाच
जमाजातुन वगळायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - खोगीर भरती

खोगीर भरती

लोकांच्या सहकार्याने
इथे लोक मोठे होतात
एकदा मोठे झाले की
इमानाला खोटे होतात

जनतेशी इमान ठेवण्याचा
विचार त्यांचा फेको आहे
लोकशाही राज्यात अशी
खोगीर भरती नको आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

तडका - मोर्चे

मोर्चे

मोर्चामधून वेग-वेगळे
प्रश्न मांडायला जमते
आपल्या मागण्याकडे
लक्षही वेधायला जमते

मोर्चात कुणी फूलतात
तर कुणी सुकत असतात
मात्र हे मोर्चे म्हणजेच
लोकशाहीची ताकत असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मिडीया

मिडीया

घडल्या घटनांचा आढावा
मिडीयातुन घेतला जातो
मिडीयातील घटनांवरती
सहज विश्वास रेटला जातो

मिडीया हा सार्या घटनांचा
निर्भिड निपक्ष दुत असावा
मात्र सामाजिक असंतोषास
मिडीया कारणीभुत नसावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

तडका - सल्ला सेल्फी साठी

सल्ला सेल्फी साठी

डेंजर डेंजर झोन मध्ये
छान छान सेल्फी घेतात
मात्र छान छान सेल्फीही
कधी जीवावर बेततात

हे सेल्फी घेत असताना
कधी जिंदगी ना खपावी
सेल्फी काढताना किमान
स्वत: ची सुरक्षा जपावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - काळजी पुलांची

काळजी पुलांची

जेव्हा जेव्हा पाऊस
सलग संततधार असतो
तेव्हा तेव्हा प्रवासात
पुलाचा आधार असतो

हि बाबही पटकन
लक्षात घ्यायला हवी
अन् पुलांची काळजी
वेळीच घ्यायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

तडका - खबरदारी

खबरदारी

मेघगर्जनांसह विजांची
चमचम काया ऊजळली
पाण्याने तृप्त होऊन ही
धरणी सुध्दा खळखळली

पावसाने घेतली आहे
पुन्हा एकदा जबाबदारी
पण आपणही सुरक्षेची
घ्यायला हवी खबरदारी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राजकीय कलाकार

राजकीय कलाकार

सामाजिक सुव्यवस्थेचा
कलाकार महाघटक आहे
कलाकारांच्या कलेमुळेच
सुस्थितीचे द्योतक आहे

मात्र कलेमध्ये देखील
राजकारण येऊ लागले
सामाजिक कलाकारही
राजकीय होऊ लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

तडका - पाऊस

पाऊस

ऊन वार्यातही ती
तटस्थपणे राहिली
त्याच्या येण्याची वाट
व्याकुळतेने पाहिली

अहो पाऊस प्रतिक्षेतली
ती म्हणजेच धरणी आहे
तीच्या व्याकुळतेला पाहून
पाऊस तीच्या चरणी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

तडका - सामाजिक चेतावनी

सामाजिक चेतावनी

जबाबदारी पासुन
यु टर्न ने वळतात
मात्र श्रेय घेण्यासाठी
ऊतावीळपणे पळतात

पण आता हि वृत्ती
समाजाने जाणावी
कारण हि तर आहे
सामाजिक चेतावनी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रीत

रीत

अशी ही राजकीय
रीत आहे ठरलेली
समाजाने सदैवच
मनामध्ये धरलेली

ज्याचे विचार नेक
त्याला घेतात डोक्यावर
ज्याचे विचार फेक
त्याला पायाच्या टोकावर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

तडका - कुपोषण

कुपोषण

इवल्या इवल्या बाळांचा
सरळ सरळ घात आहे
किशोरवयात वाढणारी
कुपोषणाची वात आहे

देशातील प्रत्येक बाळ
सशक्तपने नटलं जावं
झटक्यास देशाबाहेर
कुपोषण हटलं जावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बेहिशोबी मालमत्ता

बेहिशोबी मालमत्ता

राजकीय नेत्यांवर
धाडी पडू लागल्या
बेहिशोबी मालमत्ता
जप्तीत बुडु लागल्या

कित्तेकांच्या डोक्यावर
चौकशीचे डोलक आहेत
या बेहिशोबी मालमत्तेचे
बेहिशोबी मालक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

तडका - तर्क

तर्क

प्रत्येकाच्या बोलण्याला
एक वेगळाच अर्थ असतो
कुणाच्या मनात सही तर
कुणाच्या मनात व्यर्थ असतो

कधी तर्क सरळ सरळ तर
कधी विपर्यास होत असतात
मनात जसे विचार असतील
तसेच तर्कही येत असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मनोकामना

मनो-कामना

अहो सालाबादा पेक्षा
हि बाजु ना वेगळी आहे
पुढच्या वर्षीची ऊत्सुकता
मना-मनाला लागली आहे

गणपतीच्या आगमनाची
आतुरता ही जपली जाईल
पुढच्या वर्षीच्या ऊत्सवाने
मनो-कामना व्यापली जाईल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

तडका - सामाजिक ऐक्याची क्रांती

सामाजिक ऐक्याची क्रांती

मनामध्ये तेढ ठेऊन
ना किंचाळली जावी
माणसांची मानसिकता
हि माणसाळली जावी

सामाजिक ऐक्याची क्रांती
हि प्रत्येक वेळी नवी असते
फक्त नारे देऊन ही होत नाही
तशी मानसिकता हवी असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पाऊस आला रे,...

पाऊस आला रे,...

वेग-वेगळ्या विचारांनुसार
पावसाचे तर्क-वितर्क असतात
दोन्ही बाजु लाऊन धरण्या
लोक भलते गर्क असतात

कुणाला वाटतो हवा हवा
कुणाला वाटतो नको आता
फायदा आणि तोट्यांसह
इथे पाऊसही येतो आता

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

तडका - वरचढ

वरचढ

कुठेही पाहिलं तरी
सेम सेम चित्र आहे
कित्तेक संघातील
वास्तव विचित्र आहे

आपल्यांचेच गुण-दोष
मनाला टोचु लागतात
आपल्यांचे पायही इथे
आपलेच खेचु लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राजकीय समीकरणं

राजकीय समीकरणं

सत्तेची मनाला जणू
ही वाढती भुक आहे
डोळ्यासमोर हेरलेली
गोवा निवडणूक आहे

राजनैतिक डाव आखुन
युतीचे सुत्र ठरले जातील
प्रांत बदलताच समीकरणं
पुन्हा नव्याने फिरले जातील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

तडका - महा पंगत

महा पंगत

महापंगत घालणे म्हणजे
ही बाब सदैव श्रेष्ठ असते
मात्र महापंगतीत विषबाधा
हि लाजीरवाणी गोष्ट असते

म्हणूनच पंगत घालताना
अतिदक्षता घ्यायला हवी
श्रेष्ठ असलेली महापंगत
जीवघेणी ना व्हायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बाबाची पँट

बाबाची पँन्ट

इनकमवाल्या ऊद्योगांचा
बाबाकडून हा ठाव आहे
कापड बाजारात हल्ली
ऊडी घेण्याचा डाव आहे

नेहमीचेच फॅक्ट देखील
जाहिरातीत असतील काय,.?
कधी पँन्ट न वापरणारे
पँन्टमध्ये दिसतील काय,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

तडका - अॅक्शन मनाची

अॅक्शन मनाची

विनोदाने बोलता बोलता
खोचक टोला लगावतात
मनातले गचपणही सारे
बोलण्यातुन जागवतात

जरी स्तुती अन् टोल्याने
गेलेली वेळ हि येत नसते
तरी अॅक्शन घेण्यापासुन
मन हे गप्प रहात नसते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रोष

रोष

मिडीयातील बातमीचा
मोठा फटका बसला
सत्तेतुन थेट सत्तेबाहेर
असा झटका बसला

म्हणूनच तर मनामध्ये
नाराजीला जोश आहे
घडल्या सार्या प्रकाराचा
सरकार वरती रोष आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

तडका - ऊत्सवांच्या निमित्ताने

ऊत्सवांच्या निमित्ताने

ऊत्सव येतात,जातात
आपण जरा स्मरावेत
ऊत्सव नवखे घडवण्या
मनी संकल्प करावेत

ऊत्सवांच्या निमित्ताने
मन विकृती सोडावी
प्रत्येक या ऊत्सवांतुन
जन जागृती घडवावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्तेचा वापर

सत्तेचा वापर

एकदा हाती येताच
मुरगळायला सोपी असते
सत्तेचा वापर करून
याची त्याला टोपी असते

जो सत्तेच्या जवळ असतो
त्याचा माथा झाकला जातो
मात्र सत्तेदूर असणाराचा
कधी माथा ठोकला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

तडका - खंत

खंत

कपीलने खंत मांडताच
सत्वर दखल घेतली जाते
मात्र सामान्यांची खंत
इथे वारंवार रापली जाते

कपीलची सत्वर दखल घेतात
याची मनाला खंत नाही
मात्र वाईट याचं वाटतं
सामान्यांच्या प्रश्नांचा अंत नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जीणे दीन

जीणे दीन

मनो-मनी लागल्यात
अच्छे दिनच्या आशा
हरवल्या नक्की कुठे
अच्छे दिनच्या दिशा

ज्यांना मिळाली सत्ता
त्यांना आले अच्छे दिन
मात्र सामान्य जनतेचे
अजुन आहे जीणे दीन

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

तडका - साक्षरता अभियानातुन

साक्षरता अभियानातुन

सामाजिक गरज आहे
लोक शिकले पाहिजेत
या जीवनाच्या वादळात
हिंमतीने टिकले पाहिजेत

साक्षर होण्यासाठी इथे
लोकही सावध व्हावेत
कागदावरती साक्षर नको
साक्षरांचे कागद व्हावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हल्ले पोलिसांवरचे

हल्ले पोलिसांवरचे

एकामागुन एक असे
पोलिसांवर हल्ले आहेत
सामाजिक असुरक्षिततेचे
हे जाहिर कल्ले आहेत

पोलिसांवरील हल्ले
रोखायला हवे
कायद्याने हल्लेखोर
ठोकायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

तडका - रस्ते

रस्ते

ज्वलंत मुद्यांमधील
हे प्रश्न सच्चे आहेत
गावो-गावी अजुनही
रस्ते हे कच्चे आहेत

विकासाच्या आराखड्यात
खेडे दुर्लक्षित नसावेत
खेडे स्मार्ट करण्यासाठी
रस्ते सुरक्षित असावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

तडका - कायद्याची जाण

कायद्याची जाण

कित्तेकांच्या जीवावर
पंगती बेतल्या आहेत
या वाढत्या दुर्घटना
लक्षात घेतल्या आहेत

म्हणूनच कायद्याची जाण
प्रत्येकाला ठेवावी लागेल
भंडारा व पंगतीसाठी
परवानगीच घ्यावी लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चर्चेचे विषय

चर्चेचे विषय

कधी चाय आहे तर
कधी आहे खाट
राजकीय चर्चांचा
हा नवा नवा थाट

कधी शब्दांची पडझड
कधी डाग-डूजी आहे
हे चर्चेचे विषय म्हणजे
राजकीय स्टंटबाजी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

तडका - गट

गट

प्रत्येकाचे वेग-वेगळे
समाजात गट आहेत
प्रत्येक प्रत्येक गटाचे
वेग-वेगळे तट आहेत

असे क्वचितच भेटतील
जिथे हे गट घडले नाही
गटा-तटाच्या विभागणीत
लोकांनी देवही सोडले नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ऊत्सवातुन

ऊत्सवातुन

आनंदाचे ऊत्सव सारे
पार पाडावेत आनंदाने
ऊत्सव ओळखले जावे
सलोख्याच्या संबंधाने

साजर्या झाल्या ऊत्सवाने
डोळ्यांची काया दिपावी
प्रत्येक प्रत्येक ऊत्सवातुन
सामाजिक एकता जपावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

समाजाची शान

समाजाची शान

इवल्या इवल्या लेकरांना,देऊनिया जाण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||धृ||

आदर्श त्यांचे कार्य
आदर्श आहे माया
समाजास दिधली
हि साक्षरतेची छाया

मना-मनात भरले आहे,जीवनाचे ज्ञान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,.||१||

या समाजाचा पाया
करूनिया भक्कम
या समाजास केले
शिक्षकांनी सक्षम

समाजाचे समाजाला,देऊनिया भान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||२||

ज्ञानार्जनाने त्यांच्या
घडून आली क्रांती
मशाल झाली आहे
विकासाची पणती

भरभराटीच्या वेगात,भरूनिया त्राण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||३||

इंजिनियर झालेत
झालेत कुणी डॉक्टर
त्यांचेच हो विद्यार्थी
झाले आहेत कलेक्टर

त्यांनीच निर्माण केली,हि वकिलांची खाण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||४||

जडण-घडण ही
त्यांनीच सारी केली
म्हणूनच शोभा
या समाजास आली

अशा शिक्षकांचा,मनी दाटतो अभिमान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||५||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता ऐकण्यासाठी व डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

तडका - शिक्षक

शिक्षक

वर्तमानासह भविष्याचे
शिक्षक हे गूरू आहेत
सामाजिक व्यवस्थेचे
शिक्षक महामेरू आहे

आदर्श समाज घडणीत
शिक्षकांचे योगदान आहे
अशा आदर्श शिक्षकांचा
आम्हाला अभिमान आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शब्दांचे वापर

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

तडका - वर्गणी जमा करताना

वर्गणी जमा करताना

वर्गणी मागत असताना
नैतिकतेचं रूप असावं
जमा झाल्या फंडाला
वर्गणीचंं स्वरूप असावं

धाक दाखवुन दाखवुन
वर्गणी जमा करू नये
जमा केलेली वर्गणी
हि खंडणी ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हल्ल्यांचे सत्य

हल्ल्यांचे सत्य

पोलिसांच्या सुरक्षिततेवर
आता प्रश्नचिन्ह आहेत
घडते अपप्रकार पाहून
आमचे मनं सुन्न आहेत

बारकाईने पाहिल्यास
सत्य स्पष्ट दिसु शकतात
या घडत्या घटनांमागे
षढयंत्रही असु शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

तडका - वार शल्याचे

वार शल्याचे

रागाचा आवंढा गिळून
वाणीत गोडवा भरावा लागतो
गळ्यात-गळे घेतले तरीही
मनात मात्र दुरावा भासतो

व्यक्त करता न येण्याजोगे
मनात भलते राडे असतात
हे शल्याचे वार म्हणजे
शालीमधले जोडे असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३