हा ब्लॉग शोधा

रविवार, १२ जून, २०१६

तडका - नीती निसर्गाची

नीती निसर्गाची

सळसळ वारा
गडगड ढग
आले नशिबी
सुखाचे भोग

तरी देखील मनी
अजुन भीती आहे
कुणास ठाऊक निसर्गाची
पुढे कशी नीती आहे,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ११ जून, २०१६

तडका - घातक भोंदू

घातक भोंदू

प्रवाहात येऊन
बसले जातात
समाजात सर्रास
दिसले जातात

समाजास भोंदू
ढसले जातात
तरी लोक सहज
फसले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १० जून, २०१६

तडका - पोस्टर वॉर

पोस्टर वॉर

त्यांचे टिकेचे पोस्टर येताच
यांचे प्रतिटिकेचे पोस्टर आहे
त्यांच्यातच चढाओढ आहे
की कोण कीती फास्टर आहे

मात्र हे पोस्टर वॉर
चारित्र्याला छेद आहेत
यांचे मत भेद नाहीत
यांचे मन भेद आहेत,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शिक्षकी जीवन

तडका - भुमी प्रगती पथाची

भुमी प्रगती पथाची

पोपटपंची बोलणारे
समाजात खुप आहेत
ज्याने-त्याने काढलेले
वेग-वेगळे ग्रुप आहेत

तरी देखील जनमनात
विकासाची खुमखुमी आहे
इथे भ्रष्टाचारात माखलेली
प्रगती पथाची भुमी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ९ जून, २०१६

तडका - आपसातील मतभेदात

आपसातील मतभेदात

धनुष्याच्या बाणालाही
आहेत जणू वाघी सुळे
भलते जहर ओकतात
कमळाची पोष्टर फुले

आपसातल्या भांडणात
नैतिकतेला भुल देऊ नये
अन् अंतर्गत मतभेदापोटी
आपली 'आप' जाऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ८ जून, २०१६

तडका - आजचा सवाल

हमरी-तुमरीच्या भाषा हल्ली
पक्षा-पक्षांतुन फिरू लागल्या
अन् ऐतिहासिक आरोप टिका
प्रसिध्दी माध्यम ठरू लागल्या

अहो हि वारंवारच धुसफूसणारी
टक्कर कमळ बाणाची आहे
पण निजामांच्या बापाच्या राज्यात
भागीदारी नक्की कुणाची आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - गलथान लोक

गलथान लोक

समाजाच्या हितासाठी
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी
असतात शाळा महाविद्यालये
ऊज्वल मार्ग आयुष्यासाठी

मात्र शिक्षण क्षेत्रात देखील
बोगसबाजी होऊ लागली
विद्यार्थीहीन महाविद्यालये
आता समोर येऊ लागली

मिळेल त्या प्रकारा नुसार
अनुदान लुबाडून खाऊ लागले
निर्लज्ज पणाच्या सीमापार
गलथान लोक जाऊ लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ७ जून, २०१६

तडका - राजकीय समीक्षण

राजकीय समीक्षण

राजकीय चढाओढ सदा
ओढातानीने चालत असते
कधी बाह्य तर कधी कधी
अंतर्दोषात कलत असते

मात्र हे अंतर्गत मतभेद
विरोधकांना पुरक असतात
राजकारणातील द्वेश हे
विकासाचे मारक असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नाथाचे अनाथ खाते

नाथाचे अनाथ खाते

खडसेंच्या प्रकरणातुन
नक्की काय पुज्य झाले,.?
मंत्रीमंडळ विस्ताराला
घाई-घाईने सज्ज झाले,.!

मंत्रीमंडळ विस्तारासाठी
अतृप्त चेहरे नटले जातील,.!
अन् नाथाचे अनाथ खाते
नटून वाटून घेतले जातील,.

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सख्या रे,...

सख्या रे,.....

                  कवी :- विशाल मस्के,सौताडा
                   मो. :- 9730573783

ज्वानीच्या जोशात,
नजरेच्या फास्यात
माझी नजर अशी
ही फसली रे

भिरभिर फिरुन पापण्यात लपुन
अशी लाजुन खुदकन हसली रे

माझ्या नजरेला ओढ
तुझ्या नजरेची लागली
तुझी प्रीत हि साजना
माझ्या मनात जागली

मी ना माझीच राहिले सजना रे
कशी सावरू मनाला सांग ना रे

तुझ्या नजरेचे झोल
जणू अबोल हे बोल
रूतले हे आरपार
काळजात खोल खोल

तुझी गोडी या मनाला लागली रे
भासे मलाच आज मी वेगळी रे

तुझा होतोय हा भास
तुझी पाहते रे वाट
तुझी आठवण खास
मनी येते दाट दाट

तुला भेटण्या आज मी त्रासली रे
तु येताच गालामधी हसली रे

तुझा होताच स्पर्श
मनी झालाया हर्ष
तुझ्या प्रेमाचा मनी
हा महा परामर्श

माझी जिंदगी ही तुझीच जाहली रे
तुझ्या प्रेमात बहरून फुलली रे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी  www.vishalmske.blogspot.in

-----------------------------

सोमवार, ६ जून, २०१६

तडका - किमया एका पावसाची

किमया एका पावसाची

गर्माळलेलं वातावरणही
थंड थंड होऊन गेलं
दाहकतेचं चढतं रूप
जणू काही भिऊन गेलं

पावसाचे आगमन होताच
मना-मनात ऊल्हास आला
चार महिण्यांचा ऊन्हाळा
एका पावसाने खल्लास केला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - समर्थन

समर्थन

आपले नेते जपण्या
कार्यकर्ते गंभीर हवे
गरज भासेल तिथे
सदैवच खंबीर हवे

अन् त्यांचे वागणे हे
सदा प्रशंसक असावे
मात्र भावनेच्या भरात
समर्थन हिंसक नसावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ४ जून, २०१६

तडका - आपले पर्यावरण

आपले पर्यावरण

झाडे लावा आणि झाडे जगवा
सांगणारे,ऐकणारे खुप आहेत
पण झाडांची कत्तल करणारेही
माणसांचेच ग्रुपच्या ग्रुप आहेत

पर्यावरणाच्या बाबती मध्ये
हो, मानवी प्रवृत्ती हिन आहे
आज पर्यावरण दिनी सांगतो
आपले पर्यावरण दीन आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नाराजीनामा

नाराजीनामा

पदाच्या गैरवापरामध्ये
अचानकपणे गटला गेला
आज सत्तेच्या शक्तीमधून
एक 'नाथ' निसटला गेला

बलाढ्य अनुभवाचाही
आरोपांपुढे मामा आहे
हा राजीनामा म्हणजे
निखळ नाराजीनामा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - ढसलेले काटे

ढसलेले काटे

कित्तेकांच्या निशाण्यावर
सहजपणे टार्गेट झाले
आरोपांच्या झपाट्यात
सत्तेतुनही फॉर्गेट झाले

कुणी म्हणाले फसले आहेत
कुणी म्हणाले फसवले आहेत
बाहेरच्यांसह घरच्यांनी देखील
खडसेंना काटे ढसवले आहेत.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ३ जून, २०१६

तडका - आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस

कुहू कुहू मंजुळ वाणी
कोकीळा हि गाती हो
पहिल्या पावसात भिजुन
माती सुगंध देती हो

हवा थंड झूळूक झाली
त्या हवेत मन हे हरवलं
आता दुष्काळ संपला जाईल
चितनात मन भारावलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - विरोधी डोळे

विरोधी डोळे

यांनी म्हणायचं आहे आहे
त्यांनी म्हणायचं नाही नाही
आहे की नाही पाहता पाहता
ऊत्सुकतेची होते लाही लाही

जेव्हा जेव्हा आरोप टिकांचे
येऊ लागतात बारूदी गोळे
तेव्हा तेव्हा ऊताविळ होऊन
तराटले जातात विरोधी डोळे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २ जून, २०१६

तडका - चौकशीत

चौकशीत

भुंग्या मागुन भुंगा
सहज सोडला जातो
कधी चौकशीत माणूस
मुद्दाम ओढला जातो

मात्र चौकशी करताना
काटकसर ना आली पाहिजे
ज्याने गुन्हा केला आहे
त्याला शिक्षा झाली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - माणसांच्या दुनियेत

माणसांच्या दुनियेत

माणसांवरचा विश्वासही
माणसांनी तोडला आहे
कुविचारी जोखंडातच
हो,माणूस पीडला आहे

माणसांचे पाहून वागणे
काळजामध्ये आग झाली
माणसांच्या या दुनियेत
माणूसकीही महाग झाली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १ जून, २०१६

तडका - जाहिर सत्य

जाहिर सत्य

लोकपाल आणि काळा पैसा
आंदोलनात खुप-खुप गाजले
यातुन किरण बेदी राज्यपाल
रामदेव बाबा महा ऊद्योगपती
केजरीवाल मुख्यमंत्रीपदी सजले

पण एवढे सारे घडून देखील
लोकपाल आणि काळा पैसा
जणू देशामध्ये दबाडले गेलेय
लोकांना भावनिक करून करून
भावनेच्या भरात लुबाडले गेलेय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दमानी या

दमानी या

रस्त्यांवरचा महा निष्कर्ष
आता फ्रंट टू फ्रंट आलाय
रस्त्यांवरचे खड्डे म्हणजे
पब्लिसिटी स्टंट झालाय

रस्त्या-रस्त्यावरती आहेत
अपघातांच्या त्सुनामी या
धोका कधीही होऊ शकतो
म्हणूनच ऐका 'दमानी या'

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

~!!! ऊमेद !!!~

----------~!!! ऊमेद !!!~----------

               कवी :- विशाल मस्के
               मो. 9730573783

आटता आटंना यास,खीळ का बसंना
भरभरूनी वाहतोय,वेदनेचा हा पाझर
काळीजं जाळलं यानं,जगणं छळलं
ऊभ्या आयुष्यास यानं,केलंया बेजार

आयुष्याच्या पटलावर,खेळ हा रांगडा
कशी रीत नियतीची,ही जालीमं जालीमं
ना जगण्यातं रस देते,ना मरण्यातं रस
कसं फासु या नियतीला,काळीमं काळीमं

कसा टाकु कळंना या,नियतीला डाव
कसा देऊ सांगा कुणी, जगण्याला वाव
कधी देते छाव ती,अन् टाकते हो डाव
वेळो वेळी माझ्याच का,नशिबी हा घाव

माझं नशिबं बुडलं,यातनांनी हो पीडलं
उमेदीचं माझ्या का हो,अंकुरं खुडलं
मनी जगण्याची आस,पण मरणाचा भास
जीत्यापनी का हो,माझं मरणं धाडलं

आता केलाया निर्धार,मी मरत जगनं
नियतीच्या डावापुढे,ऊगी ना हरनं
माझ्या नशिबाला मीच,हाताने कोरील
मेलो तरी जगातं या,मरूनं ऊरनं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

------------------

* सदरील कविता नावासह शेअर करू शकता

* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* चालु घडामोडीवर आधारित डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या