हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

तडका - शुभेच्छा नव-वर्षाच्या

शुभेच्छा नव-वर्षाच्या

करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा

मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्‍या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना

झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जुने साल

जुने साल

नव्याचे स्वागत करताना
जुण्याचे मानावे आभार
उगवत्याच्या उगवण्याला
बुडत्याचा मिळतो आधार

नव्या नव्या उमेदीने
नवे साल हे नटले आहे
जुने सालही नव्या-नव्यानं
इतिहासात थाटले आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

तडका - ३१ डिसेंबर

३१ डिसेंबर

तारीख आणि महिना
तोच तोच आहे जरी
साल मात्र बदललं
नव्या सालाचं मनामध्ये
नवं कुतुहल ओघळलं

एक साल बाद पुन्हा
आला आहे ३१ डिसेंबर
झालं असेल भयभीत
भिंतीवरचंही कॅलैंडर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

उपेक्षितांचा थर्टी फर्स्ट

उपेक्षितांचा थर्टी फर्स्ट

                 कवी :- विशाल मस्के
                 मो.नं. :- 9730573783

त्या बदलत्या क्षणांचे,साक्षीदार होऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| धृ ||
त्या रंगीन दूनियेत
चल प्रकाशात लख्ख
मिळेल तो आनंद
वाटेल थोडं दू:ख
आपल्या जगण्यावरती दू:खी नको होऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| १ ||
तुझ्या-माझ्या जगण्याला
दारिद्रयानं घेरलंय
आपलं बालपणही सारं
मायेविना सरलंय
त्यांच्या आनंदाची मजा डोळेभरून घेऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| २ ||
ते आतिशबाजी रंग
झाले आकाशात दंग
जागतीया आज
रात चांदण्यांच्या संग
फूटत्या फटाक्यांना साद टाळ्यांची देऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| ३ ||
ऐकू जरा क्षणभर
पार्ट्यांमधले नाचगाणे
दूरून-दूरून पाहू
मध्यरात्रीचे खाणे-पिणे
उन्मादाने टाकलेला,शोधू मिळतो का खाऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| ४ ||
थर्टी फर्स्ट पाहून
आशा मनात दाटल्या
मध्यरात्रीत झाल्या
किती रिकाम्या बाटल्या
रित्या बाटल्या विकण्या,नव सालामध्ये जाऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| ५ ||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

तडका - रंग-रंगेली नखरेल

रंग-रंगेली नखरेल

हल्ली तीची-माझी
वाढली आहे सलगी
माझ्या मधली ती
भरून काढते खळगी

गळ्यामध्ये पडून राहते
ती रंग-रंगेली नखरेल
दूसरी-तिसरी नाही कोणी
ती आहे माझी मफरेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कर-डर

कर-डर

करकच्चुन चालू आहे
महागाईचा विकास
लोकांचे चालले हाल
करवाढ मात्र झकास

इतके कर वाढवताहेत
ही नक्की कशाची भर आहे
कुठे-कुठे हे लावतील कर
जनमनाला डर आहे,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

तडका - घसरती जीभ

तडका - जाहिरात निधी

जाहिरात निधी

नवा फॅक्टर राबवुनही
दारिद्रय ना वधारले,.!
देशावरती झालं कर्ज
जाहिरातीवाले सुधारले.?

जाहिरातीच करता-करता
विकास मागे राहू नये
विकास निधी पेक्षा जास्त
जाहिरात निधी जाऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

तडका - ग्राहकांची खेचा-खेची

ग्राहकांची खेचा-खेची

जेवढी पब्लिसिटी जास्त
तेवढा बिझनेस जास्त
पब्लिसिटीला कमी तर
जणू बिझनेसचाच अस्त

म्हणूनच तर शोधतात की
कशात असेल रूची
ऑफर्सने करतात सदा
ग्राहकांची खेचा-खेची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धाड

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

तडका - समाजात वावरत असताना

समाजात वावरत असताना

जातात होऊनी बेभान कधी
जबाबदार्‍या पार पाडताना
सत्य देखील झूगारतात हो
लोक समाजात वावरताना

सांगितल्या सत्य गोष्टींचा
सदा मनावर असर घडावा
समाजात वावरत असताना
कर्तव्याचा न विसर पाडावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धाडस

धाडस

कमवता येते
गमवता येते
दानात प्रॉपर्टी
सामवता येते

मात्र कमवण्या
कस लागते
अन् दान देण्या
धाडस लागते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

तडका - मोसम गारे-गार

मोसम गारे-गार

चढता पारा उतरला
चुरका लागला मनाला
घरात बसले कुणी-कुणी
जाऊन बसे ऊन्हाला

अंथरूणाशी वाटे सलगी
कधी शेकोटीचा आधार
अनुभव देतो नवा-नवा
हा मोसम गारे-गार

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - योजनांची लूट

योजनांची लूट

सहजा-सहजी न चढणारा
हा गुंता-गुंतीचा चढ आहे
योजना आधी की भ्रष्टाचार
सांगणं आता अवघड आहे

होईल नवा विकास म्हणून
आकांक्षा एकवटली जाते
मात्र योजना येण्याआधीच
भ्रष्टांकडून लूटली जाते,..!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

तडका - पाठराखणी करताना

पाठराखणी करताना

रखरखत्या निखार्‍यावर
शब्द झाकणी दिली जाते
कधी याची,कधी त्याची
पाठराखणी केली जाते

कित्तेक-कित्तेक प्रकरणांचे
पाठराखणीतुन ऊद्दार असतात
त्यांची पाठराखण करूच नये
जे मुळत:च गद्दार असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डॉक्टर खेड्यांना

डॉक्टर खेड्यांना

सांगा मिळेल का चालना
गावच्या आराखड्यांना
सात वर्षे सेवा करण्या
डॉक्टर येतील खेड्यांना

घेऊन प्रश्न अजेंड्यावर
दारिद्रयही हटवा म्हणावं
डॉक्टरां सारखं थोडासा
विकासही पाठवा म्हणावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

तडका - आमचं प्रेम

आमचं प्रेम

तीच्या नुसत्या स्पर्शाने
अंग सारं शहारलं
माझ्यावरचं तीचं प्रेम
क्षणात तीने साकारलं

मला प्रसन्न ठेवण्यासाठी
तीच माझी दवा आहे
माझ्यावर प्रेम करणारी
ती थंडी-थंडी हवा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रयत्नांत

प्रयत्नांत

एखादी गोष्ट जमत नाही
म्हणून सोडून देऊ नये
आवश्यक त्या प्रयत्नांपासुन
कदापीही दूर जाऊ नये

केल्या प्रयत्नांना नक्कीच
नवा अनुभव येऊ शकतो
सुरूवात अशक्त असली तरी
शेवट सशक्त होऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

तडका - सत्याची सद्यस्थिती

सत्याची सद्यस्थिती

सत्यासाठी झटतात
सत्यासाठी खपतात
त्यांचे सत्य हिरमुसते
ज्यांचे आवाज दबतात

सत्य सिध्द करण्यासाठी
नको तितका त्रास होतो
पटवुन दिल्यास सत्याचा
खोटेपणातही भास होतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - इथली सिस्टीम

इथली सिस्टीम

जे मागून आलेय ते ते
पुढे-पुढे आहे रेटलेले
समाजातील जनावरंही
सारे मोकाट सुटलेले

चुक लक्षात आल्यावरती
सारे मिळून काम करतात
बैल निघून गेल्यावर मग
झोप्यालाही जाम करतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

तडका - तयारी थर्टी फर्स्टची

तयारी थर्टी फर्स्टची

थर्टी फर्स्टची तयारी म्हणजे
बार टाइम वाढवणे आहे,.?
भुतकाळातील जुन्या चुका
नव्या-नव्याने घडवणे आहे,.!

थर्टी-फर्स्ट जवळ येताच
तरूणाईही तरतरली जाते
मात्र दारू आणि मस्ती साठी
रात्रच अपुरी ठरली जाते,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कायद्यात

कायद्यात

आता सर्रास बोलणे
जनतेलाही पटू शकतात
कायद्याच्या आधाराने
गुन्हेगारही सुटू शकतात,.?

मात्र गुन्हेगार सुटल्याची
सल मनी टोचत राहते
कायद्यावरील विश्वासाची
दृढताही खचत जाते,...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २० डिसेंबर, २०१५

तडका - राजकीय सूडचक्र

राजकीय सूडचक्र

मनी सुडाचे निखारे ठेऊन
डोळ्यात धुळ पेरली जाते
अन् हाती आलेली सत्ता
करकच्चुन वापरली जाते

सरळ-सरळ जाता-जाता
मुद्दाम चाल वक्र असते
सत्तेसरशी बदलणारे
राजकीय सुडचक्र असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धोका शैक्षणिक क्षेत्रातील

धोका शैक्षणिक क्षेत्रातील

भविष्य घडायला हवे तिथे
जीवनाचा विध्वंस होतो आहे
गुरू-शिष्याच्या पवित्र नात्यास
काळीमा फासला जातो आहे

लैगिक अत्याचाराचे प्रकार
शाळेमध्येच घडू लागलेत
विश्वासु वाटणार्‍या नात्यांतही
हल्ली नराधम दडू लागलेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

तडका - संधी

संधी

संधी जवळ असतात
तेव्हा लोक पुढे पळतात
मात्र संधी दुर जाता
आकांताने तळमळतात

आलेली संधी कदापीही
हातुन ना जायला पाहिजे
ज्या-त्या वेळी योग्य संधी
योग्य रीतीने घ्यायला पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पावरचे सत्य

पावरचे सत्य

हाती पावर असेल तर
हवी तशी वापरतात
कुणाला धारेवर धरत
हवे तसे डाफरतात

येऊ शकते,जाऊ शकते
पावरचा असतो योगायोग
म्हणूनच तर पावरचाही
कधीच नसावा दुरूपयोग

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

तडका - आंदोलनीय शक्ती

आंदोलनीय शक्ती

प्रकर्षाने भांडण्यासाठी
आपले प्रश्न मांडण्यासाठी
आंदोलनांचा वापर होतो
कित्तेक गोष्टी खांडण्यासाठी

कित्तेक प्रश्न सोडवण्यासाठी
आंदोलनं उपयोगी येऊ शकतात
तर आवाक्या बाहेरचे आंदोलनं
कधी उधडलेही जाऊ शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वादांचे सिनेमे

वादांचे सिनेमे

कमी खर्चात मोठा धमाका
पब्लिसिटी स्टंटची जादू आहे
सिनेमांवरती वाद घडणे ही
हल्ली फायद्याची बाजु आहे

आता घडणारे वाद देखील
कधी पाहिले जातील प्रेमाने
येतील सिनेमांच्या वादावरती
भविष्यात पुन्हा नवे सिनेमे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

तडका- कौटूंबिक सल्ला

कौटूंबिक सल्ला

कायद्याचा घेऊन आधार
पत्नी करतात बेजार
समाजात वाढतोय म्हणे
पती अत्याचाराचा आजार

ना पतीकडून,ना पत्नीकडून
अत्याचारी खुळ दाटले पाहिजे
पती-पत्नी दोघांनाही
कुटूंब सुखी वाटले पाहिजे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दैवताचा खोळंबा

दैवताचा खोळंबा

बसही राजी झाली नाही
डेपो बाहेर जाण्यासाठी
चालक-वाहकही रूसले
वाढीव पगार घेण्यासाठी

बस बंदच्या आंदोलनाला
राज्यभरात वळींबा दिला
प्रवाशी दैवत मानणारांनी
दैवताचाही खोळंबा केला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

तडका - योजनांतली बेगडेबाजी

योजनांतली बेगडेबाजी

योजनांचा लाभ घेता-घेता
कित्तेक मनं करपु लागतात
लाभार्थ्यांकडे येण्याआधीच
योजना मात्र झिरपु लागतात

कित्तेक सरकारी योजना या
कागदोपत्री तगड्या असतात
मात्र वास्तवी फिरून पाहिल्यास
कित्तेक योजना बेगड्या असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वाईन फेवर

वाईन फेवर

दारूबंदीचे नारे देखील
सर्रास इथे स्थावर आहेत
मात्र वाईन निर्मिती मध्ये
हल्ली नव-नवे फेवर आहेत

नव-नवे फेवर पिऊन-पिऊन
लोकही नको तसे झिंगतील
मात्र ही शरमेची बाब देखील
कुणी अभिमानाने सांगतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

तडका - साठी प्रतिष्ठेची

साठी प्रतिष्ठेची

जेष्ठ नागरिक होण्यासाठी
आता गरज नाही पासष्ठीची
साठीमध्येच मिळु लागेल
वृध्दांना सवलत प्रतिष्ठेची

वेग-वेगळ्या सवलतींनी
साठीतंच सजु लागतील
साठीमध्ये जाण्यासाठी
लोक दिवस मोजु लागतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - डिजीटल युगात

डिजीटल युगात

त्रासते आहे आज देखील
खेड्यांत दारिद्र्याची दाटी
मात्र सरकारच्या कृपेमुळे
शहरांची होईल स्मार्ट सिटी

शहरांची स्मार्ट सिटी करताना
खेड्यांना लक्षात घेतील का,.?
बदलत्या डिजीटल युगामध्ये
खेड्यांना स्थान देतील का,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

तडका - स्मार्ट खुटी

स्मार्ट खुटी

कुणाला कसं भुलवायचं ते
त्यांना पक्क ठाऊक असतं
त्यांच्या रंगेल बोलण्यालाही
जनतेचं मन भावुक असतं

जणू दिशाभुल करण्यासाठी
विचार त्यांचा सुपर असतो
विकासकामंही अडवण्याला
स्मार्ट खुटीचा वापर असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विरोध करताना

विरोध करताना

करायचा म्हणून उगीचंच
विरोध करता कामा नये
विरोधातही तथ्य असावे
निखळ फूसका ड्रामा नये

आपणच लावलेली आगही
आपल्यालाच पोळू शकते
स्वत:च्या कधी दुसर्‍याच्या
अनुभवा वरून कळू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हत्या सत्र

हत्या सत्र

इथे-तिथे कुठेतरी
रोजच होताहेत खुन
जीत्या जगत्यांसह
सुरक्षित नाही भ्रृण

कित्तेकांच्या प्राणाच्या इथे
रोज विझत्या बत्या आहेत
मात्र त्या माणसांसह या
माणूसकीच्या हत्या आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

तडका - आंदोलनात

आंदोलनात

पाठपुरावे केले तरी देखील
हाती मात्र दुरावे भेटतात
मागण्या मांडून जमत नाही
आंदोलनच करावे लागतात

रोज-रोज वेगळ्या समस्या
वेग-वेगळे आंदोलनं आहेत
प्रत्येक घडत्या आंदोलनाने
सरकारचे घटते गुणं आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अटळ ठेवण

अटळ ठेवण

वाट्याला आलेले क्षण
कसोशीने जगावे लागतात
सुख आणि दु:ख देखील
प्रत्येकाला भोगावे लागतात

कधी सुखाने खुलते हे मन
कधी दु:खाने फाटते जीवन
मात्र प्रत्येकाच्या जीवनात
हिच आहे अटळ ठेवण,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

तडका - पुतळा दहन

पुतळा दहन

समाजा मध्ये वावरताना
कित्तेक गोष्टी खटकतात
मोर्चे आणि आंदोलनांसह
निदर्शनी डोंब लटकतात

कधी कुणाचा निषेध होईल
हि गोष्टही गहन असते
दबला राग व्यक्त करण्या
उपयुक्त पुतळा दहन असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मनं

मनं

वेळ-प्रसंग पाहुन-पाहून
विशेष बदल होऊ शकतात
आग ओकणार्‍या तोफाही
गुणगाण गाऊ शकतात

हे बदलते रंगही आता
जनतेमध्ये कळायला हवे
मतभेद असोत कितीही
मनं मात्र मिळायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

तडका - संघर्षात

संघर्षात

हार-जीत चालायचीच
त्याने नसतं अडायचं
निराश होऊन नसतं
स्वप्नांकुरही खुडायचं

मोडले जरी स्वप्न
तरी नसतं हरायचं
नव्या उमेदीने पुन्हा
हिंमतीनंच लढायचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - संघर्ष

संघर्ष

माणसांमधल्या प्रश्नांना
पुढेही घ्यावे लागतात
हक्क मिळवण्यासाठी
लढेही द्यावे लागतात

इथले लढेच सांगतात की
कोण किती ऊथळ आहे
न्यायासाठी हक्कासाठी
संघर्ष मात्र अटळ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

तडका - पैशांमुळे

पैशांमुळे

पैशापुढे झूकतात लोक
पैशांमुळे ठकतात लोक
पैशांसाठी तर कधी कधी
माणसांनाही विकतात लोक

पैश्यांचा वापर करूनच
लोक नको तसे वागतात
मात्र पैशांविनाही कित्तेक
इथे मरण यातना भोगतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पुरावे

पुरावे

कधी पुराव्यां अभावी
सत्यही छळीले जातात
सत्य बाजु वाखाणण्या
पुरावेच पाहिले जातात

पुराव्यांच्या बाबतीत
सदैव असावे कार्यक्षम
जिकडे पुरावे भक्कम
तिकडे न्यायही सक्षम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सलमान सुटला,...!

सलमान सुटला,...!

नक्की काय होणार,.?
घेतली असेल धास्ती
निकालाने पानावली
सलमान खानची दृष्टी

गुतणार म्हणणारांचाही
क्षणात विश्वास तुटला
न्यायालयीन कचाट्यातुन
सलमान निर्दोष सुटला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

तडका - शेकोटीचे सत्य

शेकोटीचं सत्य

शेकोटीच्या रिंगणातली
अट सार्‍यांना कळावी
ज्यांनाही गरम व्हायचंय
त्यांनी सासु जाळावी

ती शेकोटी पेटवण्या मागे
ऊब मिळाऊ धोरण असतं
पण प्रत्येक त्या शेकोटीत
त्या सासुचंच मरण असतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३