गोष्ट लाख मोलाची
देशाने कसे वागायचे
राज्यघटना शिकवते
राष्ट्राचे राष्ट्र ऐक्यही
मना-मनात टिकवते
देशाची प्रतिकृती ही
धार्मिकतेने ना बाटावी
वादंग भडकावणारांना
थोडीशी लाज वाटावी
आपला धर्म आपली जात
यापेक्षा देश हा श्रेष्ठ आहे
राहू द्या भारताला भारतच
हि लाख मोलाची गोष्ट आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा