हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १८ जून, २०१९

तडका - नवा अविष्कार

नवा अविष्कार

बघा नवनविन फतव्यांचे
लोक जणू शिकार आहेत
ऊघड -ऊघड मनमानीयुक्त
हे हल्लीचे अविष्कार आहेत

मनमानी सवय मानवांच्या
स्वभावापासुन तुटली नाही
मनमानीयुक्त अविष्कारातुन
ती ऊजळणीही सुटली नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १७ जून, २०१९

तडका - निष्ठा एक सत्य

निष्ठा एक सत्य

काल जे-जे शत्रु होते
तेच आज साथी आहेत
विरोधकांचा हातात हात
गुलालही माथी आहेत

आजही निष्ठावंत कार्यकर्ते
निष्ठा घोळसत बसले आहेत
अन् निष्ठावंतांच्या जीवावरच
बांडगुळ मात्र पोसले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १६ जून, २०१९

तडका - नैसर्गिक खेळी

नैसर्गिक खेळी

आधी निसर्गाचे केले हाल
आता निसर्गाकडून हाल आहेत
अन् मानवनिर्मित तलावांतही
आता केवळ गाळ आहेत

वाट पाहून पाहून पावसाची
जीवांची तळमळ झाली आहे
पाण्याचे महत्व समजवण्या
जणू हि नैसर्गिकच खेळी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३