हा ब्लॉग शोधा

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

तडका - राष्टीय प्रतिकं सर्वश्रेष्ठ

राष्टीय प्रतिकं सर्वश्रेष्ठ

हे राष्ट्रीय प्रतीकं म्हणजे
राष्ट्राची आण-बाण-शान
देशाचे राष्ट्रगाण म्हणजेच
असते देशवासीयांचा त्राण

म्हणूनच या राष्ट्र प्रतिकांना
कधी गरज नसते पर्यायांची
पर्याय ठेवायचेच म्हटलं तर
व्यवस्था विस्कटेल राष्ट्रांची

राष्ट्रीय ऐक्याच्या धोरणांना
कुणी सर्रास डागू लागतील
प्रत्येक राष्ट्रीय प्रतिकालाही
लोक पर्याय मागू लागतील

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

तडका - आमचे स्पष्ट मत

आमचे स्पष्ट मत

ही हूशारकी नव्हेच मुळी
केवळ नालायक पणा आहे
वादग्रस्त वक्तव्य त्याचेच
जो-जो बौध्दिक उणा आहे

आता जो बोलेल वादग्रस्त
त्याला जागीच बुडवा रे
नालायकांना सांगणे एकच
अक्कल जराशी वाढवा रे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

तडका - एक निष्कर्ष

एक निष्कर्ष

विषय असो कोणताही
छेडणारे कमी नाहीत
आपल्या माणसांचे पायही
ओढणारे कमी नाहीत

आपणच आपला विकास
कधी-कधी रखडून घेतो
राग-द्वेश अन् मत्सरापाई
दारिद्रयाला जखडून घेतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

तडका - रावण

रावण

जेव्हाही प्रथेच्या नावानं
इथे रावण दहन होतो
तेव्हा एक प्रश्न मनात
नक्कीच ना सहन होतो

नैतिकतेच्या मुल्यांचे
सांगा विधायक आहेत का,.?
रावणाची उपमा देण्या इथे
लोक लायक आहेत का,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

तडका - दारू घरपोच

दारू घरपोच

विकासाचे स्वरूप हल्ली
बघा बदलले जात आहेत
जिथे हवे तिथे नाही पण
नको तिथे विकास होताहेत

दारू देण्या लोकांसाठी
घरपोच सेवा सुरू आहेत,.!
विकासाच्या मेरू म्हणून
ब्रॅन्डेड ब्रॅन्डेड दारू आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

तडका - स्टेटस

स्टेटस

बघा स्टेटसचे फॅड हल्ली
झपाट्याने वाढत आहे
अन् स्टेटसचे वॉर देखील
ऑनलाइन भिडत आहे

कुणा-कुणाचे प्रेरणास्थान
हे स्टेटसही होऊ शकते
तर कुणाला टोचवण्याही
स्टेटस कामी येऊ शकते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

तडका - न्युज

न्युज

काल जे काही घडलं
ते आजही जतलं जातं
अन् भविष्यात देखील
विचारात घेतलं जातं

म्हणूनच हे वर्तमानी क्षण
दर्पनाप्रती दिसले पाहिजेत
त्यासाठी न्युज मिडीयाही
पारदर्शक असले पाहिजेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तडका - विषय चर्चेचा

विषय चर्चेचा

गैरवर्तनाचे आरोप हल्ली
बघा वर-वर वाढू लागले
अफवांच्या पुरवण्याही
यात कुणी जोडू लागले

फिल्म इंडस्ट्री मधील हा
चर्चायोग्यच विषय आहे
रोज वाढत्या आरोपांचा
नक्की काय आशय आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

तडका - प्रेमळ बोलणे

प्रेमळ बोलणे

प्रेमाची भाषा हल्ली
झपाट्याने बदलत आहे
सोनु,बाबु अन् पिल्लुही
प्रेमामध्ये ओघळत आहे

लाडामध्ये येऊन पहा
प्रेमाचे हे बोलणे आहेत
नव-उदयास आलेली ही
संवादाचे दालने आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३