हा ब्लॉग शोधा

सखे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सखे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ मार्च, २०१६

तडका - सखे

सखे

तुझ्या रंगात माझा रंग
सांग सखे तु घेशील का
धूळवडीच्या मुहूर्तावर
रंग खेळण्या येशील का

मी रंगात रंगविल तुला
नकोस करू तु ओरडा
पाण्याचीही घेईल तमा
रंग टाकील गं कोरडा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

सखे

सखे,...

सखे दमला का गुदमरला
सखेद मला कागुद मरला
लेखणीत लाजोर खळ बळला
लेखणीतला जोर खळबळला

कशा समजाऊ भावना मी
कशास मजा ऊभा वना मी
आसुसलेलो भेटायला
आसु सले लोभे टायला

समजाऊन घे मन माझे
समजा ऊन घे मन माझे
सखे तु होशील सावली
सखे तु हो शील सावली

तुझे मनन हे वेडावलो
तुझे मन न हे वे डावलो
या वे वरती मना सारखे
यावे वरती मनासारखे

तुझा वेडा पिसारा जा गं
तुझा वेडापिसा राजा गं
दिला चिमनी तु साद गं
दिलाची मनी तु साद गं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करू शकता,परंतु कवितेखालुन नाव काढू नये,...

शनिवार, १८ जुलै, २०१५

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...

रसिकांकडून होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन सदरील कविता ऑडीओसह पुनर्प्रसारित करण्यात येत आहे,...

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...

तुझ्या-माझ्या मधला,दुवा होऊ दे इंटरनेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... |||धृ||
तुझे अबोल बोलके डोळे
अन् लाजरी-लाजरी नजर
डोळे मिटवण्या आधीच
होतेय डोळ्यांपूढे हजर
माझ्या ह्रदयात तुझ्या,प्रेमाचं गं बेट
सखे,तु व्हाट्सअप वरती भेट,...||१||
तुझे सळसळणारे केस
अन् डूलडूलणारे कान
गोल-गोबरे गाल अन्
भिरभिर फिरती मान
सतवताहेत गं मला,अर्धचावले ओठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||२||
या ओसाड माझ्या मनी
तु फुलव प्रेमाचा मळा
मनसोक्त पाहू दे मला
तुझ्या गालावरच्या खळा
जणू मी पिंपळपान,तु झालीस गं देठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||३||
आठवण तुझी घेऊनच
ह्रदय माझं धडधडतंय
तुझ्याच ह्रदयासाठी ते
रातंदिस गं तडफडतंय
तुझं व्यसन माझ्या,ह्रदयास जडलंय थेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||४||
तुला पाहिल्या पासुन गं
मलाच मी विसरलोय
माझ्या जीवनातुन तुझ्या
जीवनात मी घसरलोय
तुझ्या जिवनात माझंही,जीवन होईल सेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||५||
माझ्या मनातली भावना
घे तुझ्याही मनात गं
नको करू विलंब आता
तुझ्या-माझ्या प्रेमात गं
माझ्या ह्रदयाचं तुझ्यासाठी,खुलं आहे हे गेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... ||६||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
व्हाटस्अप नंबर :- 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव काढू नये,....