हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३१ मे, २०१६

तडका - अफवा

अफवा

अफवा अशाच पसरवतात
ज्या सनसनी ठरल्या जातील
समजताक्षणी आर-पार
लोकांच्या मनी भरल्या जातील

खरं तर सत्याला बाहेर येण्या
इथे बहू फतवा असतात
पण वेगाने प्रसारित होनार्या
इथे बहू अफवा असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - प्रॉपर्टी

प्रॉपर्टी

असा कुणी क्वचितच भेटेल
जो स्वार्थात गटलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा मोह
नाथांनाही सुटलेला नाही

मोठ्या मोठ्या समस्यांतुन
प्रॉपर्टी सहज तारू शकते
मात्र कधी हिच प्रॉपर्टी
बरबाद सुध्दा करू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ३० मे, २०१६

तडका - माते अहिल्या

माते अहिल्या

शुर पराक्रम
दाखवला रणी
ठकवला कुणी
झुकवला कुणी

अशा विरांगना
क्वचितच पाहिल्या
अभिवादन तुजला
माते अहिल्या....

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आरोप

आरोप

कधी जवळचे करतात
तर कधी दुरचे करतात
कधी खालचे करतात
तर कधी वरचे करतात

कधी मवाळ करतात
तर कधी जहाल करतात
मात्र झालेले प्रत्येक आरोप
अवस्था तर बेहाल करतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २९ मे, २०१६

तडका - जात संबंध

जात संबंध

अचानक कोणाच्यातरी
अब्रुवरती डाका आहे
पुन्हा नवख्या गदारोळात
टिकेला ऊत्तर टिका आहे

वैयक्तीक बाबींचा संबंधही
जाती धर्माशी लावला जातो
ठराविक वर्गाच्या मदतीला
ठराविक वर्ग धावला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - चला कांदा खरेदीला

शनिवार, २८ मे, २०१६

तडका - अधिकारी बांधवांनो

अधिकारी बांधवांनो

समाज आणि प्रशासनामध्ये
नक्कीच काही दुरावा आहे
याचा वेळोवेळी जाहिर होणारा
समाजात जिवंत पुरावा आहे

समाजातील अधिकार्यावर
जनतेचे सदैव लक्ष असतात
समाजही त्यांनाच ग्रेट मानतो
जे सदैव कर्तव्य दक्ष असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अभाव नियोजनाचा

अभाव नियोजनाचा

गावो गावी पाण्यासाठी
वणवण करत फिरणं आहे
फक्त नियोजना अभावी
योजना असुन झुरणं आहे

जनहितार्थ केलेलं कार्य हे
सदा प्रगतीचा थर असावं
सरकारी योजना म्हणजे
भ्रष्टाचाराचं घर नसावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २७ मे, २०१६

तडका - शिववडा v/s नमो टी

शिववडा v/s नमो टी

बहू पैलु राजकारणही
आता समोर येऊ लागले
अन् वाघाने वडा खाताच
कमळ चहा पिऊ लागले

वस्तुंसह खाद्य पदार्थांवर
आता राजकीय स्टीकर आहे
सेनेच्या शिव वड्याला
नमो टी ची टक्कर आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निष्काळजीपणा धोक्याचा

धावायचंय मला

महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी,वात्रटिकाकार "विशाल मस्के" यांची अपंगांची ऊमेद व्यक्त करणारी कविता,.....

धावायचंय मला

स्वत:चं वेगळं स्थान,मिळवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||घृ||
ना झुंजीत हारलेला
भित्रा मी फरारी
घेण्यास आहे सज्ज
मी धाडशी भरारी
रस्त्यातल्या या गर्दीत हरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||१||
मन शुर-वीर आहे
जीवनाच्या लढतीला
घेईल कवेत आज
सुखाच्या बढतीला
जनी सुख देत देत,मिरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||२||
यशाच्या शिखरांना
मी स्पर्शुनीच येईल
जिद्दीचा हा आदर्श
समाजास देईल
माणूसकीत माणूस,गोवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||३||
पडलो जरी कमी
आधार द्या मला
नव झेप घेण्यासाठी
ऊभार द्या मला
जगण्याच्या भीतीला या,हरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||४||
या धावत्या युगात
धावेल विचारांनी
ना थांबणार मी
थोतांड लाचारांनी
विचारांच्या वादळात,ऊतरायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||५||

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783

---------------------
* नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* चालु घडामोडींवर आधारीत डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या

गुरुवार, २६ मे, २०१६

तडका - सामाजिक कलंक

सामाजिक कलंक

पद प्रतिष्ठा मिळाल्यावर
दुरूपयोग करू लागतात
अन् जबाबदार्या झुगारून
स्वत:च घर भरू लागतात

समाजाला ढसणारे हे
जहरी जहरी डंख आहेत
हे समाजातच पोसणारे
जमाजाचे कलंक आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नियम पाळा,जीवन संभाळा

नियम पाळा,जीवन संभाळा

माणसांनीच बनवलेले आहेत
पण माणसांच्या हिताचे आहेत
तरीही नियम पाळण्याचे ट्रेंड
समाजात अल्प मताचे आहेत

समाजातील कित्तेक अनर्थही
नियमां मुळेच तर घडले आहेत
ज्यांनीही नियम तोडले आहेत
त्यांनी जगणेही सोडले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २५ मे, २०१६

तडका - जीवन एक वादळ

जीवन एक वादळ

गेला जरी तोल तरी
सावरताही आलं पाहिजे
सावरत का होईना पण
वावरताही आलं पाहिजे

अवचित पडलं तरी ऊठुन
पळायलाही शिकलं पाहिजे
जीवन हे एक वादळ आहे
जगायलाही शिकलं पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - विद्यार्थी मित्रांनो

मंगळवार, २४ मे, २०१६

तडका - ढोंगीपणात

ढोंगीपणात

चमत्कार होईल म्हणून लोक
विश्वासाने जवळ जातात
मात्र लोकांच्या विश्वासावर
ढोंगीपणाच्या कवळ येतात

डोळसपणाने पाहिल्यास
तो ढोंगीपणाही दिसुन येतो
तरीही समाज आंधळा बनुन
ढोंगीपणातच फसुन जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सत्य

सत्य

सत्य असेल तर
टिकलं जातं
समोर आलं तर
जिकलं जातं

सत्य नसेल तर
रापलं जातं
दडवलं तरीही
कापलं जातपं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २३ मे, २०१६

तडका - राजकीय समीक्षण

राजकीय समीक्षण

टिका करणे,आरोप करणे
हा राजकारणाचा भाग आहे
कुणाच्या निशाणी सिंह तर
कुणाच्या निशाणी वाघ आहे

पण विकास सोडून भरकटने
हा समाजव्यवस्थेला डाग आहे
राजकीय समीक्षण करण्या
जनतेला अजुनही जाग आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - दुष्काळी वादळी वर्दळी

दुष्काळी वादळी वर्दळी

इकडून भुरभुर
तिकडून भुरभुर
वादळी वर्दळी
जीवाला हुरहुर

निसर्गाची हल्ली
वाढलीय जरासी टेक
दुष्काळी मातीची
ही डोळ्यात धुळफेक

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

वाणी वृध्दाश्रमातली

वाणी वृध्दाश्रमातली

आम्हीही सांभाळला समाज,तरूणपणात
पण आता बसलो आहाेत,वृध्दाश्रमात,...||धृ||
होत्या खुप इच्छा अपेक्षा
स्वप्न सुध्दा खुप होते
आमच्या ध्येयामध्ये सदा
भविष्याचे रूप होते
तुमचीच वाटायची काळजी,आमच्या मनात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||१||
तुम्हा अंगावरती खेळवलं
सदा सुखामध्ये लोळवलं
तुम्हाला सावली देण्या
स्वत:ला ऊन्हात तळवलं
कधीच काटकसर नव्हती,आमच्या प्रेमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||२||
म्हातारपणाला आधार
तुमचाच तर वाटायचा
तुम्हा पाहुन जीवनाला
नवा अंकुरही फूटायचा
जाईल वाटायचं ऊतारवय,सदा जोमात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||३||
आमचं कुटूंबही आता
तुमचं कुटूंब झालं आहे
कुटूंबातलं आमचं स्थान
वृध्दाश्रमात गेलं आहे
वृध्दांना स्थानच नाही, कित्तेक घरा-घरात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||४||
इथेही आता रमतंय मन
वाढलेत वृध्दही येणारे
रोज वेगळे दिसताहेत
नशिबाला दोष देणारे
तरूणपण घालवलं,सदैवच माना-पानात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||५||
काय होतो आम्ही अन्
आता काय झालो आहोत
ज्यांना मनातुन मान दिला
त्यांच्याच मनातुन गेलो आहोत
सुन्न झालंय मन,मनाच्या कोना-कोनात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||६||
पोटभराचं अन्नही आमचं
आलंय आता चमच्यावर
मनात एकच काहूर आहे
हि वेळ न् यावी तुमच्यावर
मिळावे तुम्हाला स्वकुटूंब,वृध्दापकाळात
पण आता बसलो आहोत,वृध्दाश्रमात…||७||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता आवडल्यास नावासह पुढे पाठवुन सहकार्य करावे

* डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या

रविवार, २२ मे, २०१६

तडका - क्लिन चीट

क्लिन चीट

आरोप अंगावर येताच
पाठराखण हजर असते
जहरी जहरी आरोपांना
क्लिनचीटचे गाजर असते

क्लिनचीटचे महत्वही
हमखास कळू लागेल
हवी त्याला क्लिन चीट
सहजतेने मिळू लागेल

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - तिमिरातील तेजासाठी

तिमिरातील तेजासाठी

दुसर्यांना दोष देण्यापेक्षा
स्वत:चंही करावं समीक्षण
करावं कार्य झकास इतकं
की जगही करील निरिक्षण

स्वत:मधल्या अंधकाराला
स्वत:हूनच धमकावं लागतं
तिमिराचा सामना करण्या
काजव्यालाही चमकावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २१ मे, २०१६

तडका - शिक्षण घेता-घेता

शिक्षण घेता-घेता

शिक्षण घेण्यासाठीची
धडपड कसोशीने आहे
शिक्षण घेणे म्हणजे
वाघिणीचं दुध पिणे आहे

म्हणूनच की काय शिक्षणात
बहू अडथळे घातले आहेत
अन् शिक्षण घेता-घेता इथे
सामान्यांचे जीणे फाटले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - महामानवा

महामानवा

हिंसावलेल्या जगास
शिकवलीस अहिंसा
तुझ्या शांती संदेशाची
होत राहिल प्रशंसा

जग झाले शांतीप्रिय
तुझे तत्वज्ञान हे घेता
दिधली तुच मानवता
महामानवा तथागता

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २० मे, २०१६

तडका - बुध्दाची शिकवण

बुध्दाची शिकवण

मित्रांशी वागताना प्रेमाने
शत्रुंशीही वागावे प्रेमाने
समाजामध्ये जगताना
माणसांनी जगावे प्रेमाने

माणसांतली दरिद्री
माणसांकडून खपावी
माणसांतली माणूसकी
माणसांनीच जपावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - आमची युती आहे,...?

आमची युती आहे,...?

मांडीला लाऊन मांडी
सत्तेमध्ये बसतात ते
एकमेकांच्या वागण्याला
आपसातच त्रासतात ते

एकमेकांचं जमत नाही
तरी मात्र सोडत नाहीत
धुसफूसी टोले द्यायला
कुणी कमी पडत नाहीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १९ मे, २०१६

तडका - मिडीयात

मिडीयात

जिकडे मिडीया ठरवेल
तिकडे वारे फिरकतात
त्यांनी सोडलेल्या बातम्या
समाजामध्ये झिरपतात

म्हणूनच तर मिडीयामध्ये
पारदर्शकता ठेवली जावी
अन् समाज हिताची मेख
मिडीयामध्ये रोवली जावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निकाल

निकाल

ज्याचे कार्य चांगले
त्याला मिळते संधी
निवडणूकच सांगते
लोकशाहीची धुंदी

कुणाला झिंगतो
कुणाला झोंबतो
जनतेच्या भावना
निकालच सांगतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - व्यसन कर्त्यांहो

व्यसन कर्त्याहो

जनहितार्थ सल्ला आहे
फुकट म्हणून सोडू नये
आपलं जीवन दुर्वेसनांशी
चुकुनही कधी जोडू नये

व्यसन सोडल्याने सुटते
प्रयत्न कदापी हरू नये
आपल्या कर्तृत्वाने आपण
समाजाची कीड ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १८ मे, २०१६

तडका - फँन लाच

फँन लाच

काळ बदलेल तशा
मागण्याही बदलतात
चारित्र्याला डागणार्या
डागण्याही बदलतात

ऊन्हाळी गर्मीच्या झळा
अधिकारी भोगु लागले
म्हणूनच लाच म्हणून
कुलर-फँन मागु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - चौकशी

चौकशी

ज्यांनी केले घोटाळे
त्यांचे होतील वाटोळे
फक्त सक्सेस व्हावे
ते चौकशीचे वेटोळे

परंतु चौकशी मध्ये
लाचखोरी ना घुसावी
म्हणूनच तर चौकशीत
पारदर्शकता असावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १६ मे, २०१६

तडका - राजकीय सोंडेशी

राजकीय सोंडेशी

मनातील भावना
तावाने मांडतात
राजकीय सोयरे
आपसात भांडतात

येईल तो मांडीशी तर
जाणारा तोफे तोंडेशी
हे प्रसंग सर्रास मिळतील
इथे राजकीय सोंडेशी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - लाचारी खाच

लाचारी खाच

जवळ कुणी नसेल तर
सहज कवटाळलं जातं
प्रकरण ऊघड झालं तर
आरोपासही फेटाळलं जातं

इथे लाच नाही घेतली तर
कुणाचंच काही अडत नाही
पण लाच घेणं देणं मात्र
तरीही बंद पडत नाही,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १५ मे, २०१६

तडका - पाणी

पाणी

अाला दुष्काळ हा वैरी
जीणं केलंया हराम
कधी मिळेल हो सांगा
या यातनांना विराम

कित्तेकांचं आयुष्यही
पाण्यामुळे हरू लागलं
पाणी जीवन ठरता ठरता
जीवघेणंही ठरू लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कुटूंब

कुटूंब

कुटूंब म्हणजे,आधार असताे
जगण्याचा अन्,वागण्याचाही
कुटूंबातुनच तर विचार होतो
सांगण्याचा अन् मागण्याचाही

म्हणूनच समाजात जगताना
आता जाणिव पुर्वक ठेवा जाण
वागा आपल्यांशी आपुलकीने
एकत्र कुटूंब हाच आपला बहूमान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १४ मे, २०१६

तडका - सत्य आलंय धोक्यात

सत्य आलंय धोक्यात

सावरता सावरताही
जीणं चाललं धुक्यात
कपटी षढयंत्रांमुळे
सत्य आलंय धोक्यात

कसे येईल हो सत्य पुढे
सत्याचा गळा घोटल्यावर
माणसांप्रती माणसांतली
माणूसकीच आटल्यावर

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - समाज हित

समाज हित

विकास घडवत असताना
स्वार्थ बाजुला ठेवला जावा
आणि प्रगतीचा महादिप
मना-मनात तेवला जावा

विनाकारण विरोध करत
नाहक वादंग घडवु नयेत
समाजाचे हित कदापीही
राजकारणात अडवू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - झाडाची किंमत

झाडाची किंमत

सुर्य माथ्यावर येता
जीव होई लाही लाही
होरपळून यातनांनी
कुठे सावलीला पाही

न दिसता झाड दुरवर
मग अक्कल जळते
झाड लावायलाच हवे
मनी एकमताने कळते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १३ मे, २०१६

तडका - सत्याचं जहाज

तडका - सिस्टम

सिस्टम

कोण कसा गुततो आणि
कोण कसा सुटतो आहे
सामान्यांचं पाहून जीणं
कंठ आता दाटतो आहे

ज्याच्या हाती सिस्टम
तोच इथला दादा आहे
पण राबवताना सिस्टम
सिस्टमवरतीच गदा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १२ मे, २०१६

तडका - पाण्याचं बिल

पाण्याचं बिल

लातुरच्या दुष्काळात
राजकारण तावले होते
पाणी येणार म्हणताच
श्रेयासाठी धावले होते

रेल्वे आली,पाणी दिलं
बिल मात्र वाढलं आहे
आवच्या बाव बिलानेही
राजकारण घडलं आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ११ मे, २०१६

तडका - ऊत्तराखंड एक्सप्रेस

ऊत्तराखंड एक्सप्रेस

सत्तेपासुन दुर लोटण्या
भलतीच केली झटापट
अल्पमताने पाडण्यास
भलता केलता खटाटोप

ज्याच्याकडे बहूमत आहे
सत्ता त्याच्या पदरात आहे
कटू नितीच्या षढयंत्रांना
लोकशाहीची चपराक आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - विस्तारी कुजबुज

विस्तारी कुजबुज

आता करू नंतर करू
असं करत घोळलं गेलं
घटक पक्षांना सत्तेतुन
कसोशीने टाळलं गेलं

पण घटकपक्षांना पाहून
करूण काया कळवळली
अन् विस्ताराची कुजबुज
नव्या नव्यानं खळबळली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० मे, २०१६

तडका - विश्वासघात

विश्वासघात

सुरक्षित वाटताच
विश्वास टाकतात
आपले पणातही
लोक हे ठकतात

जवळचेच लावतात
आपलीच वाट
विश्वासानेच करतात
हा विश्वासघात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३