हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २७ मे, २०१६

धावायचंय मला

महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी,वात्रटिकाकार "विशाल मस्के" यांची अपंगांची ऊमेद व्यक्त करणारी कविता,.....

धावायचंय मला

स्वत:चं वेगळं स्थान,मिळवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||घृ||
ना झुंजीत हारलेला
भित्रा मी फरारी
घेण्यास आहे सज्ज
मी धाडशी भरारी
रस्त्यातल्या या गर्दीत हरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||१||
मन शुर-वीर आहे
जीवनाच्या लढतीला
घेईल कवेत आज
सुखाच्या बढतीला
जनी सुख देत देत,मिरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||२||
यशाच्या शिखरांना
मी स्पर्शुनीच येईल
जिद्दीचा हा आदर्श
समाजास देईल
माणूसकीत माणूस,गोवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||३||
पडलो जरी कमी
आधार द्या मला
नव झेप घेण्यासाठी
ऊभार द्या मला
जगण्याच्या भीतीला या,हरवायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||४||
या धावत्या युगात
धावेल विचारांनी
ना थांबणार मी
थोतांड लाचारांनी
विचारांच्या वादळात,ऊतरायचंय मला
संकल्प आहे मनी,धावायचंय मला,...||५||

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783

---------------------
* नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* चालु घडामोडींवर आधारीत डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा