हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २० मे, २०१६

तडका - आमची युती आहे,...?

आमची युती आहे,...?

मांडीला लाऊन मांडी
सत्तेमध्ये बसतात ते
एकमेकांच्या वागण्याला
आपसातच त्रासतात ते

एकमेकांचं जमत नाही
तरी मात्र सोडत नाहीत
धुसफूसी टोले द्यायला
कुणी कमी पडत नाहीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा