हा ब्लॉग शोधा

तिमिरातील तेजासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तिमिरातील तेजासाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ मे, २०१६

तडका - तिमिरातील तेजासाठी

तिमिरातील तेजासाठी

दुसर्यांना दोष देण्यापेक्षा
स्वत:चंही करावं समीक्षण
करावं कार्य झकास इतकं
की जगही करील निरिक्षण

स्वत:मधल्या अंधकाराला
स्वत:हूनच धमकावं लागतं
तिमिराचा सामना करण्या
काजव्यालाही चमकावं लागतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३