नाव न घेताही
अहो नाव न घेताही
खुप काही करता येतं
मनामध्ये हेरता येतं
कटू बिज पेरता येतं
जबर निशाणा साधून
टोमणंही मारता येतं
शब्दांना शस्र करून
काळीजही चिरता येतं
टिकांमध्ये घेरता येतं
आरोपांत पुरता येतं
अहो नाव न घेताही
खुप काही करता येतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा