हा ब्लॉग शोधा

प्रॉपर्टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रॉपर्टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ मे, २०१६

तडका - प्रॉपर्टी

प्रॉपर्टी

असा कुणी क्वचितच भेटेल
जो स्वार्थात गटलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा मोह
नाथांनाही सुटलेला नाही

मोठ्या मोठ्या समस्यांतुन
प्रॉपर्टी सहज तारू शकते
मात्र कधी हिच प्रॉपर्टी
बरबाद सुध्दा करू शकते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

तडका - प्रॉपर्टी

प्रॉपर्टी

लोभी माणसांचा उतावळेपणा
कुणाचाही झाकलेला नाही
प्रॉपर्टी कमावण्याचा हव्यास
कुणालाही चुकलेला नाही

आपण कमवलेली प्रॉपर्टी कधी
आपल्याच हातुन जाऊ शकते
आता कळून चुकलं आहे की
प्रॉपर्टी जप्तही होऊ शकते,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

तडका - प्रॉपर्टी

प्रॉपर्टी

ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे
त्याला त्याची किंमत कळते
कित्तेक कित्तेक कामांसाठी
प्रॉपर्टीनेच तर हिंमत मिळते

स्वाभिमानाची मनामध्ये
प्रॉपर्टी ताकत भरू शकते
तर कधी आपलीच प्रॉपर्टी
आपल्याला घातक ठरू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३