हा ब्लॉग शोधा

यंदा कांदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यंदा कांदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

तडका - यंदा कांदा

यंदा कांदा

मनाला वाटलं
हा फेडील पांग
म्हणून लावली
कांद्याची रांग

पण यंदा कांदा
कवडीमोल गेला
भावासाठी ठेवला
तो सुध्दा सडला

सुखासाठी खुप
धडपड केली
पण कांद्याने फक्त
रडा रड केली

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३