हा ब्लॉग शोधा

... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

तडका - प्रिय वाचकहो,...

प्रिय वाचकहो,...

मी लेखणीने माझ्या
समाजाला टिपतो आहे
समाजाचं हित सदैव
विचारांतुन जपतो आहे

तुमच्या स्फूर्तीसुमनांनी
लेखणीला त्राण भेटतो
आपण भेटलात याचा
मनी अभिमान दाटतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

तडका - पाऊस आला रे,...

पाऊस आला रे,...

वेग-वेगळ्या विचारांनुसार
पावसाचे तर्क-वितर्क असतात
दोन्ही बाजु लाऊन धरण्या
लोक भलते गर्क असतात

कुणाला वाटतो हवा हवा
कुणाला वाटतो नको आता
फायदा आणि तोट्यांसह
इथे पाऊसही येतो आता

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ७ जून, २०१६

सख्या रे,...

सख्या रे,.....

                  कवी :- विशाल मस्के,सौताडा
                   मो. :- 9730573783

ज्वानीच्या जोशात,
नजरेच्या फास्यात
माझी नजर अशी
ही फसली रे

भिरभिर फिरुन पापण्यात लपुन
अशी लाजुन खुदकन हसली रे

माझ्या नजरेला ओढ
तुझ्या नजरेची लागली
तुझी प्रीत हि साजना
माझ्या मनात जागली

मी ना माझीच राहिले सजना रे
कशी सावरू मनाला सांग ना रे

तुझ्या नजरेचे झोल
जणू अबोल हे बोल
रूतले हे आरपार
काळजात खोल खोल

तुझी गोडी या मनाला लागली रे
भासे मलाच आज मी वेगळी रे

तुझा होतोय हा भास
तुझी पाहते रे वाट
तुझी आठवण खास
मनी येते दाट दाट

तुला भेटण्या आज मी त्रासली रे
तु येताच गालामधी हसली रे

तुझा होताच स्पर्श
मनी झालाया हर्ष
तुझ्या प्रेमाचा मनी
हा महा परामर्श

माझी जिंदगी ही तुझीच जाहली रे
तुझ्या प्रेमात बहरून फुलली रे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी  www.vishalmske.blogspot.in

-----------------------------

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

तडका - संजय सुटला,...!

संजय सुटला,...!!!

बॉलीवुडचा ब्लॉग
आनंदाने नटला
बॉलीवुडचा हिरो
संजु बाबा सुटला

हि संजयची सुटका
कुतुहलाने पाहतील
वर्तणूक सुधारण्या
कैदीही धजतील,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

रे साजना,...

रे साजना,...

           कवी :- विशाल मस्के
           मो. :- 9730573783

ना येती ओठांवरती
या विरहाच्या वेदना
तुझ्यापरी स्नेहाच्या
दाटल्या रे भावना

शृंगार सारा चढवूनी
तुझविनं हा साज ना
प्रतिक्षा रे तुझीच ही
तुच माझा साजना

ये सख्या तु परतुनी रे
ना मन माझे हे स्वार्थी
गाते रे गुणगाण तुझे
तुझीच ही रे आरती

ओळखते मी जाणते रे
ती तुझ्या मनातील प्रीती
तरीही तु का दूर साजना
हा विलंब नको रे अती

ही आर्त हाक प्राणांतली
देईल तुजला मी खुशी
सल रूसव्या-फूगव्यांची
मनी नको बाळगु अशी

नको दाखवू विरह हा
प्रेमात तुझ्या हसतानी
बघ दिवानी झाली रे
मी तुझीच रे मस्तानी

धूर्त जाहले आज तरीही
तु हो प्रेमाची रे वर्धिका
तुजविनं ही प्रीत अधूरी
मी झाली रे अप'राधिका'

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता Rutuja Gawande यांच्या आवाजात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* व्हाटस्अप वरून मराठी कविता आणि डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता नावासहित शेअर करण्यास परवानगी.

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

हे राष्ट्र निर्मात्या,...

कविता :- हे राष्ट्र निर्मात्या,...
कवी :- विशाल मस्के
           सौताडा, पाटोदा, बीड.
           मो. 9730573783

* कविता ऐकण्यासाठी खालील व्हाटस्अप नंबर वर संपर्क करा :- व्हाटस्अप नंबर :9730573783

* कविता शेअर करण्यास परवानगी

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

तडका - पत्रास कारण की,...

पत्रास कारण की,...

पोशिंदाही पिचलाय आज
आमच्या मनात सल आहे
का जीव होतोय नकोसा
का मरण्या इतपत मजल आहे

तुम्ही अश्रु पुसु शकतात
याबद्दल मुळीच दुमत नाही
पण पत्रास कारण की,
आता बोलायची हिंमत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, २३ जुलै, २०१५

साहेब,...

कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के " यांची शेतकर्‍यांच्या भावना प्रखरपणे मांडणारी ही एक वास्तवदर्शी कविता,...

साहेब,...

वरून वरून बोलु नका
एकदा शेतात येऊन जा
डोळ्यात तुमच्या पाणी येईल
करपतं पीक पाहून जा

फक्त कागदंच वाचु नका
रानात पुरावा वाळला आहे
एका-एका ठोंबासाठी
जीव आमचा जळला आहे

आभाळ सताड आ वासुन
पीक खाण्यास टपलं आहे
लेकराबाळांचं सुख आमच्या
मातीमधी खपलं आहे

हिशोब कर्जाचा पाहून तर
जगणं आमचं बारगळलंय
अन् रानामध्ये पेरलेलं
बीज सुध्दा विरघळलंय

आम्ही जाणतो आहोत तुमची
सत्तेची बोर पिकलेली आहे
पण तुमचे धोरणं ऐकुनच
पिकाने मान टाकलेली आहे

शांत बसुन पाहिलं आहे
आज बोलतो ऐकुन घ्या
शेतकर्‍यालाही कधीतरी
साहेब तुम्ही समजुन घ्या

सुख भोगलं असतं आम्ही
निसर्ग मात्र कोपला आहे
तुमच्याकडून अपेक्षा होत्या
तुम्हीही विश्वास कापला आहे

सरकार बदललं असलं तरी
शेतकरी सुखी झालेच नाहीत
तुम्ही सांगितलेले अच्छे दिन
आमच्यापर्यंत आलेच नाहीत

तुमचीच नीती आपली करत
आम्हीही गंभीर व्हायचं का,.?
सांगा साहेब तुम्हीच आता
इलेक्शन दुबार घ्यायचं का,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. : 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव न काढता,...

शनिवार, १८ जुलै, २०१५

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...

रसिकांकडून होत असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन सदरील कविता ऑडीओसह पुनर्प्रसारित करण्यात येत आहे,...

सखे,तु व्हाटस्अप वरती भेट,...

तुझ्या-माझ्या मधला,दुवा होऊ दे इंटरनेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... |||धृ||
तुझे अबोल बोलके डोळे
अन् लाजरी-लाजरी नजर
डोळे मिटवण्या आधीच
होतेय डोळ्यांपूढे हजर
माझ्या ह्रदयात तुझ्या,प्रेमाचं गं बेट
सखे,तु व्हाट्सअप वरती भेट,...||१||
तुझे सळसळणारे केस
अन् डूलडूलणारे कान
गोल-गोबरे गाल अन्
भिरभिर फिरती मान
सतवताहेत गं मला,अर्धचावले ओठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||२||
या ओसाड माझ्या मनी
तु फुलव प्रेमाचा मळा
मनसोक्त पाहू दे मला
तुझ्या गालावरच्या खळा
जणू मी पिंपळपान,तु झालीस गं देठ
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||३||
आठवण तुझी घेऊनच
ह्रदय माझं धडधडतंय
तुझ्याच ह्रदयासाठी ते
रातंदिस गं तडफडतंय
तुझं व्यसन माझ्या,ह्रदयास जडलंय थेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||४||
तुला पाहिल्या पासुन गं
मलाच मी विसरलोय
माझ्या जीवनातुन तुझ्या
जीवनात मी घसरलोय
तुझ्या जिवनात माझंही,जीवन होईल सेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,...||५||
माझ्या मनातली भावना
घे तुझ्याही मनात गं
नको करू विलंब आता
तुझ्या-माझ्या प्रेमात गं
माझ्या ह्रदयाचं तुझ्यासाठी,खुलं आहे हे गेट
सखे,तु व्हाटस्अपवरती भेट,... ||६||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
व्हाटस्अप नंबर :- 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव काढू नये,....

शनिवार, १३ जून, २०१५

तडका - रस्त्यावरून चालताना,...

रस्त्यावरून चालताना,...

कधी धो-धो आहे तर
कधी मात्र रिमझिम आहे
रस्त्या-रस्त्यावर पडलेली
मान्सुनची चिम-चिम आहे

रस्त्यावरून चालताना
संभाळूनच चालावे लागते
अन् जसे खड्डे येतील तसे
प्रत्येकाला झूलावे लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, २६ एप्रिल, २०१५

तडका - ऐक निसर्गा,...

ऐक निसर्गा,...

हे आम्हाला मान्य आहे की
तु नैसर्गिक संपत्ती दिलीस
पण तुलाही मान्य करावं लागेल
की तुही नैसर्गिक आपत्ती दिलीस

मानवी कुकर्माचा सूड म्हणून
जरी तु नैसर्गिक प्रहार आहेस
पण झालेल्या या विध्वंसाचा
तु ही तितकाच गुन्हेगार आहेस

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

तडका - हे निसर्गा,...

हे निसर्गा,...

तुझ्या सौंदर्याचे गाणेही
आम्ही इथे गायली आहेत
तुझी उग्रवादी रूपे ही
सदैव आम्ही पाहिली आहेत

हे निसर्गा सांग असा का
आम्हावरती कोपतो आहेस
कोपता-कोपता आमच्यावर
का स्वत:लाही कापतो आहेस,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...

मी शेतकरीच बोलतो आहे,...

तुम्हा सर्वांना आपुलकीनं सांगतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||धृ||
आजवर खुप भोगलं आहे
अजुनही खुप भोगतो आहे
जीवनावरती कर्ज काढून
जीवन आज जगतो आहे
आजही जगण्यासाठी धडपडतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||१||
दूष्काळानं होरपळलं आहे
अवकाळही छळतो आहे
आता निसर्गही आमच्या
जगण्याशीच खेळतो आहे
तरीही जगण्याला उमेदीनं पेलतो आहे
होय, मी शेतकरीच बोलतो आहे,...||२||
दुष्काळात अन् अवकाळात
कित्तेकजण दौरे करून गेले
कुणी सांत्वन करून गेले तर
कुणी-कुणी फक्त फिरून गेले
कुणी अजुनही कागदोपत्री फिरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||३||
शेतकर्‍यांच्या आत्महत्तेचे
इथे अभुतपुर्व तांडव होते
ते दूसरे-तिसरे कुणी नाही
तुमचे-आमचेच बांधव होते
त्यांच्यासाठी आजही जीव तळमळतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||४||
मात्र शेतकर्‍याच्या मदतीचे
आजही प्रश्न प्रलंबित आहेत
अन् सरकारी धोरणांमुळे
भावनाच आचंबित आहेत
मात्र मदतीसाठी,शेतकरी ना मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||५||
आत्महत्त्याग्रस्तांच्या आकड्यांतही
इथे भ्रष्टाचार घडतो आहे
अन् मृत्युच्या कारणांच्या
लिखावटीचा प्रश्न पडतो आहे
मृत्युच्या कारणांचे कुणी लेखी पुरावे मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||६||
तुम्हाला काय सांगु आमचे
जगणे कीती जर्जर आहेत
कसे लिहीणार मृत्युची कारणे
आम्ही आजही निरक्षर आहेत
कुणी गजेंद्रसिंह कारणे लिहून मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||७||
पण आता मृत्युचे कारणे
आम्ही लिहून ठेवणार नाहीत
अन् आत्महत्याग्रस्त म्हणून
शेतकरीही मरणार नाहीत
पण जगण्यासाठी मदतीचा हात मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||८||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

( कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये )

रविवार, १२ एप्रिल, २०१५

तडका - एक्झिट पोल,...

एक्झिट पोल,...

निकाल जाहिर होण्याआधीच
तर्क-वितर्काचे बोल असतात
प्रत्येक -प्रत्येक निवडणूकाचे
इथे एक्झिट पोल असतात

अंदाजे बांधलेल्या अंदाजाचीही
कुणाला भलतीच धास्ती असते
कारण एक्झिट पोल म्हणजे
रंगीत तालमीतली कुस्ती असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, ११ एप्रिल, २०१५

तडका - नैसर्गिक बळी,...

नैसर्गिक बळी,...

हल्ली रखरखत्या उन्हाला
अवकाळाची जोड आहे
नैसर्गिक आपत्तींचा वर्षाव
हि निसर्गाचीच खोड आहे

या नियमित आपत्तींमध्ये
माणूस सदा घेरतो आहे
नैसर्गिक आपत्तींचा बळी
निसर्ग सुध्दा ठरतो आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

ज्योतिबा,...

ज्योतिबा,...

ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे

आज पुरूषा बरोबर स्रीया
समानतेनं वागु लागल्यात
सामाजिक धूरा संभाळत
सन्मानानं जगू लागल्यात

तुमच्या विचारांचा व्यासंग
समाजाला जडू लागलाय
तुमच्या विचारांतला समाज
खर्या अर्थानं घडू लागलाय

आता समाजही जाणतोय
स्री अबला नाही सबला आहे
स्री शक्तीचा अनुभव सुध्दा
कित्तेकांनी भोगला आहे

समाजालाही कळू लागलंय
कि आपली कोणती हमी
आहे
प्रगत होणार्या या समाजाला
तुमच्या क्रांतीची पार्श्वभुमी
आहे

हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
हे तुमचेच वैचारिक स्पंदन
तुमच्या विचारांना अन् कार्याला
हे माझे त्रिवार अभिवादन,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

तडका - शोभेचं बोलणं,...

शोभेचं बोलणं,...!

आपण काय बोलावं हे
आपल्यालाही कळलं पाहिजे
अन् शब्दांचं भान ठेऊनच
आपलं बोलणं बोललं पाहिजे

बोलुन गेलेल्या शब्दानं
कधी मनही फसु शकतं
अन् शोभेचं बोलणंही
अशोभनीय असु शकतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

तडका - नियम,...

नियम,...

कुठे लादले जातात तर
कुठे लादून घेतले जातात
माणसांसाठीचे नियम कधी
माणसांकडूनही कातले जातात

कधी नियम वाढवले जातात
कधीे ते तुडवले जाऊ शकतात
तर कधी-कधी नियम सुध्दा
हवेत उडवले जाऊ शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

थरथरणारे हात लिहिती,...

थरथरणारे हात लिहिती,...

थरथरणारे हात लिहिती,उपेक्षितांचे दु:ख
ओले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||धृ||
माणसांच्या सुखालाही,माणसांचे कर्म
नडले
माणसांच्या जाती मध्ये,जाती आणि धर्म
वाढले
माणसाची जात मात्र,माणूसच विसरला आहे
माणसांचा शत्रु आज,माणूसच ठरला आहे
माणसांशी वागतानाही,जणू माणसं झालेत
खुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||१||
वेग-वेगळ्या जातीचा,वेग-वेगळा झेंडा आहे
वेग-वेगळ्या धर्माचा,वेग-वेगळा अजेंडा
आहे
प्रत्येक जाती-धर्मानं,आपला झेंडा ठरवलाय
मानवतेचा अजेंडा मात्र, माणसांतुनच
हरवलाय
नासमज म्हणण्या इतकेही,दिसत नाहित भोळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||२||
गतानुगतिकांचे स्रोत,आता जणू संपलेत
व्यवस्थेतील माणसं,बिनबोभाट झोपलेत
दिव्याचा प्रकाश जणू,दिव्याखालीच पडलाय
अन् सामाजिक तिमीरात,दिवा सुध्दा दडलाय
पण माणसांनीच विणले आहे,हे विषादाचे
जाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||३||
अमानवी कृत्य सुध्दा, मानवाकडून होऊ
लागलेत
अन् माणूसकी पासुन माणसं,दूर-दूर जाऊ
लागलेत
नात्यांच्या पावित्र्याचेही,आता नुसतेच
भास आहेत
माणसांच्या विश्वासावर,अविश्वासी
विश्वास आहेत
मना-मनात फोफावले आहेत,कपटीपणाचे मळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||४||
स्रीयांची सुरक्षितता इथे, अजुन असुरक्षित
आहे
स्री-पुरूषांतील भेद मात्र,इथे आरक्षित
आहे
अन्याय आणि अत्याचार, अजुनही टळले नाही
स्री-पुरूष समतेचे ब्रीद,त्यांना अजुन कळले
नाही
खोलवर समाजात रूतली आहेत, विषमतेची मुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||५||
अनागोंदी या जगण्यामागे,विचारच संकूचित
आहेत
म्हणूनच तर आज वंचित,अजुनही वंचित आहेत
वेदनांचे काहूर इथले,अजुनही ना निर्गमले
आहे
ना उपेक्षितांचे दु:ख,जगण्यातुनही विरले
आहे
ना लागले आहेत अजुनही, अमानुषतेला टाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||६||
क्षणो-क्षणाला अन पदो-पदावर
जणू उद्रेक होतोय रासवांचा
इथे माणसांचेही बाजार भरले
पण ना बाजार पाहिला आसवांचा
विकासाच्या आशेवरच,मंद झाली कित्तेक
पाऊले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||७||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

( कविता आवडली तर जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,...)
( कवितेचा ऑडीओ मिळविण्यासाठी Whatsapp नंबर :- 9730573783 )