हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

मैत्री

------(} मैत्री {)------

                   कवी : विशाल मस्के
                             सौताडा, पाटोदा, बीड.
                             मो. 9730573783

मैत्री तर अशीच असते ना
कधीही,कुठेही,काहीही
अगदी हक्कानं बोलणारी
समजुन घेणारी,सांगणारी

आनंद देणारी अन् घेणारी
चुका शोधणारी,सांगणारी
रूसवे फुगवे होऊन देखील
स्तुती करणारी,खेचणारी

मनात कधी न टोचणारी
हेवे-देवे ठेचणारी
एकमेकांच्या मनाच्या
गाभार्यात पोहचणारी

अविश्वासाच्या दरीत
चुकुनही न खचणारी
दुर असुन सुध्दा सदैव
जवळ-जवळ भासणारी

एकांतात असतानाही
आठवणीनं हसवणारी
एकमेकांना आपुलकीनं
सदा आपलंसं करणारी

प्रत्येक-प्रत्येक वादळात
न डगमगता टिकणारी
एकमेकांना साथ देत-देत
जीवनात अविभाज्य होणारी

या सर्वांची प्रचिती तर
मला तुझ्याकडून आलीय
हि मैत्रीच तर असते ना,.?
म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केलीय

* विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.9730573783

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा