आमचा सल्ला
नैसर्गिक या दुष्काळात
राजकीय सुकाळ आहे
टिका आणि टिपण्यांचा
बहरलेला अवकाळ आहे
असे ऊकसत बसण्यापेक्षा
परिस्थितीचे भान धरावे
एकमेकांची खेचण्यापेक्षा
एकत्रितपणे काम करावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचा सल्ला
नैसर्गिक या दुष्काळात
राजकीय सुकाळ आहे
टिका आणि टिपण्यांचा
बहरलेला अवकाळ आहे
असे ऊकसत बसण्यापेक्षा
परिस्थितीचे भान धरावे
एकमेकांची खेचण्यापेक्षा
एकत्रितपणे काम करावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचा सल्ला
एका मागुन एक वाद
रोज रोज घडत आहेत
रोज घडत्या वादंगाने
इथे द्वेश वाढत आहेत
ऊगीच वाढवुन द्वेश
बरबाद न व्हावे गर्वानी
एकमेकांशी सलोख्याने
सुखी नांदावे सर्वांनी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आमचा सल्ला
इतरांचं जरी जळलं तरीही
न जळणाराला कळत नसतं
ज्याला-ज्याला कळत असतं
केवळ त्याचंच जळत असतं
परिस्थितीचे गांभिर्य घेऊन तरी
रासवट काया कापरली जावी
अन् आकलेचे तारे तोडताना
थोडीशी अक्कल वापरली जावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आमचा सल्ला
आप-आपल्या पध्दतीनं
प्रत्येकजन बोलतो आहे
कुणी जनतेच्या भावनांशी
भावनाशुन्य खेळतो आहे
मात्र ठोकायच्या म्हणून
उगीच बाता ना ठोकाव्यात
आपल्या भावना मांडताना
इतरांच्या भावना जपाव्यात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३