हा ब्लॉग शोधा

जबाबदारांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जबाबदारांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ जुलै, २०१५

तडका - जबाबदारांनो

जबाबदारांनो

ज्यांची आपुलकी वाटायला हवी
त्यांचाही तिरस्कार वाटू लागेल
जेव्हा कोणी जबाबदार नागरिक
अमाणूषतेनं लोकांना पिटू लागेल

कायद्याने अधिकार असले तरी
अधिकाराने कायदा वागवु नये
अन् जबाबदार्‍या पार पाडताना
आपली संयमी काया धगवु नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३