हा ब्लॉग शोधा

दुष्काळात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुष्काळात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

तडका - दुष्काळात

दूष्काळात

कुणी ओरडून सांगितले
कुणी रडू-रडू सांगितले
टिका करत सांगितले कुणी
पाया पडू-पडू सांगितले

विलंब केला नसता इतका
दुष्काळ जाहिर करण्यासाठी
तर नसती आली आपत्तीही
त्या शेतकर्‍यांना मरण्यासाठी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

तडका - दुष्काळात,...

दुष्काळात,...

पाऊस-पाऊस करता-करता
पावसाळा कोरडा-ठाक आहे
होरपळतोय हा निसर्ग तरीही
का पावसाची डोळेझाक आहे

या वाढत्या भीषण परिस्थितीने
उरात धसका भरू लागला
अन् दुष्काळी भागात पाऊसही
आता बोगस दौरे मारू लागला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, १४ जुलै, २०१५

तडका - दुष्काळात

दुष्काळात

शेतातला एक-एक ठोंब
पाण्याविना पोरका आहे
या दुष्काळी पावसाळ्याचा
मना-मनाला चुरका आहे

निर्गालाच बाधक ठरणारा
कसा नैसर्गिक महिमा आहे
कर्जाळू जीनं जगता-जगता
दुष्ळात तेरावा महिना आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३