हा ब्लॉग शोधा

विठ्ठला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विठ्ठला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ जुलै, २०१५

तडका - विठ्ठला

विठ्ठला

कुणी असतील तिथुन तर
कुणी पंढरपुरी जाऊन
कुणी विठ्ठल नाम घेऊन
आपले गार्‍हाणे गाऊन

आप-आपल्या पध्दतीने असे
भक्तांनी साकडे घातले आहेत
प्रत्येक-प्रत्येक साकड्यामध्ये
पावसाचे मुद्दे घेतले आहेत

भक्तांच्या या साकड्यांसाठी
ये सत्वरी तु धाऊन ये
या दुष्काळात पावसाला
विठ्ठला पाऊस होऊन ये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३