प्रतिक्षेची कहाणी
तो येणार म्हणून
ती दिवसभर बसायची
त्याची वाट पाहत
ओले डोळे पुसायची
तीच्यासाठी त्याचं येणं
प्राणप्रिय वाटु लागलं
त्याला विलंब होताच
तीचं मनही दाटू लागलं
तो समाधानाचा अंकुर होता
नव्या दमाची फूंकर होता
तीला प्रतिक्षेत ठेवणारा
तो पाण्याचा टँकर होता
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा