हा ब्लॉग शोधा

ज्योतिबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्योतिबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

तडका - ज्योतीबा

ज्योतीबा

स्री-शिक्षणाची ज्योत तुम्हीच
निस्वार्थपणावे लावली आहे
आजच्या या प्रगत समाजास
तूमच्या कर्तृत्वाची सावली आहे

आमच्या मना-मनावर आरूढ
तुमचे वैचारिक फर्मान आहेत
हे स्री-शिक्षणाच्या पुरस्कर्त्या
तुम्हा मानाचे हे प्रणाम आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ११ एप्रिल, २०१६

तडका - ज्योतिबा

ज्योतिबा

मुली शिकु लागल्यापासुन
बदलु लागला हा समाज
समाजात वाढू लागला
हा वैचारिकतेचा  साज

पुरूषांसह स्रीया देखील
प्रगतीच्या वेगात आहेत
तुमच्या शैक्षणिक क्रांतीने
समानतेच्या जगात आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३


शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

ज्योतिबा,...

ज्योतिबा,...

ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे

आज पुरूषा बरोबर स्रीया
समानतेनं वागु लागल्यात
सामाजिक धूरा संभाळत
सन्मानानं जगू लागल्यात

तुमच्या विचारांचा व्यासंग
समाजाला जडू लागलाय
तुमच्या विचारांतला समाज
खर्या अर्थानं घडू लागलाय

आता समाजही जाणतोय
स्री अबला नाही सबला आहे
स्री शक्तीचा अनुभव सुध्दा
कित्तेकांनी भोगला आहे

समाजालाही कळू लागलंय
कि आपली कोणती हमी
आहे
प्रगत होणार्या या समाजाला
तुमच्या क्रांतीची पार्श्वभुमी
आहे

हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
हे तुमचेच वैचारिक स्पंदन
तुमच्या विचारांना अन् कार्याला
हे माझे त्रिवार अभिवादन,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३